पिंपळगाव पेठचा प्रकार:सहा फूट खोलीच्या ओढ्यावर चक्क 20 लाखांचा सिमेंट बंधारा, पाण्याची आवक कमी, गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
ग्रामीण भागात जलसंधारणासाठी दरवर्षी कोट्यवधींचा निधी खर्च केला जातो. कागदावर विकासगंगा वाहते, मात्र प्रत्यक्षात जमिनीवर काय परिस्थिती आहे, याचे उदाहरण पिंपळगाव पेठ येथील कोके वस्तीवर पाहायला मिळत आहे. सहा फूट खोलीच्या एका चिंचोळ्या खोंगळीवर चक्क २० लाख रुपये खर्चून सिमेंट बंधारा उभारण्यात आला आहे. हा प्रकार पाहून गावकऱ्यांच्याही भुवया उंचावल्या असून, हा बंधारा पाण्यासाठी की…