Headlines

नागपुरात सकाळीच अपघाताचा थरार:भरधाव बस आणि स्कूल व्हॅनची भीषण धडक; 4 विद्यार्थी जखमी

नागपूर शहरात आज सकाळी सकाळी एक मोठा अनर्थ टळला आहे. शहरातील गजबजलेल्या पंचशील चौकात मनपाच्या भरधाव बसने शालेय विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या स्कूल व्हॅनला जोरदार धडक दिली. आज सकाळी ७ वाजेच्या सुमारास झालेल्या या भीषण अपघातात व्हॅनमधील ३ ते ४ विद्यार्थी जखमी झाले आहेत. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसून एक मोठा अनर्थ टळला आहे….

Read More

आरोग्य अन् आनंदी जीवनासाठी आयुर्वेद सर्वोत्तम जीवनशैली:आयुर्वेदिक रिसेलर्स असोसिएशनचे राज्याध्यक्ष शेखर खोले यांचे प्रतिपादन

हजारो वर्षांची समृद्ध परंपरा लाभलेले आयुर्वेद शास्त्र हे सुरक्षित, परिणामकारक आणि दुष्परिणाममुक्त आरोग्यपद्धती आहे. आयुर्वेदाच्या माध्यमातून अनेक आजारांपासून संरक्षण मिळू शकते आणि व्यक्ती सुदृढ, निरोगी व आनंदी आयुष्य जगू शकते. त्यामुळे आयुर्वेदाचा अधिकाधिक अंगीकार करून त्याचा समाजात व्यापक प्रसार आणि प्रचार करण्याचा तसेच नागरिकांमध्ये जनजागृती करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय विशेष सर्वसाधारण सभेत एकमताने घेण्यात आला. आयुर्वेद…

Read More

विठ्ठल मंदिर परिसर वाहन प्रतिबंध क्षेत्र म्हणून घोषित:जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांचे आदेश; आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत कारवाई होणार‎

आषाढी शुद्ध एकादशीनिमित्त पंढरपूर शहरातील यात्रेच्या पार्श्वभूमीवर आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ मधील कलम ३४ (ब) नुसार मंदिर परिसर ‘वाहन प्रतिबंध क्षेत्र’ म्हणून घोषित करण्यात आला आहे. जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष ए . ​आषाढी यात्रा कालावधीत श्रीकृष्ण मंदिर, चौफाळा, विठ्ठल मंदिर पश्चिम द्वार आणि महाद्वार चौक परिसरात भाविकांची अलोट गर्दी असते. भाविक येथूनच…

Read More

आतापर्यंत 1 लाख 20 हजार हेक्टरवर पेरणी:कापूस पिकाचेही क्षेत्र वाढणार, तेल्हारा तसेच पातूर तालुक्यांमध्ये अतिवृष्टीमुळे कामे खोळंबली‎

जुलैच्या सुरुवातीला झालेल्या चांगल्या पावसामुळे यंदा खरीप पेरणीच्या कामांनी वेग घेतला आहे. कृषी विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, जिल्ह्यातील चार लाख ३२ हजार १० हेक्टर पेरणीयोग्य क्षेत्रापैकी आतापर्यंत एक लाख २० हजार हेक्टर क्षेत्रावर पेरणी पूर्ण झा . यंदा शेतकरी मोठ्या प्रमाणावर कापूस पिकाकडे वळत असल्याचे चित्र आहे. यामागील मुख्य कारण म्हणजे मूग आणि उडीद या पिकांच्या…

Read More

टीईटी पेपरफुटी प्रकरणाची निःपक्ष चौकशी कर:अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेची मागणी, उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन सादर‎

राज्यभर गाजत असलेल्या शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) पेपरफुटी प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले. या प्रकरणाची सखोल, निःपक्ष, वेळेत चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. होतकरू, हुशार विद्यार्थ्यांच्या जीवनाची राखरांगोळी करू पाहणाऱ्या पेपरफुटी प्रकरणाचे धागेदोरे कुठपर्यंत गेले आहेत, अशा राक्षसी वृत्तीच्या लोकांवर कोणाचा वरदहस्त आहे,…

