Headlines

श्री ​वटवृक्ष मंदिरात स्वामींचा पुण्यतिथी उत्सव‎:सायंकाळी 5.30 ते रात्री 10 या वेळेत श्रींची पालखी मिरवणूक निघेल

“स्वामी समर्थांच्या पुण्यतिथीनिमित्त बुधवारी अक्कलकोटमध्ये धार्मिक कार्यक्रमांची मांदियाळी असेल. सुमारे लाखभर भाविक दर्शनासाठी येण्याची शक्यता लक्षात घेऊन सुलभ दर्शनासाठी यंदा विशेष रांगेची व उन्हाची तीव्रता लक्षात घेऊन दर्शन रांगेत छताची व्यवस्था केली आहे. मंदिरातील गर्दी टाळण्यासाठी वैयक्तिक अभिषेक बंद ठेवण्याचा निर्णय मंदिर समितीने घेतल्याचे चेअरमन महेश इंगळे यांनी सांगितले. पहाटेची काकड आरती, नाम वीणा सप्ताह…

Read More

ज्येष्ठांना नवदृष्टी अन् घरोघरी ग्रंथ वाटून विचारांची पेरणी‎:शहरात भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त व्याख्यान, रक्तदान शिबिरे

. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा १३५ वा जयंतीउत्सव शहरासह जिल्हाभर उत्साहात साजरा करण्यात आला. सकाळी विविध ठिकाणी पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर सायंकाळी शहरातील प्रमुख मार्गांवरून डिजेंच्या दणदणाटात मिरवणूक मार्गस्थ झाली. त्यावेळी भीमगितांच्या तालावर निळे झेंडे फडकावत तरुणाईने ठेका धरला. फिनिक्स सोशल फाऊंडेशनच्या पुढाकाराने मोफत नेत्र तपासणी शिबिर व मोतीबिंदू शिबिराच्या माध्यमातून…

Read More

नफेखोरीसाठी रेस्टॉरंटच्या डिशमध्ये कृत्रिम ॲनालॉग पनीर:दुधात लिंबाचा रस टाकून बनते खरे पनीर; ॲनालॉगसाठी मात्र पामतेल

पनीर म्हटले की शाकाहारी जेवणातील शाही थाट! पण बाजारात सध्या दुधापासून बनलेल्या पनीरच्या नावाखाली कृत्रिम ॲनालॉग पनीरचा सर्रास वापर होत आहे. पामतेल, सोया प्रोटीन, व्हेजिटेबल प्रोटीन आणि स्टार्चच्या मिश्रणातून तयार होणारे हे पनीर दुग्धजन्य पनीरसारखेच दिसते. मात्र, खऱ्या पनीरसारखा पोत, चव देण्यासाठी फ्लेवरिंग एजंट्स आणि रंगही मिसळले जातात. ॲनालॉग पनीरवर बंदी नाही. तरी यापुढे रेस्टॉरंट,…

Read More

अकोल्यात खळबळ!:अपर जिल्हाधिकारी प्रमोद गायकवाडवर खंडणी प्रकरणात गुन्हा

अकोल्याचे अपर जिल्हाधिकारी प्रमोद राहुल गायकवाड यांच्यावर खंडणी आणि लाच मागितल्याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अकोला जिल्हा खाण व क्रशर उद्योजक संघाचे कार्याध्यक्ष विवेक प्रभाकर बिजवे यांनी दिलेल्या तक्रारीवरून ही कारवाई करण्यात आली आहे. त्यांनी दिलेल्या रिपोर्टनुसार, अपर जिल्हाधिकारी गायकवाड यांनी त्यांना फोन करून ते संघटनेचे कार्याध्यक्ष असल्यामुळे त्यांच्याकडून १५ हजार…

Read More

मुंबईला ड्रग्जचा विळखा:अंधेरीत घरावर छापेमारीतून 30 कोटींचे ड्रग्ज रॅकेट उद्ध्वस्त, नेस्को’ कॉन्सर्टमधील २ विद्यार्थ्यांच्या मृत्यूमुळे ड्रग्जविरोधी अभियानावर सवाल

नशामुक्त महाराष्ट्राच्या दाव्यांना मुंबईतील ताज्या घटनांनी जोरदार चपराक लगावली आहे. एका बाजूला गोरेगावमध्ये आयोजित एका म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोसमुळे एमबीएचे शिक्षण घेणाऱ्या दोन २४ वर्षीय विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे; तर दुसरीकडे पोलिसांनी अंधेरीत मोठी कारवाई करत चक्क १३ हजार रुपये भाड्याच्या खोलीतून तब्बल ३० कोटी रुपयांचे ‘एमडी’ ड्रग्ज रॅकेट उद्ध्वस्त केले आहे. एकापाठोपाठ उघडकीस…

