Headlines

महिला डॉक्टरला मारहाण भोवली:एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे माजी नगरसेवक रमेश म्हात्रेला 4 दिवसांची कोठडी; अटक टाळण्याचा प्रयत्न फसला

सत्ता, पद आणि पैशाच्या गुर्मीत कायद्याला खिशात घेऊन फिरणाऱ्या लोकप्रतिनिधींना न्यायालयाने पुन्हा एकदा त्यांची जागा दाखवून दिली आहे. एका महिला डॉक्टरवर हात उचलणे कल्याण-डोंबिवलीतील शिवसेनेचे (शिंदे गट) वादग्रस्तनगरसेवक रमेश म्हात्रे यांना भलतेच महागात पडले आहे. याप्रकरणी न्यायालयाने म्हात्रे यांना थेट 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावल्याने राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ माजली आहे. डोंबिवलीतील एका नामांकित रुग्णालयात…

Read More

चंद्रपूरच्या शेतमजुरांवर काळाचा घाला:भीषण अपघातात 4 मजुरांचा जागीच मृत्यू, तर 27 जखमी; पवना चक गावावर शोककळा

राज्यातील रस्ते अपघातांचे सत्र थांबण्याचे नाव घेत नसून, आता चंद्रपूर जिल्ह्यातील शेतमजुरांवर काळाने भीषण घाला घातला आहे. पोटाची खळगी भरण्यासाठी आणि उदरनिर्वाहासाठी शेजारील तेलंगणा राज्यात भात लावणीच्या कामासाठी गेलेल्या या मजुरांच्या वाहनाला रामगुंडम परिसरात मोठा अपघात झाला. सिंदेवाही तालुक्यातील पवना चक येथील हे मजूर शेतातील काम आटोपून आपल्या निवासाच्या ठिकाणी परतत असताना ही दुर्दैवी घटना…

Read More

एटीएसची मोठी कारवाई, 175 संशयितांची चौकशी:पाकिस्तान-दुबई कनेक्शन; पूर्व विदर्भातील 10 जणांचा समावेश

महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) पाकिस्तान आणि दुबईतून भारताच्या विरोधात कारवाया करणाऱ्या शाजाद भट्टी या कुख्यात गँगस्टर आणि आयएसआयच्या हस्तकाच्या संशयास्पद जाळ्याचा पर्दाफाश केला आहे. राज्यभरातील तब्बल १७५ संशयित तरुण भट्टीच्या संपर्कात आल्याचे उघड झाल्यानंतर, एटीएसने आज सकाळी ७ वाजल्यापासून एकाच वेळी धडक शोध मोहीम सुरू केली. या कारवाईमुळे देशविरोधी शक्तींचे मोठे डिजिटल जाळे उघडकीस…

Read More

नंदुरबारमध्ये 'मुन्नाभाई'चे फेक महाविद्यालय?:विद्यार्थ्यांना डॉक्टर, नर्स, रुग्ण बनवून फसवले? MKD कॉलेजवर 'एनएसयूआय'चे आरोप

नंदुरबार येथील MKD महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांवर गंभीर अन्याय होत असल्याचे समोर आले आहे. विद्यार्थ्यांकडून बेकायदेशीररीत्या मोठ्या प्रमाणात पैसे उकळल्यापासून महिला विद्यार्थिनींच्या सन्मानाला धक्का पोहोचवणाऱ्या घटनांची ‘एनएसयूआय’ने पोलखोल केली आहे. महाविद्यालयातील स्वच्छतागृहात डस्टबिनची व्यवस्था नसल्यामुळे एका विद्यार्थिनीने वापरलेला सॅनिटरी पॅड कागदात गुंडाळून बाजूला ठेवला होता. त्यानंतर हा प्रकार कोणी केला हे शोधण्यासाठी प्रत्येक विद्यार्थिनीची हात…

Read More

सभागृहात चर्चा कमी, पायऱ्यांवरच शिव्याशाप जास्त:एकनाथ शिंदेंनी विरोधकांवर साधला निशाणा; म्हणाले- विरोधी पक्ष गोंधळलेला आणि भरकटलेला

विधान परिषदेच्या सभागृहात बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, हे अधिवेशन लोकांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी असते. परंतु, इकडे सभागृहात चर्चा कमी आणि तिकडे पायऱ्यांवर, मीडियासमोर आणि शिव्याशाप देतात. विरोधक हा गोंधळलेला आणि भरकटलेला विरोधी पक्ष असल्याचे पाहायला मिळाले. बहुमत असले आमच्याकडे तरी सुद्धा लोकशाहीत विरोधी पक्षातल्या सदस्यांचे म्हणणे ऐकून घेणारे आहोत. अशी चर्चा व्हायला पाहिजे होती,…

