Headlines

पिंपळदरी येथे आरोग्य उपकेंद्रामध्ये पल्स पोलिओ मोहिमेला प्रतिसाद

येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्रात रविवारी (२८ जून) सकाळी आठ वाजता पल्स पोलिओ लसीकरण मोहीम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. मोहिमेच्या उद्घाटनप्रसंगी सरपंच पूजा सुनील माहोरे यांच्या हस्ते बालकांना डोस देण्यात आला. यात शून्य जन्मापासून ते पाच वर्षांपर्यंतच्या सर्व बालकांना पोलिओ प्रतिबंधक लसीचे दोन थेंब पाजण्यात आले. या मोहिमेला गावातील पालकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. त्यांनी आपल्या पाल्यांना…

Read More

हवामान:मान्सून आजपासून वेग घेईल; 4 दिवसांत सर्व राज्यांत पोहोचणार, पुढील काही दिवसांत महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार

पूर्व किनाऱ्यावर 18 दिवसांपासून अडकलेला मान्सून मंगळवारपासून वेग घेईल. पुणे भारतीय हवामान शास्त्र विभागाच्या अहवालानुसार, पुढील काही दिवसांत महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार आहे. गेल्या 24 तासांत कोकण गोव्यात बहुतांश ठिकाणी जोरदार पाऊस व अतिवृष्टी झाली, तर विदर्भ आणि मराठवाड्यातही पाऊस नोंदवला गेला आहे. तर 29 जून ते 5 जुलै या काळात कोकणात बहुतांश ठिकाणी पावसाची…

Read More

उद्धव ठाकरेंचा शिर्डी दौरा:"गद्दार'' वगळता मराठी माणूस पंतप्रधान ‎होणार असेल तर पाठिंबा- उद्धव ठाकरे‎

“गद्दार सोडून महाराष्ट्रातील‎ कोणताही मराठी माणूस पंतप्रधान‎ होणार असेल, तर शिवसेना त्याला ‎‎नक्कीच पाठिंबा देईल,” असे मोठे ‎‎विधान शिवसेना (ठाकरे गट)‎पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी ‎शिर्डी दौऱ्यात केले. त्यांनी केंद्र‎सरकार, भाजप, शिंदेंच्या शिवसेनेवर ‎‎जोरदार टीका केली.‎ साईबाबांचे दर्शन घेतल्यानंतर ‎आयोजित पत्रकार परिषदेत ठाकरे ‎म्हणाले, “मराठी माणसाने पंतप्रधान‎ होण्याचे स्वप्न पाहण्यात काहीच गैर ‎नाही. मात्र संघाचा…

Read More

केतन अग्रवाल हत्याकांड:बालीचा विचार साेडून सियाच्या डोक्यात शिजला केतनच्या घातपाताचा कट, 3जुलैपर्यंत सिया-चेतनला पोलिस कोठडी

लोहगड किल्ल्यावरील केतन अग्रवाल मृत्यू प्रकरणात आरोपी सिया गोयल आणि चेतन चौधरी यांना सोमवारी वडगाव न्यायालयात लोणावळा ग्रामीण पोलिसांनी हजर केले. या वेळी पोलिसांनी आरोपींची ७ दिवसांची पोलिस कोठडी संपुष्टात आल्याने त्यांना पुन्हा ७ दिवस पोलिस कोठडी वाढवून देण्याची मागणी केली. न्यायालयाने यावर ३ जुलैपर्यंत आरोपींच्या कोठडीत वाढ केली आहे. केतन याचा घात करण्याचा ६…

Read More

आज आंतरराष्ट्रीय लघुग्रह दिवस:अमरावतीत विशेष नोंदी घेतल्या जाणार

आज, मंगळवार, ३० जून रोजी ‘आंतरराष्ट्रीय लघुग्रह दिवस’ साजरा केला जात आहे. या दिवसाचा मुख्य उद्देश अवकाशातील लघुग्रहांविषयी जनजागृती करणे, तसेच पृथ्वीजवळून जाणाऱ्या लघुग्रहांचे निरीक्षण आणि संशोधनाचे महत्त्व समाजापर्यंत पोहोचवणे हा आहे. अमरावती येथील मराठी विज्ञान परिषदेतर्फे या निमित्ताने विशेष नोंदी घेतल्या जाणार आहेत. सन १९०८ मध्ये रशियातील तुंगुस्का येथे झालेल्या प्रचंड स्फोटाच्या स्मरणार्थ हा…

