Headlines

राज ठाकरेंच्या पाठीत खंजीर खुपसणारे आता एकत्र येण्याची भाषा करताय:राऊत केवळ तोंडाने गोळाफेक करू शकता, आंदोलनात तुमची कुवत शून्य- नवनाथ बन

महाराष्ट्राच्या आंदोलनात कुठेही नव्हतात. तुम्ही केवळ तोंडाने गोळाफेक करू शकता या पलीकडे तुमची काहीही कुवत नाही. देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न विचारण्यापूर्वी उद्धव ठाकरेंना प्रश्न विचारा की नारायण राणे, कंगना यांचे घरं कोणी तोडली होती? असा सवाल भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांनी केला आहे. ऑपरेशन टायगर, लांडगा ही भाषा संजय राऊतांना शोभत नाही, तुम्हाला ऑपरेशन गिधाडची…

Read More

खासदार भाऊसाहेब वाकचौरे 'नॉट रिचेबल':पीएलाही पत्ता नाही, उद्धव ठाकरेंनी बोलावलेल्या बैठकीपूर्वी मातोश्रीवर धाकधूक वाढली

महाराष्ट्र राज्याच्या राजकीय वर्तुळातून आज रविवारी (१४ जून) पुन्हा एकदा एका मोठ्या आणि खळबळजनक भूकंपाचे संकेत मिळत आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी ऑपरेशन टायगरच्या चर्चांच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील ‘मातोश्री’ निवासस्थानी पक्षाच्या सर्व नवनिर्वाचित खासदारांची अत्यंत महत्त्वाची आणि तातडीची बैठक बोलावली आहे. मात्र, या अत्यंत संवेदनशील बैठकीच्या काही तास आधीच शिर्डी लोकसभा…

Read More

कल्याणमधील भीषण अपघातात रीलस्टार प्रेम भाटीचा मृत्यू:कुटुंबावर शोककळा, रस्त्यावरील खडी अन् खड्ड्यांमुळे दुचाकी घसरल्याचा आरोप

सोशल मीडियावर आपल्या विनोदी आणि हॉरर रील्स तयार करणारा प्रेम भाटीचा भीषण अपघातात मृत्यू झाला. 13 जून रोजी पहाटेच्या सुमारास कल्याणमधील मोहने परिसरात रस्त्यावरील खड्डे आणि खडीमुळे दुचाकीवरून नियंत्रण सुटल्याने प्रेम भाटीचा दुर्दैवी अंत झाला. मिळालेल्या माहितीनुसार, प्रेम भाटी 13 जून रोजी पहाटे 3 वाजण्याच्या सुमारास दुचाकीवरून आपल्या घरी परतत होता. मोहने येथील शिवसेना शाखेजवळून…

Read More

उद्धव अन् राज ठाकरेंनी एकत्र येऊन देशाचे राजकारण करावे:धारावीत मराठी माणसाला हात लावला तर अदानींशी थेट टक्कर- संजय राऊत

जे लोक आमचा पक्ष फुटणार अशी आवई उठवत आहेत, त्यांची शिवसेना हे नाव घेण्याचीही पात्रता नाही. हे पळपुटे लोक आम्हाला काय शिकवणार? अशा शब्दांत खासदार संजय राऊत यांनी विरोधकांवर निशाणा साधला. ..तर यासोबतच त्यांनी ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याबाबत एक मोठे विधान केले आहे. संजय राऊत म्हणाले की, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आता महाराष्ट्राच्या राजकारणातून…

Read More

वाढत्या उन्हात शेतकऱ्यांची पिके जगवण्यासाठी कसरत:बागायत क्षेत्रात केलेल्या कपाशीच्या लागवडी उष्णतेने उगवणीपूर्वी जळू लागल्या‎

मृग नक्षत्र सुरू होऊनही राहुरी तालुक्यात अद्याप मान्सूनचे आगमन न झाल्याने बळीराजा पुरता चिंतेत सापडला आहे. जमिनीत उष्णता असल्याने अनेक शेतकरी पावसाची प्रतीक्षा करत आहेत. ज्या शेतकऱ्यांनी पाण्याची सोय असल्याने कपाशीची आगाऊ लागवड केली, त्यांच्यावर आता . मशागती आटोपल्या, पण कृषी विभागाचा ‘वेट अँड वॉच’चा सल्ला तालुक्यात खरिपाच्या शेतीची मशागत होऊन तब्बल दोन आठवडे उलटले…

