Headlines

श्री पिनाकेश्वर महादेवाच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी:संभाजीनगर, नाशिक, जळगाव जिल्ह्यांच्या सीमेवर देवस्थान‎

नांदगाव तालुक्यातील जातेगाव पासुन पाच कि.मी.अतरावर उत्तरेस असलेल्या सह्याद्री पर्वत रांगेतील डोंगर आहे. ह्या डोंगराच्या शिखरावर आहे याशिखरावर पिनाकेश्वर महादेवाचे मंदिर असुन येथे आज पवित्र श्रावण महिन्याच्या पहिल्याच सोमवारी निमित्ताने हजारो महिलांसह आबालवृद्धांनी दर्शनाचा लाभ घेतला. ह्या पिनाकेश्वर महदेवाच्या दर्शनासाठी मराठवाडा,मध्यमहाराष् ट्रासह खान्देशातील भाविक मोठ्या संख्येने येत असतात, श्रावण महिन्यातील तिसर्या सोमवारी लाखो भाविक अनवाणी…

Read More

छत्रपती संभाजीनगरात आजपासून हेल्मेट बंधनकारक:पोलिस ठाणे निहाय तपासणी, हेल्मेट नसल्यास 1000 हजार रुपये दंड

राज्यभरात अपघाती मृत्यूंची संख्या 10 टक्क्यांनी कमी करण्याचे निर्देश पोलिस महासंचालक कार्यालयाने दिले आहेत. त्यानुसार मागील 3 महिन्यांपासून शहर पोलिस दल कार्यरत आहे. आता 1 सप्टेंबरपासून वाहनधारकांसाठी हेल्मेट सक्ती अधिक तीव्र करण्यात येत आहे. पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांनी जून महिन्यात सर्वप्रथम पोलिस कर्मचाऱ्यांना आणि नंतर शासकीय कार्यालयांत हेल्मेट बंधनकारक केले होते. या मोहिमेच्या दुसऱ्या…

Read More

पुण्यात भाजप कार्यकारिणी:काँग्रेसच्या फेक नरेटिव्हविरोधात ‘नरेटिव्ह’ मजबूत करा- मुख्यमंत्री, भाषणातून कार्यकर्त्यांना दिला संदेश

देशाच्या विकासाची घोडदौड थांबवण्यासाठी विविध शक्ती कार्यरत असून काँग्रेस तसेच विरोधकांकडून समाजात संभ्रम आणि अराजक निर्माण करण्याचा प्रयत्न होत असल्याची टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी पुण्यात केली. केवळ भाजपविरोधी राजकारण न करता संविधानाच्या नावाखाली समाजात गैरसमज पसरवण्याचे काम सुरू असल्याचेही ते म्हणाले. मुख्यमंत्री प्रदेश कार्यकारिणीत बोलत होते. मुख्यमंत्री म्हणाले, काँग्रेस व विरोधकांच्या ‘फेक नरेटिव्ह’चा…

Read More

फलटणच्या डॉक्टरची मुंबईत आत्महत्या:तानाजी सावंतांच्या कथित PAकडून दबाव असल्याचा आरोप; हातावर सुसाईड नोट!

फलटण उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेंद्र रूपनवर यांचा मुंबईत उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला आहे. त्यांनी सायन रेल्वे स्थानक परिसरात आत्महत्येचा प्रयत्न केला होता, त्यानंतर त्यांना तातडीने सायन रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. या मृत्यूचे थेट कनेक्शन शिवसेना नेते आणि माजी मंत्री तानाजी सावंत यांच्या कथित पीएशी जोडले जात असल्याने…

Read More

सैनिक सीमावर्ती भागांत दगडूशेठ गणपतीची प्रतिष्ठापना करणार:श्रीमंत दगडूशेठ हलवाई ट्रस्टतर्फे लष्कराला प्रतिकात्मक मूर्ती सुपूर्द

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टने भारतीय लष्करातील जवानांसाठी गणपतीच्या प्रतिकात्मक मूर्ती सीमावर्ती भागांत पाठवल्या आहेत. कारगिल, जम्मू, अयोध्या आणि राजस्थानसह विविध सीमावर्ती भागांमध्ये सैनिक या मूर्तींची प्रतिष्ठापना करणार आहेत. पुण्यातून या मूर्ती नुकत्याच संबंधित लष्करी तुकड्यांकडे सुपूर्द करण्यात आल्या. ट्रस्ट आणि सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे भारतीय लष्कराच्या २४, ५, १९, १ मराठा लाइट इन्फन्ट्री युनिटच्या…

