Headlines

छत्रपती संभाजीनगरमध्ये खाद्यतेलाच्या रिपॅकिंग युनिटवर FDA चा छापा:12 हजार किलो तेल जप्त, 206 पैकी केवळ 10 गुण

सणासुदीच्या काळात बाजारपेठेत खाद्यतेलाची मागणी वाढलेली असताना, ग्राहकांच्या आरोग्याशी संबंधित गंभीर बाब छत्रपती संभाजीनगरमध्ये समोर आली आहे. शहरातील जुना मोंढा परिसरात असलेल्या बजरंग ट्रेडिंग कंपनीच्या खाद्यतेल रिपॅकिंग युनिटवर अन्न व औषध प्रशासनाने (FDA) कारवाई केली. या तपासणीत संशयास्पद, अपमिश्रित आणि चुकीचे ब्रँडिंग केलेल्या खाद्यतेलाच्या साठ्यावर कारवाई करत एकूण 12,382 किलो तेल जप्त करण्यात आले. या…

Read More

'शनिवारवाड्यावर डिबेट ठेवा, समोरच्यांची लायकी कळेल':पुणे पदवीधर निवडणुकीत जयंत पाटलांचे खुले आव्हान; मविआने प्रचाराचे रणशिंग फुंकले

पुणे विभाग पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ निवडणुकीच्या रिंगणात महाविकास आघाडीने जोरदार तयारी सुरू केली असून, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत उमेदवारांच्या प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला आहे. या निवडणुकीसाठी महाविकास आघाडीतर्फे पदवीधर मतदारसंघातून हर्षदा जाधव-देशमुख, तर शिक्षक मतदारसंघातून जयंत आसगावकर यांची अधिकृत उमेदवारी जाहीर करत प्रचाराचे…

Read More

गुहागर येथे ‘फिल्म टूरिझम’ प्रकल्प उभारण्याचा प्रस्ताव सादर करा:मंत्री आशिष शेलार यांचे निर्देश; MTDC सोबत संयुक्त भागीदारीत प्रकल्प उभारण्याच्या सूचना

रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर तालुक्यातील पालशेत येथे शासकीय भूखंडावर चित्रपट निर्मिती आणि पर्यटनाला चालना देण्यासाठी ‘फिल्म टूरिझम’ प्रकल्प उभारण्याबाबत महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या (एमटीडीसी) संयुक्त भागीदारीत सविस्तर प्रस्ताव तयार करावा, असे निर्देश सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी आज दिले. या प्रकल्पासाठी चित्रपट पर्यटन योजनेंतर्गत निधी उपलब्ध करून घेण्याच्या दृष्टीने म्हाडाची मदत घेण्याबाबतही विचार करावा आणि संपूर्ण…

Read More

गोदरेज वेल्थचा पुण्यात प्रवेश:महाराष्ट्रातील दुसरे कार्यालय; देशातील चौथ्या क्रमांकाची मोठी म्युच्युअल फंड बाजारपेठ

गोदरेज इंडस्ट्रीज समूहाची संपत्ती व्यवस्थापन शाखा असलेल्या गोदरेज वेल्थने पुण्यात प्रवेश केल्याची घोषणा केली. मुंबईनंतर महाराष्ट्रातील कंपनीचे हे दुसरे कार्यालय असेल. पारंपरिक व्यावसायिक कुटुंबे, उद्योजक आणि जागतिक अनुभव असलेल्या व्यावसायिकांना संपत्ती व्यवस्थापन सेवा पुरविण्यावर कंपनीचा भर राहणार आहे. राष्ट्रीय विस्तार धोरणांतर्गत कंपनीने २०३१ पर्यंत व्यवस्थापनाखालील मालमत्ता एक लाख कोटी रुपयांपर्यंत नेण्याचे आणि देशभरातील ३५ ठिकाणी…

Read More

ग्राहकांसाठी UPI व्यवहार मोफतच:बँक ऑफ महाराष्ट्रचे संचालक निधू सक्सेनांनी केल्या सर्व शंका दूर; व्यापाऱ्यांसाठी नवीन नियमावली जाहीर

युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस म्हणजेच यूपीआयच्या (UPI) माध्यमातून दररोज अब्जावधी रुपयांचे व्यवहार करणाऱ्या कोट्यवधी ग्राहकांसाठी एक अत्यंत दिलासादायक बातमी आहे. यूपीआय व्यवहारांवर मर्चंट डिस्काउंट रेट (MDR) लागू करण्याबाबत सुरू असलेल्या विविध चर्चांच्या पार्श्वभूमीवर बँक ऑफ महाराष्ट्रचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी निधू सक्सेना यांनी स्पष्टीकरण दिले आहे.”यूपीआयच्या माध्यमातून पैसे हस्तांतरित करणे अथवा खरेदी करणे हे…

