Headlines

अमरावती जिल्ह्यातील सोयाबीन उत्पादकांना नुकसान भरपाई द्या:खासदार बळवंत वानखडे यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

अमरावती जिल्ह्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना निकृष्ट आणि कमी उगवणशक्तीचे बोगस बियाणे विकल्यामुळे मोठे नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर खासदार बळवंत वानखडे यांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे. जिल्ह्याच्या अनेक भागांत शेतकऱ्यांना निकृष्ट दर्जाचे सोयाबीन आणि तूर बियाणे पुरवण्यात आल्याच्या अनेक तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. यामुळे शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात…

Read More

पंढरीच्या 50 वाऱ्या करणारे नानाजी गायकी यांचे निधन:85 व्या वर्षी वृद्धापकाळाने घेतला अखेरचा श्वास, निंभी येथे अंत्यसंस्कार

मोर्शी तालुक्यातील निंभी येथील प्रसिद्ध वारकरी आणि सेवानिवृत्त शिक्षक ह.भ.प. नानाजी गायकी यांचे शुक्रवारी वृद्धापकाळाने निधन झाले. ते ८५ वर्षांचे होते. त्यांच्या पार्थिवावर आज, शनिवारी, ११ जुलै रोजी सकाळी निंभी येथील मोक्षधाममध्ये विधीवत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांनी आपल्या आयुष्यात पंढरपूरच्या ५० वाऱ्या पूर्ण केल्या होत्या. नानाजी गायकी यांनी आपल्या हयातीत पंढरीच्या वारीचे अर्धशतक पूर्ण केले…

Read More

डॉ. अरुण मोंढे विश्व हिंदू परिषदेचे संपर्क प्रमुख:अमरावती महानगर शाखेत विशेष नियुक्ती

अमरावती येथील प्रसिद्ध समाजसेवक डॉ. अरुण मोंढे यांची विश्व हिंदू परिषदेच्या (विहिंप) अमरावती महानगर शाखेतील विशेष संपर्क विभागाच्या प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे. ही घोषणा श्री क्षेत्र तपोवनेश्वर संस्थान, बोडणा येथे आयोजित विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाच्या जिल्हास्तरीय अभ्यास वर्गात करण्यात आली. या अभ्यास वर्गाला विहिंपचे प्रांत संघटन मंत्री विष्णू देशमुख, जिल्हाध्यक्ष अनिल साहू,…

Read More

ढोरेगाव शाळेत 'दप्तरमुक्त शनिवार' उपक्रम:विद्यार्थ्यांना आधुनिक शेती, पोषणमूल्ये व अन्नसुरक्षेचे धडे

छत्रपती संभाजीनगर येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा, ढोरेगाव येथे ‘आनंददायी, दप्तरमुक्त शनिवार’ उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांमध्ये आधुनिक शेतीबाबत वैज्ञानिक दृष्टिकोन आणि शेतीविषयक ज्ञानाची आवड निर्माण व्हावी, हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता. अजित सीड कंपनीचे प्रॉडक्शन मॅनेजर मोमीन शफी यांनी यावेळी विशेष मार्गदर्शन केले, ज्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये आधुनिक कृषी, पोषण आणि अन्नसुरक्षेविषयी जागरूकता…

Read More

शिवसेना प्रवेशानंतर ओमराजे निंबाळकर अ‍ॅक्शन मोडमध्ये:फडणवीस-शिंदेंची भेट घेत धाराशिवसाठी मांडल्या मोठ्या मागण्या

शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर अ‍ॅक्शन मोडमध्ये दिसून आले आहेत. निंबाळकर यांनी मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची स्वतंत्र भेट घेऊन धाराशिव लोकसभा मतदारसंघातील प्रलंबित प्रश्न आणि जनहिताच्या विविध मागण्यांचे निवेदन सादर केले. शेतकरी, सिंचन, पाणी, वीज, उद्योग, रोजगार आणि तुळजाभवानी मंदिरातील भाविकांच्या सुविधांसह अनेक महत्त्वाच्या विषयांवर दोन्ही नेत्यांशी सविस्तर…

