Headlines

सात वर्षीय मुलीसह विवाहित महिला बेपत्ता:मोर्शी पोलिसांत तक्रार दाखल, शोध सुरू

मोर्शी तालुक्यातील येरला येथून एक २८ वर्षीय विवाहित महिला आपल्या सात वर्षांच्या मुलीसह बेपत्ता झाली आहे. या प्रकरणी मोर्शी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून, पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. बेपत्ता झालेल्या महिलेचे नाव अंकिता उमेश पंडागरे (वय २८) असून, तिच्यासोबत तिची सात वर्षांची मुलगी आर्या उमेश पंडागरे ही देखील आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,…

Read More

महाराष्ट्राने नाकारलं, ठाकरे आता तामिळनाडूत मुख्यमंत्रीपद शोधताय का?:भोपळा मिळवल्याबद्दल ट्रम्प यांनी ठाकरेंचे अभिनंदन करायला हवे होते- नवनाथ बन

तामिळनाडूमध्ये कोणाला सत्तास्थापनेसाठी बोलवायचे यासाठी राज्यपाल समर्थ आहेत.संजय राऊत यांनी राज्यपाल बनू नये. लोकभावनेचा आदर राखण्याचे काम राज्यपालांकडून करण्यात येईल. सत्ता गेल्यापासून उद्धव ठाकरे आणि संजय राऊत हे अस्वस्थ आहेत, तुम्हाला वाटत असेल की तामिळनाडूमध्ये उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपदाची संधी मिळावी तर तुम्ही एक पत्र घेऊन जावे की महाराष्ट्रातील जनतेने आम्हाला घरी बसवले किमान तामिळनाडूमध्ये तरी…

Read More

अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार ठार:सातरगाव मार्गावर भीषण अपघात, एक गंभीर जखमी

सातरगाव ते राजूरवाडी मार्गावर बुधवारी रात्री उशिरा एका अज्ञात वाहनाने दुचाकीला धडक दिल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार झाला असून, एक जण गंभीर जखमी झाला आहे. अविनाश ज्ञानेश्वर भलावी (वय ३०, रा. सत्तरपूर वडाळा, ता. आष्टी) असे मृतकाचे नाव आहे. सुनील उईके (वय ४०, रा. सत्तरपूर वडाळा, ता. आष्टी) हे जखमी झाले…

Read More

किलबिलाट:महापौर उद्यानात मोबाईल सुटला अन् मातीचे खेळ रंगले, शेकडो विद्यार्थ्यांचा सहभाग, मैदानी खेळांसोबतच ”जिजाऊ-शिवरायांच्या” संस्कारांची शिदोरी

आजच्या डिजिटल युगात जिथे बालपण मोबाईलच्या स्क्रीनमध्ये हरवत चालले आहे, तिथे सावेडीतील महापौर उद्यानाने एक वेगळाच आदर्श घालून दिला आहे. निमित्त आहे, माजी महापौर बाबासाहेब वाकळे यांच्या वतीने आयोजित केलेल्या ‘समर कॅम्प’चे. रणरणत्या उन्हातही सायंकाळच्या . टीव्ही आणि व्हिडिओ गेम्सच्या आभासी जगातून बाहेर काढून मुलांना पुन्हा एकदा मातीच्या खेळात रमवण्यासाठी या शिबिराचे आयोजन करण्यात आले…

Read More

मनोहर भोसलेनंतर माढ्यात आणखी एका भोंदू बाबाचा पर्दाफाश:वीरकर महाराज आश्रमातून ताब्यात; पैशांचा पाऊस पडेल म्हणत फसवणूक

सोलापूर जिल्ह्यात भोंदू बाबांविरोधातील कारवाईचा धडाका सुरू असतानाच आणखी एका स्वयंघोषित महाराजाचा पर्दाफाश झाला आहे. मनोहर भोसले उर्फ मनोहर मामाच्या अटकेनंतर आता माढा तालुक्यातील आडेगाव येथील नाना महाराज उर्फ गुरु माऊली वीरकर याला टेंभुर्णी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. फसवणूक, जादूटोणा आणि लोकांची दिशाभूल केल्याच्या आरोपांमुळे वीरकर महाराज अडचणीत आला आहे. पहाटेच्या सुमारास पोलिसांनी आश्रमावर छापा…

Read More

अक्कलकोटमध्ये स्वामीनामाचा गजर लिखित नामजप ग्रंथांची निघाली दिंडी:विश्वशांतीसाठी प्रार्थना, राज्यभरातून आलेल्या ग्रंथांचे स्वामी चरणी अर्पण‎