Read More

संजिता महापात्र यांना निरोप, सत्यम गांधींचे स्वागत:अरावती जि.प. मध्ये जुन्या-नव्या सीईओंच्या आदरातिथ्याचा सोहळा संपन्न

अमरावती जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) संजिता महापात्र यांना नुकताच निरोप देण्यात आला, तर नवनियुक्त सीईओ सत्यम गांधी यांचे स्वागत करण्यात आले. महापात्र यांची सांगली-मीरज-कुपवाड महापालिकेच्या आयुक्तपदी बदली झाली आहे. जिल्हा परिषदेच्या डॉ. पंजाबराव देशमुख सभागृहात हा निरोप आणि स्वागत समारंभ उत्साहात पार पडला. यावेळी बोलताना संजिता महापात्र भावूक झाल्या. त्या म्हणाल्या, “आतापर्यंतच्या प्रशासकीय…

Read More

Maharashtra Heatwave SOPs Issued; 15 High-Risk Districts Under Focus

राज्यात वाढत्या तापमानाचा पारा ४७ ते ५० अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचत असताना, नागरिकांच्या आणि विशेषतः ऊन-वारा अंगावर सोसणाऱ्या घटकांच्या संरक्षणासाठी राज्य सरकारने मोठे पाऊल उचलले आहे. राज्य उष्णता कृती आराखडा आणि भारतीय हवामान विभागाच्या (IMD) सतर्कतेन . आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी या एसओपींची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे आदेश सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. राज्यातील १५ जिल्ह्यांमध्ये…

Read More

भारत-अमेरिका कराराविरोधात शेतकरी, मजूर, कामगारांचे आंदोलन:किसान सभेच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालयावर निदर्शने

महाराष्ट्र राज्य किसान सभा, महाराष्ट्र राज्य लालबावटा शेतमजूर युनियन आणि कामगार संघटनांचा महासंघ असलेल्या आयटकच्या संयुक्त विद्यमाने अमरावती येथील जिल्हाधिकारी कार्यालयावर धरणे आंदोलन करण्यात आले. भारताने अमेरिकेसोबत केलेला ‘ट्रेड डील’ कृषी व व्यापारविषयक करार शेतकरी आणि व्यापाऱ्यांसाठी घातक असल्याने तो रद्द करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. आंदोलनाच्या शेवटी जिल्हाधिकारी यांच्यामार्फत पंतप्रधान आणि राष्ट्रपतींना निवेदन पाठवण्यात…

Read More

अमरावतीत 876 लखपती थकबाकीदारांची नावे जाहीर:मनपाने पहिल्यांदाच प्रसिद्ध केली यादी, रक्कम भरण्याचे आवाहन

अमरावती महानगरपालिकेने एक लाख रुपयांपेक्षा जास्त मालमत्ता कर थकबाकी असलेल्या ८७६ मालमत्तांची यादी जाहीर केली आहे. पालिकेच्या इतिहासात असे पहिल्यांदाच घडले असून, थकबाकीदारांना तातडीने रक्कम भरण्याचे आवाहन करण्यात आले आहे. ही यादी झोन क्र. १ ते ५ मधील संपूर्ण शहरातील मालमत्तांची आहे. महानगरपालिका आयुक्त वर्षा लढ्ढा यांनी पालिकेच्या महसुलात वाढ करण्यावर लक्ष केंद्रित केले आहे….

Read More

देवाभाऊ काय चाललंय तुमचं?:1 किमी रस्त्याला 254 कोटी कशासाठी लागतात? शक्तीपीठवरून राजू शेट्टींचा फडणवीसांना सवाल

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी शक्तीपीठ महामार्गाच्या वाढीव अंतरावरून आणि त्यापोटी फुगलेल्या हजारो कोटींच्या खर्चावरून सरकारला धारेवर धरले आहे. “देवाभाऊ, फोंड्या माळावर १ किलोमीटर रस्ता करण्यासाठी २५४ कोटी रुपये कशासाठी लागतात? हा रस्ता काय ट्रम्प तात्यांचे डॉलर वापरून बनवणार आहात का?”असा सवाल राजू शेट्टी यांनी केला असून, या प्रकल्पातून ७० हजार कोटींचा ‘ढपला’…

Read More