Headlines

औंढा नागनाथ मंदिर परिसरात 'FDA'चा मोठा छापा:उघड्यावरील 1 क्विंटल पेढा जप्त करून केला नष्ट

देशातील आठवे ज्योतिर्लिंग औंढा नागनाथे येथे मंदिराच्या परिसरात उघड्यावर पेढा विक्री करणाऱ्या 7 दुकानांवर अन्न व औषध प्रशासनाने छापे टाकून तब्बल 1 क्विंटल पेढा जप्त करून नष्ट करण्यात आला आहे. अन्न व औषध प्रशासनाच्या या कारवाईमुळे औंढ्यात एकच खळबळ उडाली आहे. देशातील आठवे ज्योतिर्लिंग असलेल्या औंढा नागनाथ येथे दररोज सुमारे 5 ते 10 हजार भाविक…

Read More

कुंभमेळ्याच्या निधीत 241 कोटींचा घोटाळा!:अनिल परब यांचा विधान परिषदेत गंभीर आरोप, 'SIT' चौकशीची मागणी

पावसाळी अधिवेशनादरम्यान विधान परिषदेतील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे आमदार अनिल परब यांनी आज सार्वजनिक बांधकाम विभागातील ठेकेदारीतील गैरव्यवहार, मुंबई महानगरपालिकेतील निधी वाटपातील दुजाभाव आणि पुण्याच्या विषारी दारूकांडावर राज्य सरकारला धारेवर धरले. विशेषतः आगामी नाशिक कुंभमेळ्यासाठी काढण्यात आलेल्या हजारो कोटी रुपयांच्या टेंडर प्रक्रियेत ‘रिंग’ तयार करून मोठा भ्रष्टाचार झाल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आणि या…

Read More

चंद्रपूर-गडचिरोलीत हत्ती-मानव संघर्ष तीव्र:आतापर्यंत 4 जणांचा बळी, विशेष टास्क फोर्स स्थापन करा- विजय वडेट्टीवार

विदर्भातील चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांमध्ये हत्ती आणि मानवामधील संघर्ष अत्यंत तीव्र आणि चिंताजनक बनला आहे. रानटी हत्तींच्या हल्ल्यात आतापर्यंत चार निष्पाप नागरिकांचा जीव गेला असून, या गंभीर मुद्द्यावर आज विधानसभेत काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी आक्रमक पवित्रा घेतला. या घटना थांबवण्यासाठी वन विभागाने केवळ जुन्या पद्धती न वापरता तातडीने ‘विशेष टास्क फोर्स’ स्थापन करावी,…

Read More

जे ढग गरजत असतात ते बरसत नाही:आधी स्वतःचा पक्ष सांभाळा, मग उठाठेव करा, राम मंदिराच्या मुद्द्यावरून भातखळकरांचा उद्धव ठाकरेंवर घणाघात

जे ढग गरजत असतात ते बरसत नाही. उद्धव ठाकरे यांनी आधी आपल्या स्वतःच्या पक्षाकडे लक्ष दिले पाहिजे आणि तो सांभाळण्याचे काम केले पाहिजे. त्यांनी उगाच राम मंदिराच्या बाबतीत उठाठेव करू नये, अशा शब्दांत भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी शिवसेना उबाठा प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर पलटवार केला आहे. आम्ही श्रीराम जन्मस्थानावर भव्य राम मंदिर उभे केले…

Read More

पुणे जिल्ह्यात दरड कोसळली; दोन घाटमार्ग विस्कळीत:वरंध घाट, कुसगाव खिंडीत वाहतूक ठप्प; प्रशासन सतर्क

पुणे जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे दोन महत्त्वाच्या घाटमार्गांवर दरड कोसळल्याच्या घटना घडल्या आहेत. भोर-महाड मार्गावरील वरंध घाट आणि खेडशिवापूर ते राजगड तालुक्याला जोडणाऱ्या कुसगाव खिंडीत दरडी कोसळल्याने वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. पंढरपूर-महाड राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 965 डीडी अंतर्गत येणाऱ्या वरंध घाटात शिरगाव गावाच्या हद्दीत आज मोठी दरड कोसळली. घाटमाथ्यावर…