Read More

एकनाथ शिंदे नाराज झाले तर मोठा स्फोट होईल:सरकार बदलून जाईल, उपमुख्यमंत्र्यांच्या नाराजीच्या चर्चेवर बच्चू कडूंचे विधान

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे महायुतीमध्ये नाराज असल्याची सध्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे. काही महत्त्वाच्या बैठकांना त्यांनी मारलेली दांडी आणि दिल्ली दौऱ्यामुळे या चर्चांना अधिक उधाण आलं आहे. याच चर्चेवर आता शिवसेनेचे आमदार बच्चू कडू यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “एकनाथ शिंदे साहेब नाराज नाहीत, पण ते जर नाराज झाले, तर थेट स्फोटच होईल आणि…

Read More

IIT मुंबई- कॉपी करताना पकडल्यावर साहिलने माफी मागितली होती:दुसरी संधी देण्याची विनंतीही केली; विद्यार्थ्याने 18 सप्टेंबर रोजी आत्महत्या केली होती

आयआयटी मुंबईचा विद्यार्थी साहिल वाकोडे परीक्षेत कॉपी करताना पकडला गेल्यानंतर त्याने संस्थेला लेखी माफी दिली होती. पोलिसांनी मंगळवारी सांगितले की, साहिलने लेखी निवेदनात पेपरची चांगली तयारी केली नसल्याचे म्हटले होते. त्याने आपली चूक मान्य करून आणखी एक संधी देण्याची मागणी केली होती. मुंबई गुन्हे शाखा या प्रकरणाचा तपास करत आहे. पोलिसांनी आयआयटी मुंबईचे संचालक शिरीष…

Read More

Eknath Khadse Vs Chandrakant Patil Controversy; Muktainagar Political Clash

मुक्ताईनगरचे शिवसेना आमदार चंद्रकांत पाटील आणि एकनाथ खडसे यांच्यातील वाद पुन्हा एकदा पेटला असून, आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या विधानावर आणि त्यांच्या मुलीविषयीच्या मुद्द्यावर संताप व्यक्त करत, निखिलने आत्महत्या क . दरम्यान यावर उत्तर देताना खडसे म्हणाले की, आमदार चंद्रकांत पाटील यांचे वडील हवालदार असताना मी तरुण होतो मलाही त्याच्या पिढीबद्दल माहिती…

Read More

पुण्यात ज्येष्ठ महिलेची 68 लाखांची सायबर फसवणूक:बँक खात्यात काळ्या पैशांचे व्यवहार झाल्याची धमकी देत लुबाडले

पुण्यात सायबर चोरट्यांनी एका ज्येष्ठ महिलेची ६८ लाख रुपयांची फसवणूक केली आहे. अटकेची धमकी देऊन चोरट्यांनी ही रक्कम उकळली. या प्रकरणी शिवाजीनगर येथील सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारदार ६५ वर्षीय महिला कोथरूडमधील डहाणूकर कॉलनी परिसरात राहतात. सायबर चोरट्यांनी त्यांना फोन करून सांगितले की, त्यांच्या बँक खात्यातून काळ्या पैशांचा व्यवहार झाला आहे…

Read More

रोहित पवारांचे कष्ट मान्य, पण विद्यार्थ्यांच्या पदरात शून्य!:भीमनवार सक्तीने नव्हे तर हवापालटासाठी रजेवर; सुषमा अंधारेंचा रोहित पवारांवर पलटवार

“पुण्यात 12 दिवस चाललेले MPSC विद्यार्थ्यांचे आंदोलन म्हणजे ‘आम्ही युद्धात जिंकलो पण तहात हरलो’ अशी गत झाली आहे. रोहित पवारांनी या आंदोलनाला दिवस-रात्र वेळ दिला, त्यांचे कष्ट आणि योगदान मोठे आहे; पण या आंदोलनातून विद्यार्थ्यांच्या पदरात काहीच पडले नाही, हेच कटू वास्तव आहे. एमपीएससी अध्यक्षांचा राजीनामा झाला नाही, डिस्क्रिप्टिव्ह पद्धतीवर निर्णय झाला नाही आणि विद्यार्थ्यांवरील…

Read More