Read More

श्रीमंत भाऊसाहेब रंगारी ट्रस्टतर्फे वारकऱ्यांसाठी आरोग्य शिबीर:8 ते 10 हजार वारकऱ्यांनी घेतला लाभ

आषाढी वारीनिमित्त पंढरपूरकडे प्रस्थान केलेल्या वारकऱ्यांसाठी पुणे शहरात विविध सेवाभावी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट आणि कै. श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्त मंदिर ट्रस्टने वारकऱ्यांसाठी आरोग्य शिबिर, महाप्रसाद आणि इतर सुविधा उपलब्ध करून दिल्या. श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टच्या वतीने वारकऱ्यांसाठी मोफत भोजन व्यवस्था, आरोग्य शिबिर, औषध वाटप तसेच चरण…

Read More

मिटमिटात 5.26 कोटींची बेहिशोबी रोकड जप्त:गुन्हे शाखेच्या छाप्यात साडेसहा हजार काडतुसे, 21 शस्त्रेही सापडली

छत्रपती संभाजीनगर शहरातील मिटमिटा परिसरात गुन्हे शाखा आणि आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने शुक्रवारी (१० जुलै) रात्री उशिरा एका घरावर छापा टाकून मोठी कारवाई केली. या कारवाईत तब्बल ५ कोटी २६ लाख २९ हजार ५६० रुपयांची बेहिशोबी रोकड, साडेसहा हजार जिवंत काडतुसे, २१ विविध प्रकारची घातक हत्यारे, विदेशी दारू आणि सोने-चांदीचे दागिने असा एकूण ५ कोटी…

Read More

मुंबई मनपाच्या महासभेत महापौर-विरोधक आमनेसामने:ट्रोलिंग, धमक्या, पावसाळी दुर्घटना आणि प्रशासनाच्या कारभारावर जोरदार खडाजंगी

मुंबई महापालिकेच्या महासभेत शुक्रवारी सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार शाब्दिक चकमक पाहायला मिळाली. मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी मरिन ड्राईव्हवरील व्हायरल व्हिडिओवरून झालेल्या ट्रोलिंगला सभागृहातून सडेतोड उत्तर दिले, तर दुसरीकडे माजी महापौर तथा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांनी प्रशासनाच्या कारभारावर, पावसाळ्यातील दुर्घटनांवर आणि वाढत्या कंत्राटांवरून सत्ताधाऱ्यांना धारेवर धरत आक्रमक भूमिका घेतली. ‘मी रीलस्टार की…

Read More

Solapur Farmers Threaten Migration Over MSEDCL Power Crisis

सोलापूर जिल्ह्यातील सीमावर्ती भागातील नागरिकांनी आणि शेतकऱ्यांनी वीज व पाण्याच्या तीव्र टंचाईवरून राज्य सरकारविरोधात थेट आणि आक्रमक पवित्रा घेतला आहे. “भीमा नदीकाठावरील ग्रामस्थांना शेतीसाठी हक्काची वीज आणि पाणी द्या, अन्यथा आम्हाला थेट कर्नाटक राज्य . भीमा नदीकाठच्या गावांमधील वीज संकटाची माहिती देताना शेतकऱ्यांनी प्रशासकीय दुजाभावावर तीव्र बोट ठेवले आहे. ‘एल निनो’च्या संभाव्य संकटाचे कारण पुढे…

Read More

मोशी कचरा डेपो दुर्घटना:आई-वडील गावात पापड विकायचे; मुलाने पुण्यात सुखाचा संसार थाटला, पण मोशीतील दुर्घटनेने सर्व काही संपवले

मोशी येथील कचरा डेपोच्या प्रशासकीय इमारतीवर कचऱ्याचा ढिगारा कोसळून झालेल्या भीषण दुर्घटनेत एका उच्चशिक्षित तरुण कर्मचाऱ्याला आपले प्राण गमवावे लागले आहेत. भावेश मोहन वाणी (वय ३३ वर्षे) असे या मृत तरुणाचे नाव आहे. भावेश हे रुपीनगर (निगडी) येथे राहत असून, ते मूळचे जळगाव जिल्ह्यातील शिरसोली गावचे रहिवासी होते. त्यांच्या या आकस्मिक जाण्याने वाणी कुटुंबाचा एकमेव…

Read More