Headlines

रायगडमध्ये शिंदेसेना-काँग्रेस एकत्र; म्हसळा नगरपंचायतीत राष्ट्रवादीची सत्ता उलथली:नगराध्यक्षांच्या केबिनमधून हटवला तटकरेंचा फोटो

रायगड जिल्ह्यातील म्हसळा नगरपंचायतीत मोठा राजकीय उलटफेर झाला असून शिंदे गटाची शिवसेना आणि काँग्रेस यांनी एकत्र येत सत्ता स्थापन केली आहे. नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत शिवसेनेने बाजी मारत नगरपंचायतीवर भगवा फडकवला. गेली दहा वर्षे राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात असलेल्या म्हसळा नगरपंचायतीत आता सत्तांतर झाल्याने खासदार सुनील तटकरे आणि मंत्री अदिती तटकरे यांना मोठा राजकीय धक्का बसल्याची चर्चा…

Read More

सुनेत्रा पवारांच्या रिक्त जागेसाठी राष्ट्रवादीत चुरस:'राज्यसभेसाठी माझा आग्रह नाही', खासदारकीच्या चर्चेवर छगन भुजबळांचे मोठे विधान

सुनेत्रा पवार बारामती विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आल्यानंतर त्यांनी राज्यसभेच्या खासदारकीचा राजीनामा दिला आहे. यामुळे रिक्त झालेल्या या जागेवर कोणाची वर्णी लागणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले असून पक्षात हालचालींना वेग आला आहे. या जागेसाठी ज्येष्ठ नेते मंत्री छगन भुजबळ यांचे नाव चर्चेत होते, मात्र त्यांनी या चर्चांना पूर्णविराम दिला आहे. छगन भुजबळ म्हणाले…

Read More

पुण्यात प्रेमाचा थरार:लग्नास नकार देताच प्रियकराने चिरला प्रेयसीचा गळा; मृत्यूच्या दाढेतून भावाला केला VIDEO कॉल, तरुणीची मृत्यूशी झुंज

विद्येचे माहेरघर असलेल्या पुण्यात पुन्हा एकदा नात्यातील क्रूरता समोर आली आहे. चंदननगर परिसरातील पठारे वस्तीमध्ये एका माथेफिरू प्रियकराने आपल्याच प्रेयसीवर घरात घुसून प्राणघातक हल्ला केला. लग्नाचे बोलणे फिस्कटल्याच्या रागातून हा रक्ताचा खेळ खेळला गेल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. सध्या पीडितेची प्रकृती चिंताजनक असून, तिच्यावर उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती मिळताच चंदननगर पोलिसांनी तातडीने तपासचक्रं…

Read More

मी हाय तुझ्या पाठीशी, म्हावरं काप बिनधास्त:मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी मासळी बाजारातील कोळी भगिनींना केले आश्वस्त

वाकोला येथील मासळी बाजारात मासे कापण्यावर महानगरपालिकेने कोणतेही निर्बंध लादलेले नाहीत. त्यामुळे वाकोला सह मुंबईतील सर्व मासळी बाजारांमधील कोळी भगिनींनी आणि बांधवांनी निर्धास्तपणे आपला व्यवसाय करावा. त्यांच्या पाठीशी मुंबईची महापौर म्हणून मी स्वतः खंबीरपणे उभी आहे. “मी हाय तुझ्या पाठीशी, म्हावरं काप बिनधास्त”, अशा शब्दात मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी मासळी व्यावसायिकांना आश्वस्त केले आहे….

Read More

राऊतांनी हनुमंताच्या नव्हे, रावणाच्या गप्पा कराव्यात:भगव्याऐवजी हिरवा झेंडा असता तर राऊतांना आनंद झाला असता- नवनाथ बन

संजय राऊत यांनी हनुमंताच्या गप्पा करू नये. तुम्ही रावणाच्या गप्पा कराव्यात कारण तो तुमचे आराध्य झाला आहे. रावणाने जसा सीतामातेचे हरण केले तसाच त्रास तुम्ही महिलांना देता आहात, त्यामुळे प्रभु श्री राम आणि हनुमंताचे नाव घेऊ नका, तुम्हाला तो अधिकार नाही, असा टोला भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांनी संजय राऊत यांना लगावला आहे. तुम्ही रावणाचे…

