Headlines

विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप‎:शालेय विद्यार्थ्यांची गुणवत्ता हीच विद्यालयाची खरी ओळख- काळे

प्राथमिक शिक्षण हा विद्यार्थ्यांच्या आयुष्याचा पाया असून या टप्प्यात मिळालेले शिक्षण आणि संस्कार विद्यार्थ्यांना आयुष्यभर उपयोगी पडतात. त्यामुळे शिक्षकांनी विद्यार्थ्यांमध्ये शिकण्याची आवड निर्माण करून त्यांची बौद्धिक क्षमता विकसित करावी. कोणत्याही शाळेची ओळख केवळ भव्य इमारती, आधुनिक सुविधा किंवा शिक्षकांच्या संख्येवरून होत नसते तर विद्यार्थ्यांची गुणवत्ता हीच त्या शाळेची खरी ओळख असते असे प्रतिपादन आमदार आशुतोष…

Read More

दावा- केतनला धक्का दिल्यानंतर सिया मदतीसाठी ओरडली:आई म्हणाली- मुलगी दोषी असेल तर तिलाही किल्ल्यावरून खाली फेका

पुण्यातील केतन अग्रवाल खून प्रकरणात नवीन खुलासा झाला आहे. केतनला ज्या लोहगड किल्ल्यावरून ढकलण्यात आले होते, तेथील रक्षकाने सांगितले की, त्याने सियाच्या ओरडण्याचा आवाज ऐकला होता. रक्षक धीरज जाधव यांच्या म्हणण्यानुसार, ओरडण्याचा आवाज ऐकून ते घटनास्थळी पोहोचले तेव्हा मुख्य आरोपी आणि सिया गोयल मदतीसाठी ओरडत होते. मी सिया गोयलला विचारले काय झाले, तेव्हा ती म्हणाली…

Read More

इर्विनमध्ये पाणी शिरल्याने जबाबदारांना निलंबित करा:शिवसेना (उबाठा) शहर प्रमुख हरमकर यांची मागणी‎

जिल्हा सामान्य रुग्णालय (इर्विन) गरीब रुग्णांचे देवस्थानच आहे. येथे पावसाची पाणी शिरून रुग्णांचे जे हाल झाले त्यासाठी जबाबदार असलेले जिल्हा शल्य चिकित्सक (सीएस) व महानगर पालिका आयुक्तांना तत्काळ निलंबित करून त्यांच्याविरोधात फौजदारी कारवाई करण्यात यावी, अशी मागणी शिवसेना उबाठा शहर प्रमुख प्रवीण हरमकर यांनी गुरुवार २५ रोजी जिल्हाधिकाऱ्या दिलेल्या निवेदनातून केली आहे. जिल्ह्यातील हजारो गरीब…

Read More

मनपा शाळांचा दर्जा सुधारण्यासाठी उपाययोजना करा- स्थायी सभापती

अकोला महानगरपालिकेच्या शाळांचे सत्र लवकरच सुरू होणार आहे. या पार्श्वभूमीवर महापालिकेचे स्थायी समिती सभापती विजय अग्रवाल यांनी गुरुवारी स्थायी समिती सभागृहात शिक्षण विभागाची आढावा बैठक घेऊन महापालिकेच्या शाळांचा शैक्षणिक दर्जा सुधारण्यासाठी उपाययोजनांबाबत अधिकाऱ्यांना निर्देश दिले. या बैठकीला नगरसेवक जयंत मसने, सभागृह नेते पवन महल्ले, नगरसेवक रफीक सिद्दीकी, सुनील मेश्राम, नितीन ताकवाले, रणजीत खेडकर उपस्थित होते….

Read More

अवैध गोवंश तस्करांवर मोठी कारवाई:15 गोवंशांना जीवदान; मुद्देमाल जप्त

अकोला स्थानिक गुन्हे शाखेने (एलसीबी) ऑपरेशन प्रहार अंतर्गत डबकी रोड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खैर मोहम्मद प्लॉट परिसरात एक मोठी कारवाई केली. या कारवाईत अवैध कत्तलीसाठी निर्दयीपणे डांबून ठेवलेल्या १५ गोवंशांची सुटका करण्यात आली असून, चार लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक नितीन लेकूरकर यांना गोपनीय बातमीदाराद्वारे माहिती…

Read More

प्रशासनाच्या ढिसाळ कारभाराविरोधात कुर्डुवाडीत सत्ताधारीच उतरले उपोषणाला:सभापती संजय टोणपे यांचे आंदोलन

