सुरक्षेवरून विधानसभेत राडा:बिश्नोई गँगच्या धमकीवरून वडेट्टीवार संतापले; म्हणाले- रोहित शेट्टीला 25 गार्ड, मग आमदाराला का नाही?
राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात आज दोन अत्यंत संवेदनशील आणि गंभीर मुद्द्यांवरून विरोधकांनी सरकारला धारेवर धरले. काँग्रेसचे आमदार साजिद पठाण यांना कुख्यात ‘बिश्नोई गँग’कडून पुन्हा एकदा धमकी आल्याचा धक्कादायक प्रकार काँग्रेसचे विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी सभागृहात मांडला. यासोबतच, लातूरमधील शेतकरी आत्महत्येच्या मुद्द्यावर स्थगन प्रस्ताव नाकारण्यात आल्याने संतप्त झालेल्या विरोधकांनी थेट सभात्याग केला. ‘रोहित शेट्टीला 25…