Read More

मोहोळ शहरातील वाहतूक कोंडी रोखण्यासाठी बायपासची गरज:234 किमी लांबीच्या महामार्गाला सर्व्हिस रोड जोडल्याने अपघातांत वाढ‎

संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्ग (राष्ट्रीय महामार्ग-९६५) हा आळंदी ते पंढरपूरसह मोहोळ ते वाखरी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तो सुमारे २३४ किमी लांबीचा राष्ट्रीय महामार्ग आहे. पुणे, सातारासह सोलापूर जिल्ह्याला जोडणारा हा मार्ग आहे. या मार्गास ७,६२५ कोटी रुपयांच्या तरतुदीसह विकसित करण्यात येणार असल्याची माहिती रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी दिली आहे. मात्र…

Read More

गणपतीपुळेला जाणाऱ्या मित्रांचा भीषण अपघात:भरधाव कार 2-3 वेळा उलटली; एकाचा मृत्यू, दोघे जखमी; साताऱ्यातील घटना

सातारा जिल्ह्यातील कोरेगाव येथील एका खाजगी कंपनीत काम करणाऱ्या तीन मित्रांच्या पर्यटनाचा प्रवास अत्यंत दुर्दैवी आणि काळजाचा थरकाप उडवणारा ठरला आहे. शनिवार-रविवारच्या सुट्टीचा आनंद घेण्यासाठी कोकणातील प्रसिद्ध पर्यटन स्थळ असलेल्या गणपतीपुळे येथे निघालेल्या या मित्रांच्या चारचाकी कारचा मध्यरात्री कराड तालुक्यातील वडोली भिकेश्वर गावाजवळ भीषण अपघात झाला. या अपघातात बीड जिल्ह्यातील एका २३ वर्षीय तरुण अभियंत्याचा/कर्मचाऱ्याचा…

Read More

इर्ले येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार:कै.पाटील यांच्या स्मरणार्थ, 10 वी, 12 वी मधील यशवंतांचा गौरव‎

शिक्षणाचा वारसा जपत गुणवंत विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने इर्ले येथे पाटील परिवाराच्या वतीने कै. उद्धवरावजी पाटील व कै. अंबादास (नाना) पाटील यांच्या स्मरणार्थ आयोजित करण्यात आलेला गुणवंतांचा सत्कार व स्नेहमेळावा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. कार्यक्रमात गावातील गुणवंत विद्यार्थी, विविध क्षेत्रांत यश संपादन करणारे युवक-युवती, शिक्षक तसेच मान्यवरांचा गौरव करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच शालिनी…

Read More

नियुक्ती मोर्शीत असतानाही कामकाज अमरावतीतून सुरु; शेतकऱ्यांचा आरोप

पदोन्नतीद्वारे मोर्शी वन परिक्षेत्रात नियुक्ती मिळालेले सहाय्यक वनसंरक्षक (रोहयो व अतिक्रमण निर्मूलन) हे आपल्या अधिकृत नियुक्तीच्या ठिकाणी हजर न राहता अमरावती येथील मुख्य कार्यालयातूनच कामकाज करतात. त्यामुळे मोर्शी परिसरातील शेतकरी, वनहक्कधारक आणि सामान्य नागरिकांची मोठी हेळसांड होत असल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केला आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेने उपवनसंरक्षकांना यासंदर्भात निवेदन सादर करून सखोल चौकशीची मागणी…

Read More

येळवण येथे 30 गरजू महिलांना आधुनिक शिलाई मशीनचे वितरण:येळवण येथे महिला सक्षमीकरणाचा प्रेरणादायी साेहळा

ग्रामीण भागातील महिलांना स्वावलंबी, आत्मनिर्भर आणि सक्षम बनविण्याच्या उद्देशाने अदानी फाउंडेशनच्या वतीने राबवण्यात आलेल्या शिलाई प्रशिक्षण व शिलाई मशीन वितरण उपक्रमाला येळवण गावात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यशस्वीरीत्या एका महिन्याचे प्रशिक्षण पूर्ण केलेल्या ३० गरजू महिलांना आधुनिक शिलाई मशीन व शिलाई किटचे वितरण करण्यात आले. या उपक्रमामुळे महिलांच्या हाताला हक्काचा रोजगार मिळण्यास मदत होणार असून त्यांच्या…

Read More