नवी मुंबईत थरकाप उडवणारी घटना:साचलेल्या पाण्यात पसरला हायव्होल्टेज करंट, दोन कॉलेज तरुणी गंभीर जखमी
नवी मुंबईतील नेरूळमधून काळजाचा थरकाप उडवणारी एक घटना समोर आली आहे. एल.पी. ब्रिजसमोरील बिकानेर स्वीट्स परिसरात एका विद्युत वाहिनीमध्ये अचानक झालेल्या शॉर्टसर्किटमुळे रस्त्यावरील साचलेल्या पाण्यात हायव्होल्टेज करंट उतरला. दुर्दैवाने, त्याचवेळी तिथून जाणाऱ्या दोन कॉलेज तरुणी या विद्युतप्रवाहाच्या कचाट्यात सापडल्या आणि जागेवरच कोसळल्या. दोघीही क्षणात रस्त्यावरील पाण्यात बेशुद्ध नेरूळच्या एल.पी. ब्रिजखाली मुसळधार पावसामुळे आधीच मोठ्या प्रमाणावर…