Headlines

निसर्गप्रेमी मॉर्निंग वॉक ग्रुप वृक्षारोपणच्या वतीने कार्यक्रम‎:वृक्षारोपणासह वृक्षांचे संगोपन अन् संवर्धन करणे महत्त्वाचे- डॉ. प्रा. ढोरे

निसर्गप्रेमी मॉर्निंग वॉक ग्रुप, मोठी उमरी, अकोला यांच्या वतीने चाचोंडी रोड परिसरात वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित करण्यात आला. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्षारोपण ही काळाची गरज आहे. केवळ वृक्षारोपण करून आपली जबाबदारी संपत नाही. लावलेल्या प्रत्येक वृक्षाचे संगोपन व संवर्धन करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. वाढते प्रदूषण, बदलते हवामान, पर्यावरणाचा होत असलेला ऱ्हास लक्षात घेता प्रत्येक नागरिकाने पर्यावरण…

Read More

सार्शी येथील प्रवेशद्वारासाठी ग्रामस्थांचा आक्रमक पवित्रा:वंचितच्या जिल्हा महासचिवांना अधिकाऱ्यांनी प्रवेश नाकारला, तहसीलच्या पायऱ्यावर बसून प्रशासनाचा निषेध‎

पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या सार्शी येथे दीक्षाभूमीच्या धर्तीवर प्रवेशद्वार निर्माण करण्याच्या मुद्द्यावर सोमवार ३१ रोजी तहसील कार्यालयात ग्रामस्थांची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी आंदोलनाची भूमिका घेणारे वंचित बहुजन युवा आघाडीचे जिल्हा महासच . त्यामुळे काही ग्रामस्थांनी बैठकीवर बहिष्कार टाकला. त्यांनी तहसील कार्यालयाच्या पायऱ्यावर प्रशासनाच्या भूमिकेविरोधात जोरदार घोषणा देत निषेध नोंदविला. २५ ऑगस्ट रोजी आयोजित…

Read More

रस्ता रुंदीकरणावरून पारनेरमध्ये ‘राडा’:माजी नगराध्यक्षांना मारहाण, निषेधार्थ रास्ता रोको अन्‎शहर बंद, तीन जण ताब्यात‎

पारनेर शहरातून जाणाऱ्या रस्ता रुंदीकरणाच्या मुद्द्याने सोमवारी अचानक गंभीर वळण घेतले. रुंदीकरणामुळे बाधित होणाऱ्या मालमत्ताधारकांचे म्हणणे ऐकून घेण्यासाठी आयोजित बैठकीत झालेल्या वादाचे पर्यवसान माजी नगराध्यक्ष विजय औटी यांना मारहाणीत झाले. या घटनेनंतर शहरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. मारहाणीच्या निषेधार्थ औटी समर्थक, बाधित मालमत्ताधारक व ग्रामस्थांनी खालच्या वेशीजवळ रास्ता रोको आंदोलन केले. व्यापाऱ्यांनीही बंद…

Read More

नगरकरांच्या छतावर ‘सूर्यशक्ती’; 30 हजारांवर ग्राहक बनले वीज निर्माते!:‘सूर्यघर’ योजनेला प्रतिसाद; सौर प्रकल्पांतून 72 मेगावॅट वीजनिर्मितीची क्षमता‎

केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेला महावितरणच्या नाशिक परिमंडळात चांगला प्रतिसाद मिळत आहे. अहिल्यानगर मंडळातील तब्बल ३० हजार ४७५ वीज ग्राहकांनी आपल्या घरांच्या छतावर रूफटॉप सोलर यंत्रणा बसवली असून, त्यातून ७२ मेगावॅ . महिन्याला ३०० युनिटपर्यंत वीज वापरणाऱ्या ग्राहकांना मोफत वीज मिळावी, तसेच अतिरिक्त वीज महावितरणला देऊन उत्पन्न मिळवता यावे, या उद्देशाने केंद्र…

Read More

जापानच्या कुरे शहरात हिंगोलीच्या तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू:एक महिन्यापूर्वीच गेला होता जापानमध्ये, हिंगोली शहरावर शोककळा

जापानच्या कुरे शहरातील कारुगा बीट पार्क येथे पोहण्यासाठी गेलेल्या हिंगोलीच्या तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. याबाबतचा संदेश प्राप्त होताच तरुणाच्या कुटुंबासह हिंगोली शहरावर शोककळा पसरली आहे. शाम संतोष अग्रवाल (25) असे या तरुणाचा नांव आहे. याबाबत नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, शाम अग्रवाल हा आयआयटी खरगपूर येथे मास्टर ऑफ आर्किटेक्ट या अभ्यासक्रमाचे शिक्षण घेत…

Read More

क्रीडा शक्तीचा हुंकार अन् व्यसनमुक्तीचा जागर:मेजर ध्यानचंद जयंतीनिमित्त राष्ट्रीय क्रीडा दिनाचे औचित्य

