Headlines

तुकाराम मुंढेंच्या बदलीच्या भानगडीत पडू नका, अन्यथा…:मनोज जरांगेंचा राज्य सरकारला थेट इशारा, नेमके काय म्हणाले जरांगे?

अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे आयुक्त म्हणून धडाकेबाज सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांनी राज्यात भेसळखोरांविरोधात उघडलेली धडक मोहीम सध्या मोठ्या चर्चेचा विषय ठरली आहे. त्यांच्या कारवाईच्या धास्तीने राज्यातील अनेक पानाच्या टपऱ्या बंद असल्याचे चित्र आहे. अन्नपदार्थांत भेसळ केल्याचे उघडकीस आल्यास थेट मकोका अंतर्गत गुन्हे दाखल करण्याचे कठोर आदेश मुंढे यांनी दिल्याने भेसळखोरांचे चांगलेच धाबे दणाणले…

Read More

रोहित पवारांचं उपोषण म्हणजे 'जरांगे स्टाईल नौटंकी:भाजप आमदार परिणय फुकेंची टीका, म्हणाले- 'अन्नत्याग'ऐवजी 'मीडिया त्याग' करावा

शेतकरी कर्जमाफीतील जाचक अटी रद्द करून सरसकट कर्जमाफी मिळावी, या प्रमुख मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी पंढरपूरमध्ये गेल्या दोन दिवसांपासून ‘अन्नत्याग आंदोलन’ सुरू केले आहे. त्यांच्या या आंदोलनाला विविध शेतकरी संघटना आणि विरोधी पक्षनेत्यांचा वाढता पाठिंबा मिळत असला तरी, सत्ताधारी नेत्यांकडून मात्र यावर जोरदार टीका केली जात आहे. आमदार सदाभाऊ…

Read More

अमरावती होमगार्ड कार्यालयाला कचऱ्याचा विळखा:नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर, प्रशासनावर संताप

अमरावती येथील काँग्रेस नगर रोडवरील गृहरक्षक दलाच्या (होमगार्ड) कार्यालयाची भिंत कचऱ्याने वेढली आहे. भिंतीलगत अनेक ठिकाणी कचऱ्याचे ढिगारे साचले आहेत. बाजूलाच मुख्य रस्ता असल्याने या कचऱ्यातून निर्माण होणारे जीवजंतू नागरिकांच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरत आहेत. यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला असून, प्रशासनाने याकडे तातडीने लक्ष द्यावे, अशी मागणी पुढे आली आहे. नागरिकांच्या मते, वारंवार तक्रारी…

Read More

शाळा 15 ऐवजी 30 जूनपासून सुरू:विदर्भातील उष्णतामान, न्यायालयीन निर्देशामुळे शिक्षण विभागाचा निर्णय

अमरावती जिल्ह्यातील सीबीएसई आणि राज्य मंडळाशी संलग्न असलेल्या सर्व प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळा आता १५ जूनऐवजी ३० जूनपासून सुरू होतील. विदर्भातील सध्याचे उष्णतामान, विद्यार्थ्यांचे आरोग्य आणि मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे निर्देश लक्षात घेऊन शिक्षण विभागाने हा निर्णय घेतला आहे. शिक्षणाधिकारी (माध्यमिक) यांनी जिल्ह्यातील सर्व गटशिक्षणाधिकारी आणि शाळा व्यवस्थापनांना याबाबतचे निर्देश जारी केले…

Read More

नवीन अभ्यासक्रमासाठी शिक्षकांना प्रशिक्षण, 10 जुलै अंतिम तारीख:राज्य शैक्षणिक संशोधन परिषदेने जारी केले वेळापत्रक

राज्यात यंदा इयत्ता दुसरी, तिसरी, चौथी आणि सहावीचा अभ्यासक्रम बदलण्यात आला असून, नवी पाठ्यपुस्तके लागू झाली आहेत. या बदललेल्या अभ्यासक्रमासाठी शिक्षकांचे प्रशिक्षण अद्यापही अपूर्ण आहे. राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने (एससीईआरटी) हे प्रशिक्षण पूर्ण करण्यासाठी १० जुलै ही अंतिम तारीख निश्चित केली आहे. उन्हाळ्याच्या सुट्यांमध्ये जनगणनेची कामे सुरू झाल्यामुळे शिक्षकांचे प्रशिक्षण पुढे ढकलण्यात आले…