Read More

आता एमपीएससी ऑनलाइन नको:ऑफलाइनच घेण्याची केली मागणी, विद्यार्थ्यांचा जिल्हाकचेरीवर मोर्चा, शासनाला घातले साकडे‎

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (एमपीएससी) आगामी पूर्व परीक्षा संगणकाधारित (सीबीटी) पद्धतीने घेण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला आहे. मात्र, या निर्णयामुळे स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये तीव्र असंतोष पसरला असून, हा निर्णय बदलून परीक्षा पूर्वीप्रमाणेच पारंपरिक ऑफलाईन (ओएमआर) पद्धतीने घेण्यात यावी, या मागणीसाठी सदर परीक्षेची तयारी करणाऱ्या जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी गुरुवारी दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा नेत तेथे निदर्शने…

Read More

देशी बियाण्यांचे जतन, फूड फॉरेस्टची उभारणी, जमिनीचा सेंद्रिय कर्ब वाढवला‎:कुऱ्हा परिसरातील युवा शेतकरी निखिल तेटू यांना कृषी भूषण पुरस्काराने केले सन्मानित

हरित क्रांतीचे प्रणेते माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जन्मदिनी व कृषी दिनानिमित्त आयोजित कृषी पुरस्कार सोहळ्यात तिवसा तालुक्यातील कुऱ्हा येथील युवा शेतकरी निखिल मधुकर तेटू यांना राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांच्या हस्ते पुरस्कार देऊन सन्मानित कर . पुरस्कार वितरण समारंभाला राज्यपाल जिष्णू देव वर्मा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, जलसंपदा मंत्री…

Read More

सावळेश्वर येथे उड्डाणपुलासोबतच सर्व्हिस रस्ता करा:10 जुलैला एनएचएआय कार्यालयासमोर तीव्र आंदोलनाचा ग्रामस्थांनी दिला इशारा‎

मोहोळ तालुक्यातील सावळेश्वर येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६५ वर उड्डाणपुलाचे काम वेगाने सुरू असले, तरी सर्व्हिस रस्त्याच्या कामाबाबत अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही. यामुळे स्थानिक शेतकरी व नागरिकांमध्ये तीव्र नाराजी असून, सर्व्हिस रस्त्याला तातडीने मंजुरी न मिळाल्यास दि. १० जुलै २०२६ रोजी भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा सामाजिक…

Read More

जीवघेण्या हल्ल्यातील आरोपींना अटक न झाल्याने रस्ता रोको:माळीबाभूळगाव ग्रामस्थांचे उपविभागीय कार्यालयासमोर आंदोलन‎

माळीबाभूळगाव येथील युवकावर झालेल्या जीवघेण्या हल्ल्याप्रकरणी गुन्हा दाखल होऊनही आरोपींना अटक करण्यात आलेली नसल्याच्या निषेधार्थ ग्रामस्थांनी बुधवारी पाथर्डी–अहिल्यानगर राष्ट्रीय महामार्गावर माळीबाभूळगाव येथील उपविभागीय कार्यालयासमोर रास्ता रोको आंदोलन केले. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन आंदोलकांशी चर्चा केल्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले. माळीबाभूळगाव येथील रहिवासी अक्षय रमेश भडके यांच्यावर २९ मे रोजी जीवघेणा हल्ला झाला होता. या हल्ल्यात…

Read More

शालेय स्तरावर आपत्ती व्यवस्थापनाची पंचसूत्री:महासमादेशक अनिल कुंभार यांचे आवाहन‎

विद्यार्थ्यांमध्ये रस्ता सुरक्षा, शिस्त, आपत्ती व्यवस्थापन आणि सामाजिक उत्तरदायित्वाची भावना अधिक बळकट करण्यासाठी आरएसपी व सिव्हिल डिफेन्सचे प्रशिक्षण शालेय स्तरावर प्रभावीपणे राबवावे, असे आवाहन राज्य महासमादेशक अनिल कुंभार यांनी केले. जळगाव येथील गोदावरी इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये आयोजित रस्ता सुरक्षा दल (आरएसपी) आणि नागरी संरक्षण (सिव्हिल डिफेन्स) विषयावरील एकदिवसीय प्रशिक्षण शिबिरात अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. रस्ता सुरक्षा…

Read More