श्री स्वामी समर्थ महाराज प्रकट दिन ते पुण्यतिथी महोत्सवाचे औचित्य साधून अक्कलकोट नगरीत ‘ओम श्री स्वामी समर्थ’ नामाचा महाघोष ऐकायला मिळाला. समर्थ नगरी परिवाराच्या वतीने राज्यभर राबवण्यात आलेल्या लिखित नामजप सोहळ्यातील ग्रंथांची बुधवारी भव्य दिंडी मिरव . बुधवारी सायंकाळी ५ वाजता श्री खंडोबा मंदिर येथे या सोहळ्याला प्रारंभ झाला. सुधाकर महाराज इंगळे, सैदप्पा इंगळे, वनिताताई…

Read More

अवकाळी पावसाची हजेरी,‎ तापमानाचा पारा 40 अंशांवर‎:बार्शीटाकळी, मूर्तिजापूर तालुक्यात पावसाच्या सरी

मंजू अकोला तालुक्यातील बोरगावमंजू, काटेपूर्णा, वणी रंभापूर, पातूर नंदापूर आदी गाव आणि परिसरात मध्यम स्वरूपाच्या तसेच बार्शीटाकळी तालुक्यातील पिंजर व मूर्तिजापूर आणि पातूर तालुक्यात काही ठिकाणी तुरळक पावसाने हजेरी लावल्याने वातावरणात काहीसा गारवा निर्माण झाला आहे. त्यामुळे नागरिकांना उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळाला आहे, दिवसभराच्या कमाल तापमानात घट झाली ७ मे रोजी कमाल तापमान ४०.१ अंश…

Read More

मोहोळच्या विकासाला मुंबईतून ग्रीन सिग्नल:उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसोबत सकारात्मक चर्चा; आमदार राजू खरे यांच्या पाठपुराव्याला यश‎

मोहोळ विधानसभा मतदारसंघाचा चेहरामोहरा बदलण्यासाठी आमदार राजू खरे यांनी मुंबईत जोरदार फिल्डिंग लावली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन आमदार खरे यांनी मतदारसंघातील रखडलेल्या प्रकल्पांचा पाढा वाचला. या भेटीत उपमुख्यमंत्र्यांनी अत्यंत सकारात्मक प्रतिसाद देत आमदार खरे यांनी सुचवलेल्या दोन महत्त्वाच्या विकासकामांसाठी तब्बल १० कोटी रुपयांचा निधी तातडीने मंजूर केला आहे. यामुळे मतदारसंघातील विकासकामांना…

Read More

मिरजगावात बेशिस्त पार्किंगचा विळखा:पादचाऱ्यांचा जीव टांगणीला‎, नागरी हक्क, सुरक्षिततेचा प्रश्न; कायमस्वरूपी नो-पार्किंग झोन जाहीर करण्याची गरज

मिरजगाव येथे मुख्य रस्त्यावर अशी वाहने उभी असतात. त्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होतो. उपाययोजना करण्याची नागरिकांची मागणी रस्त्याच्या दुतर्फा उभ्या राहणाऱ्या वाहनांमुळे ज्येष्ठ नागरिक रस्त्यावर पडल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे सिमेंट रस्त्यावर वाहने उभी केल्यास तत्काळ दंड आकारला जावा. पोलीस आणि ग्रामपंचायत प्रशासनाने निर्ढावलेली भूमिका सोडून रस्त्यावर उतरणे आवश्यक आहे. रस्त्यावरील अतिरिक्त अडथळे दूर करून…

Read More

जिल्हा बँकेवर ” प्रशासक’ राज; “त्या’ बड्या नेत्यांची सद्दी संपली:दिग्गजांच्या एक्झिटमुळे नव्या चेहऱ्यांच्या आशा झाल्या पल्लवित‎

. जिल्ह्याच्या ग्रामीण अर्थकारणाची ‘लाइफलाइन’ समजल्या जाणाऱ्या जिल्हा सहकारी बँकेवर अखेर सहकार विभागाने प्रशासकाची नियुक्ती केली आहे. संचालक मंडळाची मुदत संपूनही निवडणूक प्रक्रिया लांबणीवर पडल्याने हा निर्णय घेण्यात आला. या निर्णयामुळे अकोले तालुक्यातील सीताराम गायकर, अमित भांगरे आणि मधुकरराव नवले या ‘त्रिमूर्ती’सह संपूर्ण संचालक मंडळ पदमुक्त झाले आहेत. सहकार विभागाने मार्चअखेर निवडणूक प्रक्रियेचे बिगुल वाजवले…

Read More