Read More

हिंगोली जिल्ह्यात वादळी वाऱ्याने केळीच्या बागा उध्वस्त:20 कोटींचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज, प्रशासाकडून पंचनामा सुरु

हिंगोली जिल्ह्यात शनिवारी ता. १३ वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे कळमनुरी व वसमत तालुक्यात केळी पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. प्राथमिक अंदाजानुसार केळीच्या बागांचे सुमारे २० कोटी रुपयांचे नुकसान असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. तर हिंगोली तालुक्यातील पहेणी येथे ६० ते ७० घरावरील टीनपत्रे उडून गेली आहेत. हिंगोली जिल्हयात वसमत व कळमनुरी तालुक्यात केळीचे पिक अधिक प्रमाणात घेतले…

Read More

डीएसकेच्या जप्त गाड्या स्वस्त देण्याचे आमिष, लाखो रुपयांची फसवणूक:कार एजंटने अनेकांना गंडा घातला; खडक पोलिसांत गुन्हा दाखल

पुण्यात डी.एस. कुलकर्णी (डीएसके) यांच्या जप्त केलेल्या गाड्या स्वस्त दरात मिळवून देण्याचे आमिष दाखवून लाखो रुपयांची फसवणूक झाल्याचे उघड झाले आहे. एका कार एजंटने अनेकांना गंडा घातला असून, त्याच्याविरोधात खडक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी एजंट पैसे घेऊन फरार झाला आहे. या प्रकरणी अदनान शब्बीर शेख (वय २३, रा. नाईक बिल्डिंग, मोमीनपुरा,…

Read More

पुण्यातील रेंजहिल्समध्ये दीड लाखांचा गांजा जप्त:एका तरुणाला अटक, अंमली पदार्थ विरोधी कायद्यान्वये गुन्हा दाखल

पुण्यातील रेंजहिल्स परिसरातून खडकी पोलिसांनी दीड लाख रुपये किमतीचा गांजा जप्त केला आहे. या प्रकरणी एका तरुणाला अटक करण्यात आली असून, त्याच्याविरुद्ध अमली पदार्थ विरोधी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अनिकेत नीरज मलिक (वय २८, रा. सिद्धीविनायक सोसायटी, एनडीए रस्ता, शिवणे) असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे. शनिवारी (१३ जून) मध्यरात्री पोलिसांचे पथक रेंजहिल्स…

Read More

ठाकरे गटाच्या खासदाराच्या गाडीला अपघात:विक्रोळीत ताफ्यातील वाहने एकमेकांवर आदळली, पक्षाच्या बैठकीला जाताना घडली घटना

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज ‘मातोश्री’ निवासस्थानी बोलावलेल्या पक्षाच्या खासदारांच्या अत्यंत महत्त्वाच्या बैठकीला जात असताना, मुंबई ईशान्यचे नवनियुक्त खासदार संजय दीना पाटील यांच्या कारचा किरकोळ अपघात झाला. विक्रोळी महामार्गावर त्यांच्या ताफ्यातील गाड्या एकमेकांवर आदळल्याने हा अपघात घडला. सुदैवाने या घटनेत कोणालाही दुखापत झालेली नाही. मिळालेल्या माहितीनुसार, खासदार संजय दीना पाटील…

Read More

'मातोश्री'वरील बैठकीला केवळ 4 खासदारांची प्रत्यक्ष हजेरी:5 जणांची ऑनलाईन उपस्थिती; संजय राऊतांनी सांगितली इनसाईड स्टोरी

महाराष्ट्रातील ठाकरे गटाचे खासदार शिंदे गटाच्या संपर्कात असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. याच कथित ‘ऑपरेशन टायगर’च्या पार्श्वभूमीवर आज पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ‘मातोश्री’वर बोलावलेल्या तातडीच्या बैठकीला केवळ ४ खासदारांनी प्रत्यक्ष हजेरी लावल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. मात्र, उर्वरित ५ खासदार ऑनलाईन पद्धतीने बैठकीला पूर्णवेळ उपस्थित होते, अशी माहिती देत शिवसेना (उबाठा) प्रवक्ते खासदार संजय राऊत…

Read More