. हॉकीचे महान खेळाडू मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय क्रीडा दिनाचे औचित्य साधून श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ आणि पोलिस आयुक्तालयाच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी २९ रोजी शहरात काढण्यात आलेल्याक्रीडा रॅलीने अमरावतीकरांचे लक्ष वेधून घेतले. क्रीडाशक्ती, निरोगी जीवनशैली आणि व्यसनमुक्तीचा संदेश देणाऱ्या या रॅलीत मंडळाच्या विविध क्रीडा विभागांतील हजारो विद्यार्थी, खेळाडू, प्रशिक्षक, प्राध्यापक, विभागप्रमुख व पदाधिकारी…

Read More

राजगडासाठी हजारो मावळे उतरले; खा. लंकेंच्या नेतृत्वात दुर्गसंवर्धन:‘आपला मावळा’ची 17 वी मोहीम; स्वच्छता व डागडुजी, पर्यटक सुविधांसाठी सरकार दरबारी पाठपुराव्याची दिली ग्वाही‎

छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनात अनन्यसाधारण महत्त्व असलेल्या किल्ले राजगडाच्या संवर्धनासाठी खासदार नीलेश लंके यांच्या नेतृत्वाखाली ‘आपला मावळा’ संघटनेच्या माध्यमातून रविवारी (३० ऑगस्ट) दुर्गसंवर्धन व स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. संघटनेची ही १७ वी . रविवारी भल्या पहाटे खासदार लंके यांच्यासह मावळे राजगडाच्या पायथ्याशी दाखल झाले. त्यानंतर श्रमदानातून गडावरील कचरा संकलन, स्वच्छता, डागडुजी, दगड-दुरुस्ती, नामफलक लावणे आदी…

Read More

ढाल-तलवारीचे युद्ध संपले, आता बुद्धीच्या बळावर लढण्याची गरज:सटाणा येथे सांगता समारंभात कवी जगताप यांनी व्यक्त केले विचार‎

मराठ्यांनी अटकेपार झेंडे लावले; ढाल-तलवारीचे युद्ध संपले असून, आता बुद्धीच्या बळावर लढण्याची गरज आहे. आजच्या काळात अज्ञानाला थारा राहिलेला नाही. माणसाचे डोके कायम ज्ञानाने भरलेले असावे आणि त्याची ज्ञानाची भूक भागावी, यासाठी व्याख्यानमालांचे आयोजन आवश . सटाणा येथे सहकारमहर्षी स्व. दादासाहेब उर्फ वसंतराव दगाजी पाटील यांच्या पुण्यस्मरणार्थ २१ व्या वसंत व्याख्यानमालेच्या सांगता समारंभात ‘कवितेतून समाजप्रबोधन’…

Read More

चांदवडकरांना टोलमुक्ती देण्यासाठी घेराव‎:मंगरूळ टोल नाक्यावर वसुलीविरोधात शिवसेना (उबाठा) गटाची आक्रमक भूमिका

मुंबई-आग्रा महामार्गावरील मंगरूळ येथील टोल प्लाझावर चांदवड तालुक्यातील स्थानिक वाहनधारकांकडून करण्यात येत असलेल्या टोल वसुलीविरोधात शिवसेना (उबाठा) गटाने आक्रमक भूमिका घेतली आहे. तालुक्यातील स्थानिक नागरिकांना टोलमुक्ती देण्यात यावी, या मागणीसाठी शिवसैनिकांनी मंगरूळ टोल प्लाझाच्या व्यवस्थापकाची भेट घेत चर्चा केली. तालुक्यातील वाहनधारक, शेतकरी, व्यापारी व विद्यार्थ्यांना विविध कामानिमित्त महामार्गावरून वारंवार प्रवास करावा लागतो. त्यामुळे त्यांच्याकडून टोल…

Read More

खरीप पिके वाचवण्यासाठी पिंपळदरी परिसरातील शेतकऱ्यांचे रात्रभर जागरण:शेतकऱ्यांसमोर संकट, वन विभागाने लक्ष देण्याची मागणी‎

पिंपळदरी सिल्लोड तालुक्यातील पिंपळदरी आणि लगतच्या संपूर्ण परिसरात सध्या खरीप हंगामातील पिके अतिशय जोमात आली असून शेते हिरवीगार दिसू लागली आहेत. मात्र, पिके ऐन बहरात असतानाच वन्यप्राण्यांच्या वाढत्या उपद्रवामुळे बळीराजा कमालीचा हवालदिल झाला आहे. रानडुक्कर, नीलगाय, हरिण व इतर रानटी प्राण्यांचे टोळच्या टोळ रात्रीच्या वेळी शेतात घुसून कपाशी, सोयाबीन, मका, तूर, उडीद आणि मुगाच्या पिकांची…

Read More