Headlines

गणेशोत्सवात चोरी करणारे तिघे हरियाणातून अटक:पोलिसांनी 4600 किमी पाठलाग करत 23 लाखांचा मुद्देमाल जप्त केला

गणेशोत्सव आणि गणेश विसर्जन मिरवणुकीतील गर्दीचा फायदा घेऊन चोरी करणाऱ्या तिघांना विश्रामबाग पोलिसांनी हरियाणातील पलवल येथून अटक केली. गुजरात आणि हरियाणा पोलिसांच्या मदतीने केलेल्या या कारवाईत नऊ गुन्हे उघडकीस आले असून, सुमारे २३ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आरोपींचा माग काढण्यासाठी तपास पथकाने चार हजार ६०० किलोमीटरचा प्रवास केला अशी माहिती परिमंडळ एक…

Read More

महामार्गांवरील अपघातग्रस्तांना आता हवाई रुग्णवाहिकेचा आधार:नवीन वर्षात सेवा सुरू करण्याचे नियोजन

महामार्गांवर होणाऱ्या गंभीर अपघातांमध्ये जखमींना वेळेत उपचार मिळावेत आणि जीवितहानी टाळता यावी, यासाठी राज्य सरकारकडून हवाई रुग्णवाहिका सेवा सुरू करण्याच्या हालचालींना वेग देण्यात आला आहे. नवीन वर्षाच्या सुरुवातीला ही सेवा कार्यान्वित करण्याचे नियोजन असल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. अपघातानंतरचा पहिला तास जखमींच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असतो. या काळात रुग्णाला योग्य वैद्यकीय सुविधा…

Read More

पुणे महापालिकेत स्फोटांचे आवाज, सायरनचा गजर:अग्निशमन दलाच्या अचानक मॉक ड्रिलने अधिकारी-कर्मचाऱ्यांमध्ये संभ्रम; 15 मिनिटांत सज्जतेची चाचणी

महापालिकेच्या मुख्यालयात सोमवारी दुपारी अचानक स्फोटांसारखे मोठे आवाज आणि सायरनचा गजर ऐकू आल्याने काही काळ भीती आणि कुतूहलाचे वातावरण निर्माण झाले. प्रत्यक्षात कोणतीही आपत्ती घडलेली नसून अग्निशमन दलाकडून आपत्कालीन प्रतिसादाची चाचणी घेण्यासाठी मॉक ड्रिल सुरू असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर या आवाजांमागील कारणाचा उलगडा झाला. आंतरराष्ट्रीय आपत्ती जोखीम न्यूनीकरण दिनानिमित्त महापालिकेच्या अग्निशमन दलाने दुपारी चारच्या सुमारास हा…

Read More

मुख्यमंत्री फडणवीस पुणे पदवीधर-शिक्षक निवडणुकीसाठी पश्चिम महाराष्ट्र दौऱ्यावर:नागपूरमधील नाराजी दूर करत पुणे विभागातील तयारीचा आढावा घेणार

महाराष्ट्र विधान परिषदेच्या पुणे विभाग पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बुधवार, दि. १४ ऑक्टोबर रोजी पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येत आहेत. नागपूर पदवीधर मतदारसंघातील पक्षांतर्गत नाराजी दूर करण्यासाठी झालेल्या चर्चांनंतर आता मुख्यमंत्री पुणे विभागातील निवडणूक तयारीकडे लक्ष केंद्रित करणार असल्याचे राजकीय घडामोडींवरून स्पष्ट होत आहे. पुणे पदवीधर मतदारसंघासाठी डॉ. स्मिता योगेश जाधव,…

Read More

‘ज्ञानेश कुमार राजीनामा देणार नाहीत, त्यांना पदावर ठेवणं मोदींसाठी गरजेचं’:पृथ्वीराज चव्हाणांचा दावा, केंद्र आणि राज्य सरकारवरही निशाणा

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीवरून देशातील राजकीय वातावरण तापले असताना, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी महत्त्वाची विधाने केली आहेत. ज्ञानेश कुमार सहजासहजी राजीनामा देणार नाहीत, असे मत व्यक्त करत त्यांनी केंद्र सरकार आणि निवडणूक व्यवस्थेवर गंभीर प्रश्न उपस्थित केले. ज्ञानेश कुमार यांनी राजीनामा दिल्यास निवडणूक प्रक्रियेबाबत सरकारची…

