Headlines

डॉ. आनंद नाडकर्णी यांचं निधन:शहाण्यांचा सायकॅट्रिस्ट म्हणून ओळख; मानसिक आरोग्य चळवळीचा चेहरा पडद्याआड

मानवी मनाचे बारकावे, मानसिक आरोग्याचे महत्त्व आणि मनोविकारांविषयी समाजात असलेले गैरसमज दूर करण्यासाठी आयुष्यभर काम करणारे ख्यातनाम मानसोपचार तज्ज्ञ, लेखक आणि नाटककार डॉ. आनंद नाडकर्णी यांचे शुक्रवारी मुंबईत निधन झाले. ते 68 वर्षांचे होते. काही महिन्यांपूर्वी त्यांना कर्करोगाचे निदान झाले होते. त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र शुक्रवारी सकाळी त्यांच्या मुंबईतील निवासस्थानी त्यांनी अखेरचा श्वास घेतला….

Read More

रुग्णालयातील पांढऱ्या वस्त्रातील ‘दूत’ अन् आरोग्याच्या ‘आशा’:नर्सिंग कॉलेजमध्ये रंगला सेवेचा सन्मान, कार्यक्रमात सेवाभावी वृत्ती जोपासण्याचे केले आवाहन‎

रुग्णालयातील पांढऱ्या गणवेशातील परिचारिका असो किंवा वस्तीपातळीवर घरोघरी फिरणारी आशा सेविका, समाजाचे आरोग्य सुदृढ ठेवण्यात या दोघींचेही योगदान एखाद्या योद्ध्याप्रमाणे आहे. सामाजिक आरोग्य सेवा तळागाळातील माणसापर्यंत पोहोचवण्यात परिचारिकांइतकाच आशा सेवि . आंतरराष्ट्रीय परिचारिका दिनाचे औचित्य साधून गुलमोहर रोडवरील प्रयत्न नर्सिंग कॉलेजमध्ये याच सेवेचा अनोखा गौरव सोहळा पार पडला. या कार्यक्रमात महानगरपालिकेच्या विविध नागरी आरोग्य केंद्रांतील…

Read More

पुणे महामार्गावर वऱ्हाडींच्या बससह चार वाहनांचा अपघात:35 जखमी, पळवे खुर्द शिवारातील घटना, कारला वाचवण्याच्या प्रयत्नात लक्झरी बसचालकाचे नियंत्रण सुटले

. नगर-पुणे महामार्गावर गुरुवारी सकाळी भीषण साखळी अपघात झाला. लग्नाचा मुहूर्त गाठण्यासाठी उत्साहात आळंदीकडे निघालेल्या राजळे परिवाराच्या आनंदावर विरजण पडले. पळवे खुर्द शिवारातील हॉटेलसमोर लक्झरी बस, कंटेनर, एसटी बस आणि कार यांच्यात झालेल्या भीषण साखळी अपघातात ३० ते ३५ जण जखमी झाले. यातील काहींची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते. पाथर्डी तालुक्यातील कासार पिंपळगाव येथील वऱ्हाडी लक्झरी…

Read More

लातुरात नीटचे पेपर सेटर निवृत्त प्राध्यापक सीबीआयच्या ताब्यात:शुभमसह इतर आरोपींची दिल्लीत चौकशी, मनीषा ‌‌वाघमारेही अटकेत

नीटची परीक्षा ३ मे रोजी झाली. पण १ मे रोजी प्रश्नपत्रिका लातुरातील विद्यार्थ्यांच्या मोबाइलवर हस्तलिखीत स्वरुपात आल्याचे पोलिस तपासात स्पष्ट झाले आहे. परंतु या प्रश्नपत्रिकेचा स्त्रोत अद्याप पोलिसांना सापडला नसल्याचे सूत्रांनी सांगितले. पोलिसांकडे ज्या पालकाने (या पालकाचे नाव गोपनीय ठेवण्यात आले आहे) तक्रार केली त्यांच्याकडे एका विद्यार्थ्याकडून परीक्षेच्या दोन दिवस आधी एक प्रश्नपत्रिका आली होती….

