विधानपरिषदेसाठी सुनेत्रा पवारांसमोर मोठं आव्हान:एक जागा, 75 इच्छुक! राष्ट्रवादीत तुफान स्पर्धा; अंतिम निर्णय कुणाच्या बाजूने?
महाराष्ट्रातील विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मोठी हालचाल सुरू झाली आहे. पक्षाच्या वाट्याला आलेल्या केवळ एका जागेसाठी 70 ते 75 इच्छुकांनी दावेदारी केल्याने पक्षात प्रचंड चुरस निर्माण झाली आहे. या जागेसाठी कोणाला उमेदवारी द्यायची, याबाबत अंतिम निर्णय घेणे पक्ष नेतृत्वासाठी मोठे आव्हान ठरणार आहे. यासाठी लवकरच कोअर कमिटीची बैठक होणार असून, त्यात सखोल चर्चा…