Read More

हिंगोलीत पहाटे अवैध वाळू वाहतूक करणारा टिप्पर जप्त:15.10 लाखांचा मुद्देमालही हस्तगत, दोघांवर गुन्हा दाखल

हिंगोली शहरात पोलिसांची नजर चुकवून भल्या पहाटे वाळू वाहतूक करणारे टिप्पर पोलिसांच्या पथकाने शुक्रवारी ता. १० पहाटे साडेपाच वाजता पकडले आहे. यामध्ये टिप्परसह १५.१० लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून दोघांवर हिंगोली शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. हिंगोली जिल्हाभरात अवैध व्यवसाय बंद करण्यासाठी पोलिस विभागाने कंबर कसली आहे. शहरी व ग्रामीण भागातून…

Read More

आमचा कोणताही नगरसेवक फुटणार नाही:निधीची अडवणूक सुरू, 5-6 जणांशी संपर्क साधणारे एजंट उघडे पाडू- केशव पोरजे

नाशिक महानगरपालिकेतील ठाकरेंच्या शिवसेनेचे 10 ते 12 नगरसेवक शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याच्या चर्चेने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडवून दिली होती तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत लवकरच ‘मेगा इन्कमिंग’ पाहायला मिळणार आहे, असा अत्यंत मोठा दावा राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केला आहे. केवळ नाशिक महानगरपालिकाच नाही, तर संपूर्ण महाराष्ट्रातील अनेक नगरपालिका, नगरपंचायती…

Read More

संभाजीनगरमध्ये गुन्हेगारीचा कळस:सपासप वार करून अल्पवयीन आरोपीचा 'भाई' स्टाईलने पळ, हत्येचा थरारक VIDEO समोर

घराच्या ओट्यावर बसून तरुणांना वाईट संगतीपासून दूर राहण्याचा सल्ला देणे एका ५० वर्षीय व्यक्तीच्या जीवावर बेतले आहे. मुकुंदवाडी परिसरात एका १५ वर्षांच्या अल्पवयीन मुलाने चाकूने सपासप वार करून रोहिदास दत्तू खकाळ (वय ५०) यांची अत्यंत निर्घृण हत्या केली. बुधवारी (८ जुलै) मध्यरात्री घडलेल्या या थरारक घटनेने संपूर्ण परिसर हादरला असून, आता या हत्याकांडाचा अंगावर काटा…

Read More

शेतकरी कर्जमाफीची अंमलबजावणी पुन्हा लांबणीवर:राज्य सरकारला केंद्राच्या डेटाची प्रतीक्षा; शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसली- नाना पटोले

महायुती सरकारने जाहीर केलेल्या ‘पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर शेतकरी कर्जमाफी योजने’ची अंमलबजावणी पुन्हा एकदा लांबणीवर पडली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, राज्य सरकारने केंद्र सरकारकडे शेतकऱ्यांच्या आयकर संदर्भातील माहिती मागवली असून, हा अधिकृत डेटा हाती आल्यानंतरच कर्जमाफीच्या निर्णयाची प्रत्यक्षात अंमलबजावणी केली जाणार आहे. ही माहिती मिळण्यासाठी किमान पाच ते सहा दिवसांचा कालावधी लागण्याची शक्यता असल्याने, पुढील आठवड्यात…

Read More

Amin Patel Vs Nitesh Rane Over Muslim Reservation; Assembly Gondhal

मुस्लिम समाजाच्या शैक्षणिक आरक्षण, शिष्यवृत्ती आणि मौलाना आझाद फायनान्स कॉर्पोरेशनच्या प्रश्नावरून विधानसभेत जोरदार चर्चा रंगली. काँग्रेस आमदार अमिन पटेल यांनी सरकारला थेट सवाल करत अल्पसंख्याक विभाग निष्क्रिय झाल्याचा आरोप केला. त्यांच्या भाषणादरम्या . ‘अल्पसंख्याक विभाग बंद पडल्यासारखी अवस्था’ – अमिन पटेल अमिन पटेल यांनी सांगितले की, महाराष्ट्रात अल्पसंख्याक समाज मुख्य प्रवाहात यावा यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री…

Read More