कुर्डुवाडी नगरपरिषद प्रशासनाच्या ढिसाळ कारभाराविरोधात आणि शहरातील प्रलंबित विकासकामांसह शाळा-महाविद्यालयांती ल विद्यार्थ्यांच्या मूलभूत सुविधांच्या प्रश्नावर आता सत्ताधारी लोकप्रतिनिधीच आक्रमक झाले आहेत. वारंवार मागणी करूनही नागरी समस्यांचे विषय सर्वसाधारण सभेच्या अजेंड्यावर घेतले जात नसल्याच्या निषेधार्थ, नगरपरिषदेचे शिक्षण समिती सभापती संजय टोणपे यांनी गुरुवार, दि. २५ जून रोजी सकाळी ११ वाजल्यापासून नगरपरिषद कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषण सुरू…

Read More

माळशिरस तालुक्यात पाण्याअभावी पिके लागली जळू, शेतकरी चिंतेत:हाल खरिपाच्या पेरण्या खोळंबल्या; ऐन पावसाळ्यात 10 गावात पाण्याचे टँकर सुरू‎

गतवर्षी मे मध्येच वार्षिक सरासरीपेक्षा जादा पाऊस झालेल्या माळशिरस तालुक्यात यावर्षी खरिपाच्या पेरण्या तर अजून नाहीतच शिवाय वीज व पाण्याअभावी आहे ती पिके जळून चालली आहेत. ऐन पावसाळ्यात तालुक्यातील १० गावात पिण्याच्या पाण्याचे टँकर सुरु आहेत. . गतवर्षी १२ मे रोजीच मान्सून पूर्व पावसाचे आगमन झाले होते. दि. २९ मे पर्यंत जिल्ह्याची सरासरी २५.१ असताना…

Read More

लोकलमधील हत्याकांड:मयंककडून झालेल्या अपमानाचा बदला घ्यायचा म्हणून चाकूने भोसकले- रोशन, नार्वेकरांचे शासनास निवेदन सादर करण्याचे आदेश

मुंबईतील लोकलमध्ये हजारो प्रवाशांच्या उपस्थितीत भरदिवसा एका व्यक्तीचा खून झाल्याची घटना नुकतीच घडली. सार्वजनिक ठिकाणी घडलेल्या या गंभीर घटनेचे विधानसभेत तीव्र पडसाद उमटले. या पार्श्वभूमीवर, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी राज्य सरकार आणि गृह विभागाला या प्रकरणी जाब विचारला, तर काँग्रेसचे आमदार नाना पटोले यांनीही कायदा-सुव्यवस्थेच्या मुद्द्यावरून प्रशासकीय कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. आरोपी रोशन सुवर्णाची…

Read More

मनमाडमध्ये टर्फसाठी भाडेकरारास वंचित बहुजन आघाडीकडून विरोध:नगरपालिकेसमोर धरणे आंदोलन करत ठराव रद्द करण्याची मागणी‎

मनमाड नगरपालिकेने आययूडीपी विभागातील जागा टर्फसाठी भाडेकराराने देण्याचा घेतलेला निर्णय जनहितविरोधी असल्याचा आरोप करत वंचित बहुजन आघाडी शहर शाखेतर्फे बुधवारी सकाळी नगरपालिकेच्या प्रवेशद्वारासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. याबाबत पालिका प्रशासनाला निवेदन देण्यात आले. नगरपरिषद हद्दीतील आययूडीपी साईट क्रमांक १८ मधील जागा गोरगरीब व बहुजन समाजातील मुलांच्या मनोरंजनासाठी तसेच सार्वजनिक उद्यानासाठी राखीव ठेवण्याऐवजी ती खासगी वापरासाठी…

Read More

प्रत्येक महिलेने बचत गटात सहभागी होऊन स्वावलंबी बनावे- वासुदेव सोळंके:लासूरगावातील घरकुल महिला मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद‎

महिला सक्षमीकरण बाबतीत शासन निवेदनशील असल्याचे सांगून लासूरगावातील प्रत्येक घरातील महिलांनी बचतगटात सहभागी होऊन वेगवेगळे उद्योग व्यवसाय सुरू करावे. या रोजगाराच्या माध्यमातून महिलांनी स्वावलंबी बनण्याचा निर्धार करावा असे आवाहन जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी वासुदेव सोळंके यांनी केले आहे. लासूरगाव ता. वैजापुर येथे बुधवारी गावाकडे चला अभियानांतर्गत प्रधानमंत्री आवास योजना, राज्य पुरस्कृत घरकुल योजना…

Read More