Read More

'याचाही संतोष देशमुख करा':हरिनाम सप्ताहाचा हिशोब मागणाऱ्या कीर्तनकारावर गेवराईत जीवघेणा हल्ला, लोखंडी रॉडने मारहाण

गेवराई येथील स्वानंद सेवा गुरुकुलचे संचालक कीर्तनकार कैलास आनंदे यांच्यावर गावातील अखंड हरिनाम सप्ताहाचा हिशोब विचारल्याच्या कारणावरून काही व्यक्तींनी लोखंडी रॉड, केबल वायर आणि लाकडी दांड्यांनी जीवघेणा हल्ला केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. आनंदे हे आळंदीला जात असताना जातेगाव रोडवर आरोपींनी त्यांना अडवून ही बेदम मारहाण केली असून, हा सर्व धक्कादायक प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात…

Read More

जलसंकट टळले, मजीप्रा कंत्राटदारांचे आंदोलन मागे:आमदार संजय खोडके यांच्या मध्यस्थीने प्रश्न सुटला

महाराष्ट्र जीवन प्राधिकरणातील (मजीप्रा) कंत्राटदारांनी गेल्या तीन दिवसांपासून सुरू केलेले काम बंद आंदोलन गुरुवारी सायंकाळी मागे घेतले. आमदार संजय खोडके यांच्या यशस्वी मध्यस्थीमुळे हे आंदोलन थांबले असून, अमरावती शहरातील संभाव्य पाणीसंकट टळले आहे. आमदार खोडके यांनी कंत्राटदारांना त्यांच्या प्रलंबित रकमा मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे सांगितले. त्यांनी वरिष्ठांशी चर्चा केली असून, येत्या आठवडाभरात कंत्राटदारांना त्यांची देयके…

Read More

लोकसहभागातून शेत पांदण रस्ते, जलपुनर्भरणाची कामे:अमरावती जिल्ह्यात एनजीओंकडून अर्ज आमंत्रित

अमरावती जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या सोयीसाठी ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेत पांदण रस्ते व जलपुनर्भरण योजना’ राबवली जात आहे. या योजनेअंतर्गत लोकसहभागातून शेत पांदण रस्ते आणि जलपुनर्भरणाची कामे करण्यासाठी इच्छुक अशासकीय संस्थांकडून (एनजीओ) अर्ज मागवण्यात आले आहेत. जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी हे आवाहन केले आहे. या कामांसाठी शेतकरी लोकसहभाग, ग्रामपंचायत स्वनिधी आणि जिल्हा नियोजन समितीचा निधी वापरला जाईल….

Read More

जनगणना कामात असूनही बदल्या करा:कर्मचारी संघाची शासनाकडे मागणी, नंतर रुजू होण्याची तयारी

जिल्हा परिषदेतील कर्मचाऱ्यांनी जनगणनेच्या कामात असूनही आपल्या बदल्या करण्याची मागणी केली आहे. जनगणना पूर्ण झाल्यावर नव्या ठिकाणी रुजू होण्याची त्यांची भूमिका आहे. कर्मचाऱ्यांच्या या भूमिकेमुळे शासन आणि प्रशासनासमोर एक नवा पेच निर्माण झाला आहे. सध्या जिल्हा परिषदेत विविध संवर्गातील कर्मचाऱ्यांच्या बदल्यांची प्रक्रिया सुरू आहे, ज्याची अंतिम मुदत ३१ मे आहे. याच दरम्यान, शासनाने जनगणनेचे काम…

Read More

ताडोबातील वाघांच्या संरक्षणासाठी 2300 भटक्या कुत्र्यांची नसबंदी:वनविभागाचे 'मिशन व्हॅक्सिनेशन'; संसर्गजन्य रोगांचा धोका टाळला

ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील वाघ आणि इतर वन्यप्राण्यांना संसर्गजन्य रोगांपासून वाचवण्यासाठी वन विभागाने एक महत्त्वाची मोहीम यशस्वी केली आहे. ताडोबाच्या बफर क्षेत्रात भटक्या कुत्र्यांमुळे वन्यजीवांना ‘कॅनाईन डिस्टेंपर’ आणि ‘रेबीज’ सारख्या जीवघेण्या आजारांचा धोका निर्माण झाला होता. हा धोका कमी करण्यासाठी २०२५-२६ या वर्षात तब्बल २,३६५ भटक्या कुत्र्यांचे निर्बिजीकरण आणि लसीकरण पूर्ण करण्यात आले आहे. ताडोबाच्या गाभा…

Read More

पगार थकल्याने सुरक्षारक्षकाची आत्महत्या:सिंहगड कॉलेज संस्थापक, विश्वस्तांवर गुन्हा दाखल

सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये सुरक्षारक्षक म्हणून कार्यरत असलेल्या कर्मचार्‍याने तब्बल ४२ महिन्यांचा पगार थकल्याने नैराश्यातून आत्महत्या केल्याप्रकरणी आता सिंहगड संस्थेच्या संस्थापकांसह विश्वस्तांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. पगार न दिल्याने आर्थिक विवंचना आणि मानसिक तणावातून संबंधित कर्मचार्‍याने आत्महत्या केल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे संस्थापक मारुती निवृत्ती नवले, सेक्रेटरी…

Read More