Headlines

लासलगाव सायकलिस्ट क्लबची 7 वी वारी पंढरपूरसाठी मार्गस्थ:निरोगी जीवनशैलीचा प्रसार आणि पर्यावरण संवर्धनाबाबत जनजागृती‎

आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर विठ्ठलभक्ती आणि सायकलिंगचा एक अनोखा संगम शुक्रवारी लासलगावात पाहायला मिळाला. लासलगाव सायकलिस्ट क्लबतर्फे आयोजित करण्यात आलेली ७ वी पंढरपूर सायकलवारी मोठ्या उत्साहात आणि भक्तीमय वातावरणात मार्गस्थ झाली. विंचूर रोडवरील श्री दत्त मंदिर येथून सायकलपटूंनी आपल्या ३६० किलोमीटरच्या प्रवासाला प्रारंभ केला. यंदाच्या सायकलवारीचे आकर्षण म्हणजे १५ वर्षांचा अर्णव ठाकरे व ७० वर्षीय विजय…

Read More

टंचाई कायम:हरसुलला खतांसाठी पहाटेपासून रांगा, बफर स्टॉक सर्वसामान्यांना खुला करण्याची मागणी‎

या आदिवासीबहुल परिसरामध्ये भात लागवडीच्या ऐन हंगामात खतांची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. खत मिळवण्यासाठी पुन्हा एकदा शेतकऱ्यांमध्ये मोठा गोंधळ उडाला. दिवसभरात कृषी विभागाच्या मध्यस्थीनंतर सहकारी संस्था व खत विक्रेत्यांना ६८३ गोणी खताचे वाटप करण्यात आले असले, तरी परिस्थिती अद्यापही तणावपूर्ण आहे. सहकारी संस्थेत केवळ सभासदांनाच खत दिले जात असल्याने सर्वसामान्य शेतकरी खासगी विक्रेत्यांवर अवलंबून…

Read More

स्वच्छ सुंदर बसस्थानकाचा दावा, मात्र प्रत्यक्षात चिखल-गैरसोयींचा सामना:सटाणा बसस्थानकाच्या आवार कार्यशाळेची दुरवस्था, प्रवासी हैराण‎

राज्यस्तरीय ‘स्वच्छ सुंदर बसस्थानक अभियान २०२५-२६’मध्ये सलग दुसऱ्यांदा प्रादेशिक स्तरावर प्रथम क्रमांक मिळवून १० लाख रुपयांचे पारितोषिक पटकावलेल्या सटाणा बसस्थानकातील आगार कार्यशाळेत चिखल, दुर्गंधी, अस्वच्छता आणि पिण्याच्या पाण्याच्या अपुऱ्या सुविधां . आगाराच्या कार्यशाळा आवारात पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात पाणी साचून चिखलाचे साम्राज्य निर्माण होते. उन्हाळ्यात धुळीचा त्रास तर पावसाळ्यात चिखलामुळे कर्मचाऱ्यांना दैनंदिन कामकाज करताना अडचणींचा सामना…

Read More

‘एसआयआर'च्या कामात दिरंगाई केल्यास कारवाई:जिल्हाधिकारी गौडा यांचा कर्मचाऱ्यांना इशारा‎

शासनाच्या वतीने आयोजित विशेष संक्षिप्त पुनरीक्षणाचे उद्दिष्ट लवकरात लवकर पूर्ण करावे. या राष्ट्रीय महत्त्वाच्या कामात हलगर्जीपणा करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कठोर प्रशासकीय कारवाई करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी दिला. कन्नड येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. तालुक्यात केवळ १७ टक्केच उद्दिष्ट पूर्ण झाल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित यंत्रणेची झाडाझडती घेतली. उपविभागीय…

Read More

पाडळी ग्रामस्थांचे पैठणच्या पंचायत समितीसमोर ‘ढोल बजाव’ आंदोलन:रोजगार हमी योजनेंतर्गत घरकुले, विहिरीची थकीत बिले देण्याची मागणी ‎

रोजगार हमी योजनेअंतर्गत मंजूर झालेली घरकुले, सिंचन विहिरी आणि गाय गोठ्यांची कामे पूर्ण करूनही गेल्या दोन वर्षांपासून हक्काचा मोबदला न मिळाल्याने पैठण तालुक्यातील पाडळी-गाजीपूर येथील ग्रामस्थ आक्रमक झाले असून, शुक्रवारी पंचायत समिती येथे ढोल बजाव आंदो . काम पूर्ण होऊन दोन वर्षे उलटली, तरी बिले थकीत असल्याने लाभार्थ्यांची कोंडी झाली आहे. याबाबत पंचायत समितीकडे वारंवार…