Read More

नाशिकमध्ये विवाहितेने संपवलं आयुष्य:25 लाख, 21 तोळे सोने अन् तरीही छळ कायम; जादूटोण्याच्या नावानेही धमकावलं

नाशिक शहरातील जेलरोड परिसरात घडलेल्या एका धक्कादायक घटनेमुळे पुन्हा एकदा हुंडाबळी आणि महिलांवरील अत्याचाराचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. संसार सुखाचा व्हावा म्हणून माहेरकडून लाखो रुपये आणि सोनं देऊनही एका विवाहितेला सासरच्या छळाला सामोरं जावं लागलं. अखेर सततचा मानसिक आणि शारीरिक त्रास सहन न झाल्याने तिने टोकाचं पाऊल उचलत आपलं जीवन संपवलं. या घटनेनंतर परिसरात संतापाचं…

Read More

सोलापुरात 11 वर्षांच्या मुलावर अनैसर्गिक अत्याचार:धमकीमुळे पीडित बालक दहशतीत, आरोपीला 3 दिवसांची पोलिस कोठडी

सोलापूर शहरात माणुसकीला काळीमा फासणारी एक संतापजनक घटना समोर आली आहे. खेळणाऱ्या एका 11 वर्षांच्या अल्पवयीन मुलाला बळजबरीने घरात नेऊन त्याच्यावर अनैसर्गिक अत्याचार केल्याप्रकरणी जोडभावी पेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी या प्रकरणी सिद्धाराम उर्फ सिद्धया सलगर याला अटक केली असून, न्यायालयाने त्याला तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 4…

Read More

वृक्षतोडीमुळे उन्हाच्या झळा:सोलापुरात झाडी असलेल्या व्हीआयपी रोडवर दुपारी 1.30 वाजता पारा 40 अंश, 500 मीटरवरील रेल्वे स्टेशन मार्गावर मात्र 43 वर

‘झाडे लावा, झाडे वाचवा’ हा संदेश सातत्याने दिला जातो. मात्र तो गांभीर्याने घेतला जात नाही. आपल्या भागात, शहरात झाडे का आवश्यक आहेत? याचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी ‘दिव्य मराठी’ने एक प्रयोग केला. कडक उन्हात दुपारी 1.30 ते 2 या वेळेत आम्ही थर्मामीटरच्या सहाय्याने शहरातील दोन प्रमुख रस्त्यांवरील तापमान मोजले गेले. संगमेश्वर कॉलेजपासून ते जुना एम्प्लॉयमेंट चौकापर्यंत…

Read More

राजकारणात येऊन चुकलो का? महिलांवरील अत्याचारांवर रोहित पवारांची खंत:फास्टट्रॅक कोर्ट तरी न्याय कुठे? व्यक्त केली नाराजी

जळगाव जिल्ह्यातील भडगाव येथे एका पीडित कुटुंबाची भेट घेतल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी राज्यातील महिला सुरक्षेवर गंभीर चिंता व्यक्त केली. लहान मुली आणि महिलांवर होणाऱ्या अत्याचारांच्या घटनांबाबत बोलताना त्यांनी भावनिक प्रतिक्रिया दिली. राजकारणात असूनही जर चिमुकल्या मुलींना आणि महिलांना न्याय देता येत नसेल, तर आपण कुठेतरी फसलो किंवा चुकलो आहोत,…

Read More

सुदृढ आणि निरोगी जीवनासाठी मैदानी खेळ आवश्यक- वाकळे:महापौर उद्यानात समर कॅम्पला उत्साहात प्रारंभ, चिमुकल्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद‎

सुदृढ व निरोगी जीवनासाठी मुलांनी बालवयातच मैदानी खेळांची सवय लावणे अत्यंत आवश्यक आहे. आजची मुले ही उद्याच्या भारताचे उज्ज्वल भविष्य असून त्यांच्यात योग्य संस्कार आणि क्रीडावृत्ती निर्माण करणे काळाची गरज आहे, असे प्रतिपादन माजी महापौर बाबासाहेब वाकळे यांनी केले. संत तुकाराम महाराज प्रतिष्ठान सावेडी यांच्यावतीने महापौर उद्यान येथे ‘प्रिशा समर कॅम्प’चे आयोजन करण्यात आले असून…

Read More