Read More

शिरजगाव बंड येथे नैसर्गिक नाला बंद:शेतात पाणी साचण्याची भीती; शेतकऱ्यांची प्रशासनाकडे कारवाईची मागणी

चांदूरबाजार तालुक्यातील मौजा शिरजगाव बंड येथील कित्येक वर्षांपासूनचा नैसर्गिक पावसाळी पाण्याचा प्रवाह अडवण्यात आला आहे. यामुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये चिंता वाढली असून, शेतात पाणी साचून पिकांचे नुकसान होण्याची भीती व्यक्त होत आहे. ग्रामस्थ आणि शेतकऱ्यांनी प्रशासनाकडे तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे. शिरजगाव बंड-चांदूरबाजार मार्गालगत असलेला हा नाला काही शेतकऱ्यांनी जेसीबीच्या साहाय्याने माती टाकून बंद केल्याचा…

Read More

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची 30 जूनची 'डेडलाईन' हुकली!:आता 5 जुलैनंतर मिळणार लाभ, मंत्री दत्तात्रय भरणेंची माहिती

राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी विधानसभेत माहिती देताना स्पष्ट केले की, शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची 30 जूनची डेडलाईन हुकणार असून आता 5 जुलैनंतरच त्यांना या कर्जमाफीचा प्रत्यक्ष लाभ मिळू शकेल. कर्जमाफीच्या अटी आणि निकषांवर सविस्तर चर्चा झाली असून, प्राथमिक अंदाजानुसार राज्यातील 56 लाखांहून अधिक शेतकऱ्यांना याचा फायदा होणार असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, सरकारच्या या विलंबावर तीव्र…

Read More

निलंबन कारवाईला उच्च न्यायालयात आव्हान:हिंगोली जि. प. उपकार्यकारी अभियंत्याचा कारवाई बेकायदेशीर असल्याचा दावा

हिंगोली जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागातील उपकार्यकारी अभियंत्याने निलंबनाच्या कारवाईला उच्च न्यायालयात आव्हान दिले असून जिल्हा परिषदेने केलेली कारवाई बेकायदेशीर असल्याचा दावा केला आहे. याप्रकरणात आता ता. ६ जुलै रोजी पुढील सुनावणी होणार असल्याचे उपकार्यकारी अभियंता डी. के. मस्के यांनी सांगितले. हिंगोली जिल्हयातील जोडपिंपरी येथे उपकार्यकारी अभियंता मस्के यांच्या पत्नीच्या नावे जमीन आहे. या जमीनीमध्ये त्यांनी…

Read More

वारकऱ्यांच्या 'चरण सेवेला' प्रारंभ:मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा 'भक्ती विठोबाची, सेवा आरोग्याची' उपक्रम; नेमका उपक्रम काय?

आषाढी वारीच्या निमित्ताने पंढरपूरकडे पायी मार्गस्थ होणाऱ्या लाखो वारकऱ्यांच्या सेवेसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षातर्फे ‘चरण सेवा’ उपक्रम यंदाही राबविण्यात येत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून सुरू करण्यात आलेल्या या उपक्रमांतर्गत जिल्हा प्रशासन, शासकीय व खासगी वैद्यकीय महाविद्यालये, विविध आरोग्य संस्था, सेवाभावी संघटना तसेच स्वयंसेवक यांच्या समन्वयातून पालखी मार्गावरील मुक्कामाच्या ठिकाणी…

Read More

कौतुकाची थाप:महावितरणचे संचालक राजेंद्र पवार यांना राष्ट्रीय 'एमिनेंट इंजिनियर’ पुरस्कार जाहीर

महावितरण कंपनीचे संचालक (मानव संसाधन) राजेंद्र पवार यांच्या विद्युत क्षेत्रातील गेल्या ३७ वर्षांच्या योगदानाची दखल घेत ‘द इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनियर्स’ (भारत) संस्थेच्या वतीने त्यांना ‘एमिनेंट इंजिनियर’ हा देशपातळीवरील मानाचा पुरस्कार जाहीर झाला आहे. अमरावती येथे येत्या २१ व २२ ऑगस्टला आयोजित ‘आयईआय’च्या ४१ व्या राष्ट्रीय विद्युत अभियंता अधिवेशनामध्ये संचालक राजेंद्र पवार यांना हा पुरस्कार प्रदान…

Read More