Read More

Sia Goels Defiance; Police Demand Polygraph Test

पुण्यातील लोहगडावर व्यावसायिक केतन अग्रवालला दरीत ढकलून त्याची हत्या केल्याच्या प्रकरणात आता रोज नवनवीन आणि धक्कादायक खुलासे होत आहेत. या हत्येच्या कटात मुख्य आरोपी सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी यांच्यानंतर आता एका तिसऱ्या व्यक्तीची एन्ट्री झ . कटात तिसऱ्याची एन्ट्री; कोण आहे हा तरुण? केतन अग्रवालच्या खुनाचा कट सिया आणि चेतन व्यतिरिक्त आणखी…

Read More

नर्सीमध्ये संत नामदेव महाराज पायी पालखी सोहळ्याचे रविवारी प्रस्थान:हिंगोलीत सोमवारी रिंगण सोहळा रंगणार, पालखी सोहळ्याचे 31 वे वर्ष

संत नामदेव महाराजांचे जन्मस्थळ असलेल्या नर्सी नामदेव येथून संत नामदेव महाराजांचा पायी पालखी सोहळा रविवारी ता. 5 पंढरपूरकडे प्रस्थान करणार आहे. या पालखी सोहळ्यात शेकडो वारकरी सहभागी होणार असून पाच ठिकाणी पालखीचे रिंगण सोहळे होणार आहेत. नर्सी नामदेव येथून मागील 30 वर्षापासून नर्सी नामदेव ते पंढरपूर पायी पालखी सोहळा काढला जातो. यावर्षीही रविवारी मवारी ता….

Read More

कर्जमाफी की फसवणूक?:सरकारच्या जाहिरातबाजीवर रोहित पवार भडकले; म्हणाले- अन्नदाता दिसेल तिथं जाहिरातीला चुना फासणार

राज्य सरकारने जाहीर केलेल्या कर्जमाफीवरून विरोधक आक्रमक झाले. राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून राज्य सरकारवर टीका केली आहे. सरकारच्या कर्जमाफीची तुलना एका धूर्त कावळ्याच्या गोष्टीशी करत, रोहित पवारांनी ही कर्जमाफी म्हणजे केवळ जाहिरातबाजी आणि जनतेच्या पैशांची उधळपट्टी असल्याचा घणाघात केला आहे. ‘कावळ्याची मेजवानी अन् हरणाला आमंत्रण’ रोहित पवार…

Read More

पावसाळी अधिवेशन:विधानसभेत गदारोळ; मंत्र्यांच्या गैरहजेरीवर विरोधक आक्रमक; कामकाज पुन्हा सुरू

राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला आज मुसळधार पावसाचा आणि मंत्र्यांच्या गैरहजेरीचा मोठा फटका बसला. लक्षवेधी सूचनेच्या वेळी उत्तर देण्यासाठी मंत्री उपस्थित नसल्याने सभागृहात मोठा गदारोळ झाला होता, ज्यामुळे कामकाज काही काळ तहकूब करण्यात आले होते. मात्र, आता विधानसभेचे कामकाज पुन्हा सुरू झाले असून पुढील विषयांवर चर्चा सुरू आहे. दरम्यान, कालच्या सत्रात मॅनहोल दुर्घटनेवरून सभागृहात जोरदार राडा…

Read More

नागपुरात सकाळीच अपघाताचा थरार:भरधाव बस आणि स्कूल व्हॅनची भीषण धडक; 4 विद्यार्थी जखमी

नागपूर शहरात आज सकाळी सकाळी एक मोठा अनर्थ टळला आहे. शहरातील गजबजलेल्या पंचशील चौकात मनपाच्या भरधाव बसने शालेय विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या स्कूल व्हॅनला जोरदार धडक दिली. आज सकाळी ७ वाजेच्या सुमारास झालेल्या या भीषण अपघातात व्हॅनमधील ३ ते ४ विद्यार्थी जखमी झाले आहेत. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसून एक मोठा अनर्थ टळला आहे….

Read More