युद्धामुळे डिझेल दर भडकले; ट्रॅक्टर मशागतीच्या खर्चात 25 टक्के वाढ:लांबलेला पाऊस, वाढत्या खर्चामुळे 60% शेतकऱ्यांनी मशागतच केली नाही सुरू
अमेरिका – इराण युद्धामुळे इंधनाचे दर वाढल्याने डिझेलच्या किमतीत थेट १० टक्क्यांनी वाढ झाली. ३ महिन्यापूर्वी ९०.७६ रुपये प्रतिलिटर असणारे डिझेल जागतिक युद्धजन्य परिस्थितीमुळे ९८.५६ रुपयावर पोहोचले. डिझेलमधील या दरवाढीचा थेट परिणाम आता कृषी क्षेत्रावर दिसू लागला असून ट्रॅक्टर मालकांनी शेतीच्या मशागतीच्या दरात तब्बल २५ टक्क्यांची मोठी वाढ केली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या वाढलेल्या…