Headlines

दिव्य मराठी इम्पॅक्ट‎:बीडच्या चंपावती विद्यालयात 3 नव्हे 295 विद्यार्थी बोगस; गुन्हा दाखल करण्याचे आदेश, शिक्षण विभागाकडून चौकशी सुरू

राज्यभर संचमान्यतेसाठी विद्यार्थ्यांचे प्रवेश विकत घेण्याचा गैरप्रकार गुरुवारी (८ ऑक्टोबर) ‘दिव्य मराठी’च्या वृत्तामुळे चव्हाट्यावर आला होता. प्रकरणाची गंभीर दखल घेत शिक्षण उपसंचालक के. जी. दातखीळ यांनी बीडच्या चंपावती शाळेच्या संपूर्ण पटसंख्येची पडत . परंतु, प्रत्यक्षात हजेरीपट तपासणीत केवळ ९७३ विद्यार्थी आढळले. ३ नव्हे, तर २९५ विद्यार्थी दुसऱ्या शाळेत प्रवेशित असल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे….

Read More

एफडीएची कारवाई:संभाजीनगरच्या बीड बायपासवरील‘केएफसी’त घाण; परवाना निलंबित, काळेकुट्ट ट्रे अन् कच्च्या-शिजवलेल्या मांसाची सरमिसळ

अन्न व औषध प्रशासनाने रविवारी बीड बायपासवरील शहानूरवाडी येथील ‘केएफसी’ उपाहारगृहावर छापा टाकला. किचनमधील अस्वच्छतेमुळे ग्राहकांच्या आरोग्याला धोका असल्याचे उघडकीस आल्याने प्रशासनाने हॉटेलचा अन्न परवाना निलंबित केला आहे. अन्न सुरक्षा अधिकारी पी. पी. सुरसे यांच्या पथकाने केलेल्या तपासणीत ओव्हनमधील ग्रील व बेकिंग ट्रे अनेक दिवसांपासून न धुतल्याने काळेकुट्ट होते. चिकन बनवण्याचा ओटा घाणीने माखलेला होता….

Read More

गडचिराेलीत आश्रमशाळेत आठवीच्या मुलीची आत्महत्या:दुर्गोत्सवाला गावी न नेल्याने उचलले टोकाचे पाऊल

पालक सभेसाठी आश्रमशाळेत आलेल्या आई – वडिलांना आरमोरी येथील दुर्गोत्सवासाठी गावी नेण्याची मागणी केली. ती पालकांनी नाकारल्याचा संताप आल्याने आश्रमशाळेतील आठवीच्या मुलीने पालक गावी जाताच आश्रमशाळेच्या वसतिगृहातील तिसऱ्या मजल्यावरील खोलीत पंख्याला ओढणी बांधून गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना कुरखेडा तालुक्यातील सोनसरी येथील आश्रमशाळेत सोमवारी घडली. राणू क्रिष्णा हलामी असे आत्महत्या केलेल्या १४ वर्षीय मुलीचे…

Read More

काम आपण करतो, पण ज्ञानेश कुमारांच्या कृपेने दुसरेच निवडून येतात:शर्मिला ठाकरेंचा निवडणूक आयोगावर घणाघात

निवडणुकीच्या काळात राजकीय पक्ष आणि उमेदवार मेहनत घेतात, जनतेपर्यंत पोहोचतात; मात्र निवडणुकीच्या निकालावरच प्रश्न उपस्थित होत असतील, तर लोकशाही प्रक्रियेबाबत संशय निर्माण होतो. याच मुद्द्यावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यावर निशाणा साधला आहे. “काम आपण करतो, पण ज्ञानेश कुमार यांच्या कृपेने दुसरेच निवडून…

Read More

अप्पर वर्धा धरणातून शेती-उद्योगाच्या पाण्याला कपात:पिण्याच्या पाण्याची अडचण नाही, पण 16 ऑक्टोबरपासून 10 टक्के घट होणार

अमरावती जिल्ह्यात पाण्याचे संकट गंभीर होत आहे. भूजल पातळीत घट झाल्यामुळे आणि जलस्रोतांवर ताण वाढल्यामुळे आगामी काळात पाणीटंचाईचा सामना करावा लागेल. पिण्याच्या पाण्याची अडचण येणार नाही, पण शेती आणि उद्योगाच्या पाण्यात मोठी कपात केली जाईल. अमरावती, बडनेरा, मोर्शी आणि तिवसा शहराला अप्पर वर्धा धरणातून पाणी मिळते. या धरणातून दररोज सरासरी २.०६ दलघमी पाण्याची उचल केली…