Read More

दिगाव येथे पतीच्या निधनाचा धक्का असह्य:4 तासांत पत्नीनेही सोडले प्राण, पती हरी सुसुंद्रे यांचे दीर्घ आजाराने तर पत्नी भागाबाई यांचे ह्रदयविकाराने निधन‎‎

. सुख-दुःखात सोबत राहू आणि मृत्यूच्या दारातही साथ निभावू, या उक्तीची प्रचिती देणारी हृदयद्रावक घटना कन्नड तालुक्यातील दिगाव येथे घडली आहे. सुसुंद्रे कुटुंबातील वृद्ध पती-पत्नीचा अवघ्या चार तासांच्या अंतराने मृत्यू झाला असून, या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. दिगाव येथील रहिवासी हरी सांडू सुसुंद्रे (८०) यांचे गुरुवारी (९ जुलै) रात्री १० वाजेच्या सुमारास दीर्घ…

Read More

‘कलम 155’ चा गैरवापर भोवला:पुणे उपजिल्हाधिकाऱ्यांसह 15 निलंबित, महसूलमंत्र्यांची विधान परिषदेत घोषणा

जमिनीच्या रेकॉर्डमध्ये फेरफार करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या ‘कलम १५५’चा गैरवापर करणाऱ्या महसूल विभागातील १५ अधिकाऱ्यांवर अखेर निलंबनाची कुऱ्हाड पडली. दिव्य मराठीने २९ जून रोजी कलम १५५ चा वापर करून राज्यभरात सरकारी जमिनी लाटण्याचे राज्यभर रॅकेट असल्याचे समोर आणले होते. या वृत्ताचे विधान परिषदेत पडसाद उमटले आहेत. शुक्रवारी (१० ज़ुलै) महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पुणे विभागातील पुण्यातील…

Read More

मोशी दुर्घटना, 56 तासांनंतरही कचऱ्यात दबलेल्यांचा थांगपत्ता नाही:45 मीटर उंच कचऱ्याच्या डोंगराजवळ इमारत बांधल्यानेच 8 जीव धोक्यात

पिंपरी-चिंचवड येथील मोशी डेपोत कचऱ्याच्या ढिगाऱ्याखाली बुधवारी दुपारी दीड वाजता दबलेल्या ८ जणांचा शुक्रवारी रात्री साडेनऊ वाजेपर्यंत थांगपत्ता लागला नाही. एकूण परिस्थिती पाहता आठही जणांचा जीव धोक्यात आहे. येथे सुमारे ४५ मीटर उंच कचऱ्याच्या डोंगराजवळ . पिंपरी-चिंचवडमध्ये गेली ४० वर्षे दररोज १२०० ते १३०० मेट्रिक टन कचरा गोळा होऊन मोशीतील ८५ एकर जागेत जमा होतो….

Read More

पं. डॉ. विकास कशाळकर अमृतमहोत्सवानिमित्त सत्कार सोहळा:शास्त्रीय संगीतातील विद्वानांचे संगीत रंगभूमीला योगदान मोलाचे: सुरेश साखवळकर

ज्येष्ठ शास्त्रीय गायक आणि संगीतकार पं. डॉ. विकास कशाळकर यांच्या अमृतमहोत्सवानिमित्त आयोजित सत्कार सोहळ्यात ज्येष्ठ संगीत रंगभूमी कलावंत सुरेश साखवळकर यांनी त्यांचे कौतुक केले. शास्त्रीय संगीतातील विद्वानांनी संगीत रंगभूमीला दिलेले योगदान मोलाचे असल्याचे साखवळकर म्हणाले. साखवळकर यांनी नमूद केले की, शास्त्रीय संगीतातील विद्वानाने संगीत नाटक लिहिणे, त्याला संगीत देणे आणि ते रंगभूमीवर आणणे हा एक…

Read More

27 हजार वारकऱ्यांची आरोग्य तपासणी:11,500 चष्मे वाटप, श्रीमंत दगडूशेठ ट्रस्ट व सुवर्णयुग मंडळातर्फे आरोग्य शिबिराचे आयोजन

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट आणि सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे जय गणेश रुग्णसेवा अभियानांतर्गत वारकऱ्यांसाठी आरोग्य व नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. उत्सवाची पारंपरिक जागा असलेल्या जय गणेश प्रांगण येथे झालेल्या या शिबिरात २७ हजार ५६४ हून अधिक वारकऱ्यांची तपासणी करण्यात आली. यासोबतच, ११ हजार ५०० भाविकांना चष्मे वाटप करण्यात आले. या आरोग्य…

Read More