शिऊरला जि.प. शाळेच्या छताचा भाग कोसळला:बुधवारी रात्री पाऊस झाल्याने अनर्थ टळला; शाळा दुरुस्तीची पालकांची मागणी
येथील धनगर वस्तीवरील जिल्हा परिषद शाळेच्या पडवीचे छत पहिल्याच मुसळधार पावसात बुधवारी रात्री अचानक कोसळले. सुदैवाने ही घटना रात्रीच्या वेळी घडल्यामुळे मोठी हानी टळली; यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या शाळेच्या इमारतीची अवस्था गेल्या अनेक दिवसांपासून जीर्ण झाली होती. छतातून पावसाचे पाणी सतत झिरपत होते. याबाबत शाळेच्या शिक्षकांनी ग्रामपंचायत, स्थानिक लोकप्रतिनिधी आणि शिक्षण…