Headlines

चारी नसल्याने सांडपाणी तुंबले; आडगाव बुद्रुक येथे ग्रामस्थांचे पाण्यात आंदोलन:ग्रामस्थ संतप्त; प्रशासनाने दखल घेताच तात्काळ कामाला सुरुवात‎

तालुक्यातील आडगाव बुद्रुक येथे मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत आडगाव ते मालोदेवाडीदरम्यान रस्त्याचे काम करण्यात आले आहे. मात्र, आडगाव खुर्द भागात या रस्त्याची उंची प्रमाणापेक्षा जास्त वाढल्याने गावातील पावसाच्या पाण्याचा निचरा होण्यास अडथळा निर्माण झाला आहे. परिणामी, गावातील मुख्य रस्त्यावर गुडघाभर पाणी तुंबल्याने नागरिकांना तसेच शाळकरी विद्यार्थ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. या गंभीर समस्येकडे प्रशासनाचे…

Read More

जामठीत वसंतराव नाईक जयंतीनिमित्त अभिवादन:कृषी दिनानिमित मान्यवरांचे शेतकऱ्यांना मार्गदर्शन‎

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा हरित क्रांतीचे प्रणेते स्वर्गीय वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त १ जुलै रोजी जामठी येथे कृषी दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या वेळी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे उद्यानविद्या शास्त्रज्ञ डॉ. संजय पाटील यांनी बदलत्या हवामानाच्या पार्श्वभूमीवर अल निनोच्या परिणामांविषयी सविस्तर माहिती दिली. कमी कालावधीत येणाऱ्या पिकांची निवड, तसेच फळबाग लागवडीबाबत त्यांनी…

Read More

सिल्लोड शहरात अपुऱ्या पोलिस कर्मचाऱ्यांमुळे गुन्हेगारीत वाढ:सिल्लोड शहर पोलिस स्टेशनला 51 कर्मचारी व 5 अधिकारी अशी मंजूर संख्या‎

सिल्लोड शहराची लोकसंख्या झपाट्याने वाढत असली तरी पोलिसांची संख्या मात्र २५ वर्षांपूर्वी जी होती तीच असल्याने अपुऱ्या पोलिस कर्मचाऱ्यांवर शहराच्या सुरक्षेचा भार पडत असून यामुळे सिल्लोड शहरात गुन्हेगारीत दिवसेंदिवस वाढ होत आहे. . २०११ च्या जनगणनेनुसार सिल्लोड शहराची ५८ हजार लोकसंख्या आहे. परंतु आजच्या परिस्थितीत सिल्लोड शहराची लोकसंख्या ८० हजारांच्या आसपास असल्याचे चित्र आहे. या…

Read More

थायलंडच्या ‘सायबर गुलामगिरी’तून भारतीयांच्या सुटकेसाठी केंद्राची मोहीम:खा. अशोक चव्हाणांच्या पत्राची दखल; बीडच्या तरुणांचा समावेश

म्यानमार आणि थायलंडच्या सीमेवर ‘सायबर गुलामगिरी’च्या भयंकर विळख्यात अडकलेल्या शेकडो भारतीय तरुणांच्या सुटकेसाठी परराष्ट्र मंत्रालयाने युद्धपातळीवर हालचाली सुरू केल्या आहेत. थायलंड आणि म्यानमारमधील स्थानिक सुरक्षा यंत्रणांना सोबत घेऊन ही आंतरराष्ट्रीय बचाव मोहीम राबवली जात आहे. यामध्ये महाराष्ट्रातील बीड, जळगाव, नाशिक, सातारा जिल्ह्यांतील तरुणांचा समावेश आहे. माजी मुख्यमंत्री व खासदार अशोक चव्हाण यांनी केंद्र सरकारकडे यासंदर्भात…

Read More

टिप्पणी:नागरिकांना सरकारचे गुलाम बनवले जात आहे, विरोध केल्यास गुन्हे- मुंबई हायकोर्ट

मुंबई हायकोर्टाने गुरुवारी मुंबई पोलिसांना खडे बोल सुनावले. न्यायमूर्ती माधव जामदार यांनी तोंडी टिप्पणी केली. ते म्हणाले- ‘सर्व नागरिकांना भारत सरकारचे गुलाम बनवले जात आहे. ते विरोध करू शकत नाहीत, ते आंदोलन करू शकत नाहीत- हे सर्व काय आहे? आता इतके पेपर लीक झाले की लोकांनी विरोध केला, तर तुम्ही गुन्हे दाखल कराल… हे काय…