Read More

मतदार यादीतून 3.53 लाख नावे वगळली; 22 मतदान केंद्रे:अमरावती जिल्ह्यात प्रारूप यादी जाहीर, दावे-हरकतींसाठी महिनाभराची मुदत

अमरावती जिल्ह्यात मतदार यादीचे सूक्ष्म पुनरिक्षण (SIR) पूर्ण झाल्यानंतर, जिल्हा प्रशासनाने सोमवारी, ३१ ऑगस्ट रोजी प्रारूप मतदार यादी जाहीर केली. या यादीनुसार, जिल्ह्यातील ३ लाख ५३ हजार २८२ मतदारांची नावे कमी झाली आहेत. विशेष म्हणजे, मतदार संख्या घटूनही एकूण मतदान केंद्रांची संख्या २२ ने वाढली आहे. या प्रारूप मतदार यादीवरील दावे आणि हरकती दाखल करण्यासाठी…

Read More

एसपी कदम यांच्या हस्ते होमगार्ड कॅम्पसमध्ये रस्त्याचे काम सुरू:कॅम्पसच्या विकासाला गती, जवानांसाठी सुविधा वाढवण्यावर भर

अमरावती येथील काँग्रेस नगर रोडवरील होमगार्डच्या जिल्हा प्रशिक्षण केंद्रातील विकासकामांना गती मिळाली आहे. पोलीस अधीक्षक (एसपी) निकेतन कदम यांच्या हस्ते अंतर्गत रस्त्याच्या कामाचा कार्यारंभ उत्साहात पार पडला. यावेळी परिसरात वृक्षारोपणही करण्यात आले. होमगार्ड जवानांना प्रशिक्षणादरम्यान सुरक्षित, सुसज्ज आणि चांगल्या सुविधा मिळाव्यात, हा या कामामागील मुख्य उद्देश आहे. रस्त्याचे काम पूर्ण झाल्यावर कॅम्पसमधील दळणवळण अधिक सुलभ…

Read More

मराठा क्रांती मोर्चाचा सरकारला आंदोलनाचा इशारा:समाजाचे प्रश्न, आरक्षण उपसमिती बैठकीची मागणी

मराठा क्रांती मोर्चाने मराठा आरक्षणासह विविध प्रलंबित प्रश्न तातडीने सोडवण्याची मागणी करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन दिले आहे. सरकारने मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यास राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही मोर्चाने दिला आहे. मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक तातडीने घेण्यासह अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाची थकीत रक्कम तत्काळ वितरित करण्याची प्रमुख मागणी या निवेदनातून करण्यात आली…

Read More

मराठा आरक्षणावर सरकार सकारात्मक:ओबीसींना धक्का न लावता मार्ग काढणार, मंत्री उदय सामंतांची महत्त्वाची माहिती

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेत उपोषण सुरू केले असून आज त्यांच्या उपोषणाचा तिसरा दिवस आहे. सरकारच्या वतीने कोणते शिष्टमंडळ त्यांची भेट घेणार आणि ही भेट कधी होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. याच पार्श्वभूमीवर, मंत्री उदय सामंत आणि प्रसाद लाड यांनी नुकत्याच घेतलेल्या पत्रकार परिषदेत सामंत यांनी या…

Read More

खर्गे यांच्या सभास्थळाच्या 'शुद्धीकरणा'वरून संताप:युवक काँग्रेसचे भाजप कार्यालयाबाहेर आंदोलन, दादरमध्ये मनुस्मृतीचे दहन

काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या हल्द्वानी येथील सभेनंतर सभास्थळाचे ‘शुद्धीकरण’ करण्यात आल्याच्या घटनेचा मुंबई युवक काँग्रेसने तीव्र निषेध केला. भाजप-आरएसएसच्या कथित जातीयवादी आणि मनुवादी मानसिकतेविरोधात मुंबई युवक काँग्रेस अध्यक्षा झीनत शबरीन यांच्या नेतृत्वाखाली दादर येथील भाजप कार्यालयासमोर जोरदार आंदोलन करण्यात आले. यावेळी युवक काँग्रेस कार्यकर्त्यांनी मनुस्मृतीच्या प्रती जाळून भाजप-आरएसएसच्या मनुवादी विचारसरणीचा निषेध केला. भाजप कार्यालयासमोर…

Read More