महाविकास आघाडीच्या बैठकीला 23 आमदारांची दांडी:पावसाळी अधिवेशनादरम्यान एकजुटीवर प्रश्नचिन्ह; नेत्यांनी दिली स्पष्टीकरणे
विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला नुकतीच सुरुवात झाली असून सरकारच्या विरोधात रणनीती आखण्यासाठी महाविकास आघाडीने (MVA) बोलावलेल्या एका अत्यंत महत्त्वाच्या बैठकीला तब्बल 23 आमदारांनी पाठ फिरवल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. या अनुपस्थित आमदारांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, काँग्रेसचे नाना पटोले आणि विजय वडेट्टीवार यांसारख्या ज्येष्ठ नेत्यांचाही समावेश असल्याने महाविकास आघाडीचे टेन्शन…