Read More

गणेशोत्सवात चोरी करणारे तिघे हरियाणातून अटक:पोलिसांनी 4600 किमी पाठलाग करत 23 लाखांचा मुद्देमाल जप्त केला

गणेशोत्सव आणि गणेश विसर्जन मिरवणुकीतील गर्दीचा फायदा घेऊन चोरी करणाऱ्या तिघांना विश्रामबाग पोलिसांनी हरियाणातील पलवल येथून अटक केली. गुजरात आणि हरियाणा पोलिसांच्या मदतीने केलेल्या या कारवाईत नऊ गुन्हे उघडकीस आले असून, सुमारे २३ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आरोपींचा माग काढण्यासाठी तपास पथकाने चार हजार ६०० किलोमीटरचा प्रवास केला अशी माहिती परिमंडळ एक…

Read More

महामार्गांवरील अपघातग्रस्तांना आता हवाई रुग्णवाहिकेचा आधार:नवीन वर्षात सेवा सुरू करण्याचे नियोजन

महामार्गांवर होणाऱ्या गंभीर अपघातांमध्ये जखमींना वेळेत उपचार मिळावेत आणि जीवितहानी टाळता यावी, यासाठी राज्य सरकारकडून हवाई रुग्णवाहिका सेवा सुरू करण्याच्या हालचालींना वेग देण्यात आला आहे. नवीन वर्षाच्या सुरुवातीला ही सेवा कार्यान्वित करण्याचे नियोजन असल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. अपघातानंतरचा पहिला तास जखमींच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असतो. या काळात रुग्णाला योग्य वैद्यकीय सुविधा…

Read More

पुणे महापालिकेत स्फोटांचे आवाज, सायरनचा गजर:अग्निशमन दलाच्या अचानक मॉक ड्रिलने अधिकारी-कर्मचाऱ्यांमध्ये संभ्रम; 15 मिनिटांत सज्जतेची चाचणी

महापालिकेच्या मुख्यालयात सोमवारी दुपारी अचानक स्फोटांसारखे मोठे आवाज आणि सायरनचा गजर ऐकू आल्याने काही काळ भीती आणि कुतूहलाचे वातावरण निर्माण झाले. प्रत्यक्षात कोणतीही आपत्ती घडलेली नसून अग्निशमन दलाकडून आपत्कालीन प्रतिसादाची चाचणी घेण्यासाठी मॉक ड्रिल सुरू असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर या आवाजांमागील कारणाचा उलगडा झाला. आंतरराष्ट्रीय आपत्ती जोखीम न्यूनीकरण दिनानिमित्त महापालिकेच्या अग्निशमन दलाने दुपारी चारच्या सुमारास हा…

Read More

मुख्यमंत्री फडणवीस पुणे पदवीधर-शिक्षक निवडणुकीसाठी पश्चिम महाराष्ट्र दौऱ्यावर:नागपूरमधील नाराजी दूर करत पुणे विभागातील तयारीचा आढावा घेणार

महाराष्ट्र विधान परिषदेच्या पुणे विभाग पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बुधवार, दि. १४ ऑक्टोबर रोजी पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येत आहेत. नागपूर पदवीधर मतदारसंघातील पक्षांतर्गत नाराजी दूर करण्यासाठी झालेल्या चर्चांनंतर आता मुख्यमंत्री पुणे विभागातील निवडणूक तयारीकडे लक्ष केंद्रित करणार असल्याचे राजकीय घडामोडींवरून स्पष्ट होत आहे. पुणे पदवीधर मतदारसंघासाठी डॉ. स्मिता योगेश जाधव,…

Read More

‘ज्ञानेश कुमार राजीनामा देणार नाहीत, त्यांना पदावर ठेवणं मोदींसाठी गरजेचं’:पृथ्वीराज चव्हाणांचा दावा, केंद्र आणि राज्य सरकारवरही निशाणा

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीवरून देशातील राजकीय वातावरण तापले असताना, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी महत्त्वाची विधाने केली आहेत. ज्ञानेश कुमार सहजासहजी राजीनामा देणार नाहीत, असे मत व्यक्त करत त्यांनी केंद्र सरकार आणि निवडणूक व्यवस्थेवर गंभीर प्रश्न उपस्थित केले. ज्ञानेश कुमार यांनी राजीनामा दिल्यास निवडणूक प्रक्रियेबाबत सरकारची…

Read More