Read More

डॉ. महेंद्र मेटे शिवाजी महाविद्यालयाचे नवे प्राचार्य:डॉ. अंबादास कुलट यांची अकोला येथे बदली झाल्याने पद झाले होते रिक्त

अमरावती येथील श्री शिवाजी कला व वाणिज्य महाविद्यालयाच्या प्राचार्यपदाचा पदभार डॉ. महेंद्र मेटे यांनी स्वीकारला आहे. यापूर्वीचे प्राचार्य डॉ. अंबादास कुलट यांची अकोला येथील श्री शिवाजी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात बदली झाल्याने हे पद रिक्त झाले होते. महाविद्यालयात डॉ. कुलट यांना निरोप देण्यासाठी आणि डॉ. मेटे यांचे स्वागत करण्यासाठी दुहेरी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले…

Read More

रामद्रोह म्हणजेच देशद्रोह:श्रीराम मंदीर लुटीविरोधात ठाकरे सेना आक्रमक, राज्यभरातील मंदिरांमध्ये 'रामरक्षा महाआरती'चे आयोजन

अयोध्या येथील श्रीराम मंदिरातील देणगीच्या आर्थिक गैरव्यवहार आणि लुटीच्या मुद्द्यावरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आता थेट रस्त्यावर उतरणार आहे. या भ्रष्टाचाराचा निषेध करण्यासाठी ठाकरे गटाने संपूर्ण महाराष्ट्रातील प्रमुख राम आणि हनुमान मंदिरांमध्ये ‘रामरक्षा महाआरती’ आयोजित करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. या आंदोलनाच्या माध्यमातून ठाकरे गट सत्ताधारी भाजपला कोंडीत पकडण्याच्या तयारीत आहे. श्रीराम मंदिर उभारणीत…

Read More

मेळघाटात 'रेन वॉटर हार्वेस्टिंग'चा यशस्वी प्रयोग:बोअरवेलला नवसंजीवनी; घराच्या छतावरील पाणी थेट भूजलात

मेळघाटातील अनेक गावांमध्ये उन्हाळ्यात पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. यावर मात करण्यासाठी ‘रेन वॉटर हार्वेस्टिंग’चा एक यशस्वी प्रयोग करण्यात आला आहे. घराच्या छतावरून वाहून जाणारे पाणी थेट भूजलात पोहोचवल्याने एका बोअरवेलला नवसंजीवनी मिळाली आहे. धारणी शहरातील एका शासकीय कर्मचाऱ्याने हा जलसंधारणाचा आदर्श घालून दिला आहे. मेळघाटात दरवर्षी उन्हाळ्यात पाणीटंचाई, कोरड्या पडणाऱ्या बोअरवेल्स आणि घटत्या भूजल पातळीची…

Read More

मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणाले- सरकारचा विरोध केल्यास गुन्हा का?:लोकांना सरकारचे गुलाम बनवले जात आहे; पोलिस पंतप्रधान-मुख्यमंत्र्यांचे नोकर नाहीत

मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती माधव जामदार यांनी गुरुवारी सांगितले की, पोलिस केवळ या कारणास्तव लोकांना शहर-भागातून बाहेर काढू शकत नाही, कारण त्यांनी सरकारच्या निर्णयांना विरोध केला आहे किंवा सरकारविरोधात घोषणा दिल्या आहेत. ते म्हणाले- विरोध करणे हा नागरिकांचा अधिकार आहे. याचिकाकर्त्याने ‘भाजप सरकार मुर्दाबाद’, ‘अमित शहा मुर्दाबाद’ अशा घोषणा दिल्या आहेत. नागरिक अशा घोषणा का…

Read More

ताडोबा व्याघ्रप्रकल्पात बोमा तंत्रज्ञानाने 30 चितळांचे यशस्वी स्थलांतर:वाघांचे क्षेत्र बदल रोखण्यास, मानव-वन्यजीव संघर्ष टाळण्यास मदत

ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पात (TATR) भक्ष्यांची घनता संतुलित करण्यासाठी वनविभागाने ‘बोमा तंत्रज्ञाना’चा वापर करत ३० चितळांचे यशस्वी स्थलांतर केले आहे. प्रकल्पाच्या ‘सक्रिय पर्यावरणीय व्यवस्थापन’ धोरणांतर्गत, अधिक भक्ष्यांची संख्या असलेल्या भागातून कमी संख्या असलेल्या भागात तृणभक्षक प्राण्यांना हलवण्यात आले आहे. यामुळे वाघांचे क्षेत्र बदल रोखण्यास आणि मानव-वन्यजीव संघर्ष टाळण्यास मदत होणार आहे. या मोहिमेच्या पहिल्या टप्प्यात, गाभा क्षेत्रातील…

Read More