Read More

विभागीय आयुक्त जी. श्रीकांत यांनी मतमोजणी केंद्राचा आढावा घेतला:औरंगाबाद पदवीधर मतदारसंघासाठी कलाग्राम येथील सुरक्षा व सुविधांची पाहणी करून दिल्या सूचना

छत्रपती संभाजीनगर येथे औरंगाबाद पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी मतमोजणी केंद्र उभारले आहे. विभागीय आयुक्त जी. श्रीकांत यांनी आज चिकलठाणा येथील कलाग्रामसमोरील केंद्राची पाहणी करून सुरक्षा व सुविधांचा आढावा घेतला. श्रीकांत यांनी सीसीटीव्ही, मतपेट्या ठेवण्याची जागा, मतमोजणी कक्ष, वीजपुरवठा, पर्यायी वीज व्यवस्था, अग्निशमन यंत्रणा आणि रुग्णवाहिका तपासल्या. वीजपुरवठ्यामुळे मतमोजणीत अडचण येऊ नये, यासाठी खबरदारी घेण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना…

Read More

राजू शेट्टींच्या नेतृत्वात शेतकऱ्यांचे बेमुदत धरणे आंदोलन:पुणे-बेंगलोर महामार्ग ठप्प; आंदोलनास्थळीच जेवणाची व्यवस्था, महामार्गावर बसल्या पंगती

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते व माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वात पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर हजारो शेतकऱ्यांनी बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले आहे. तसेच महामार्गावर धरणे आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी जेवणाची देखील व्यवस्था करण्यात आली असून रस्त्यावरच पंगती देखील बसवण्यात आल्या. कर्नाटक व महाराष्ट्राच्या सीमेवर असलेल्या कोगनोळी टोल नाका तसेच कर्नाटक येथील हत्तरकी टोल नका येथे हजारो…

Read More

पुढील 25 वर्षात आरोग्यदायी अन्नाचे मोठे आव्हान:पद्मश्री पोपटराव पवार; सारसबाग मंदिरात महिला शेतकरी व उद्योजिकांचा सन्मान

प्लास्टिक नावाचा मोठा राक्षस आपण आणला आहे. जमिनीखाली पाणी जायचे बंद केले आणि जमिनीवर पाणी आणून ठेवले, ही उद्याच्या भविष्यकाळात सर्वात मोठी धोक्याची घंटा आहे. त्यामुळे पुढील २५ वर्षात आरोग्यदायी अन्नाचे सर्वात मोठे आव्हान आपल्यासमोर आहे, असे मत पद्मश्री पोपटराव पवार यांनी व्यक्त केले. श्री महालक्ष्मी मंदिर, सारसबाग तर्फे सार्वजनिक नवरात्रोत्सवात मंदिरामध्ये ‘अन्नदाता शक्ती :…

Read More

छत्रपती संभाजीनगरमध्ये खाद्यतेलाच्या रिपॅकिंग युनिटवर FDA चा छापा:12 हजार किलो तेल जप्त, 206 पैकी केवळ 10 गुण

सणासुदीच्या काळात बाजारपेठेत खाद्यतेलाची मागणी वाढलेली असताना, ग्राहकांच्या आरोग्याशी संबंधित गंभीर बाब छत्रपती संभाजीनगरमध्ये समोर आली आहे. शहरातील जुना मोंढा परिसरात असलेल्या बजरंग ट्रेडिंग कंपनीच्या खाद्यतेल रिपॅकिंग युनिटवर अन्न व औषध प्रशासनाने (FDA) कारवाई केली. या तपासणीत संशयास्पद, अपमिश्रित आणि चुकीचे ब्रँडिंग केलेल्या खाद्यतेलाच्या साठ्यावर कारवाई करत एकूण 12,382 किलो तेल जप्त करण्यात आले. या…

Read More

'शनिवारवाड्यावर डिबेट ठेवा, समोरच्यांची लायकी कळेल':पुणे पदवीधर निवडणुकीत जयंत पाटलांचे खुले आव्हान; मविआने प्रचाराचे रणशिंग फुंकले

पुणे विभाग पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ निवडणुकीच्या रिंगणात महाविकास आघाडीने जोरदार तयारी सुरू केली असून, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत उमेदवारांच्या प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला आहे. या निवडणुकीसाठी महाविकास आघाडीतर्फे पदवीधर मतदारसंघातून हर्षदा जाधव-देशमुख, तर शिक्षक मतदारसंघातून जयंत आसगावकर यांची अधिकृत उमेदवारी जाहीर करत प्रचाराचे…

Read More