Headlines

चिखलदरा अंध विद्यालयाचा दहावीचा निकाल 100 टक्के:सर्व 17 दृष्टीबाधित विद्यार्थी उत्तीर्ण, यशाची परंपरा कायम

चिखलदरा येथील राष्ट्रीय अपंग कल्याण संस्था (नॉफ) संचालित निवासी अंध विद्यालयाने यावर्षीच्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (दहावी) परीक्षेत १०० टक्के निकाल मिळवला आहे. परीक्षेला प्रविष्ट झालेले सर्व १७ दृष्टीबाधित विद्यार्थी यशस्वीरित्या उत्तीर्ण झाले. आकाश वाघमारे याने ८५.४० टक्के गुण मिळवून विद्यालयातून प्रथम क्रमांक पटकावला. याशिवाय, ऋतुजा नांदुरकर आणि आरती गायकवाड यांनी प्रत्येकी ८३.८० टक्के गुण मिळवले….

Read More

अमरावती जिल्हा परिषदेत बदली सत्र सुरू:चार विभागांतील 38 कर्मचाऱ्यांचे स्थानांतर; आरोग्य विभागाचा टप्पा बाकी

अमरावती: जिल्हा परिषदेतील सर्वसाधारण बदली प्रक्रियेला रविवारी सुरुवात झाली. मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यम गांधी यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलेल्या या सत्रात चार विभागांतील ३८ कर्मचाऱ्यांचे स्थानांतर करण्यात आले. ही प्रक्रिया समुपदेशन पद्धतीने अत्यंत पारदर्शक वातावरणात पूर्ण झाली. आरोग्य विभागातील उर्वरित कर्मचाऱ्यांच्या बदल्या सोमवारी केल्या जाणार आहेत. बदली सत्रासाठी जिल्हा परिषदेच्या डॉ. पंजाबराव देशमुख सभागृहात समुपदेशन आयोजित…

Read More

भोंदू अशोक खरात प्रकरण:रूपाली चाकणकरांची एसआयटीकडून 6 तास चौकशी; आर्थिक व्यवहार आणि पूजा-विधींबाबत विचारले प्रश्न

राज्याला हादरवून सोडणाऱ्या नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात आता राजकीय धागेदोरे अधिक घट्ट होताना दिसत आहेत. या प्रकरणाच्या तपासासाठी स्थापन करण्यात आलेल्या विशेष तपास पथकाने (SIT) आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्री रूपाली चाकणकर यांची तब्बल ६ तास कसून चौकशी केली. एसआयटी प्रमुख तेजस्वी सातपुते यांनी स्वतः दोन तास चाकणकरांना प्रश्नांच्या फेऱ्यात पकडले होते. अशोक खरात प्रकरणात…

Read More

Usha Chavan Protests Pune Municipal Corporation TDR Property Dispute

मराठी सिनेसृष्टीचे सुवर्णयुग गाजवणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री उषा चव्हाण यांनी राज्य सरकार आणि प्रशासनाविरोधात अत्यंत आक्रमक आणि वेदनादायी भूमिका मांडली आहे. आपल्या हक्काच्या जमिनीबाबत उच्च न्यायालयाचे स्पष्ट आदेश असतानाही पुणे महानगरपालिकेने बिल्डरच्या . पुण्यातील धनकवडी परिसरात उषा चव्हाण यांची खाजगी मालकीची जमीन आहे. या मालमत्तेचा वाद सध्या न्यायालयात सुरू आहे. उच्च न्यायालयाने संबंधित मालमत्ता अद्याप अविभाजित…

Read More

महिला व बाल विकास विभागातील बदल्या आता ऑनलाइन:कर्मचाऱ्यांना अधिक सुलभ व न्याय्य पद्धतीने बदलीची संधी उपलब्ध होणार

महिला व बाल विकास विभागातील सर्व पदांच्या बदल्या आता केंद्रित ऑनलाइन पद्धतीने करण्यात येणार असल्याची माहिती महिला व बाल विकास विभागाने दिली आहे. या निर्णयामुळे बदली प्रक्रियेत पारदर्शकता वाढणार असून कर्मचाऱ्यांना अधिक सुलभ आणि न्याय्य पद्धतीने बदलीची संधी उपलब्ध होणार आहे. विभागातील बदल्या डिजिटल प्रणालीद्वारे केल्यामुळे मानवी हस्तक्षेप कमी होऊन संपूर्ण प्रक्रिया अधिक वेगवान, पारदर्शक…

Read More

देशात पाण्याची कमतरता नाही, नियोजनाचा अभाव:नितीन गडकरींनी व्यक्त केली खंत; म्हणाले- पॉवर ग्रीडप्रमाणे वॉटर ग्रीडही आवश्यक

देशात पाण्याची कमतरता नाही, तर आपल्यामध्ये पाण्याबद्दलच्या नियोजनाचा अभाव असल्याची खंत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केली आहे. पूर्ती सिंचन समृद्धी कल्याणकारी संस्थेच्या रौप्य महोत्सवाच्या निमित्त नागपूर येथे जलसंवाद आणि जलक्रांती परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी गडकरी यांनी विदर्भातील शेतकरी आत्महत्या आणि पाण्याच्या टंचाईबाबत भाष्य केले आहे. नितीन गडकरी म्हणाले, विदर्भात शेतकरी आत्महत्या…

Read More

संग्राम भंडारेंच्या केसालाही धक्का लागू देणार नाही:संतांकडे वाकड्या नजरेने पाहिले तर कार्यक्रमच होणार, नितेश राणेंचा इशारा

राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाचे नेते विकास लवांडे यांच्यावर शनिवारी शाई फेकण्याचा प्रकार घडला होता. संग्राम भंडारे व त्यांच्या सहकाऱ्यांनी मिळून लवांडे यांच्यावर शाई फेकली होती. त्यानंतर अनेकांनी या घटनेचा निषेध केला. लवांडे वारकरी संप्रदायाबाबत वादग्रस्त विधान केल्याने त्यांच्यावर शाइफेक करण्यात आल्याचे म्हटले जात आहे. यावर आता भाजप नेते व मंत्री नितेश राणे यांनी प्रतिक्रिया…

Read More

संभाजीनगरहून मुली गायब होण्यामागे MIM?:उपमहापौर राजेंद्र जंजाळ यांचा संशय; मतीन पटेलच्या घरावर बुलडोझर फिरणार

छत्रपती संभाजीनगर येथून मुली गायब होण्यामागे एमआयएमचा हात असल्याचा संशय सत्ताधारी शिवसेनेचे नेते तथा शहराचे उपमहापौर राजेंद्र जंजाळ यांनी व्यक्त केला आहे. एमआयएमने धर्मांतर, लैंगिक शोषण व इतर गंभीर आरोप असणाऱ्यांना आश्रय दिला. त्यांची ही भूमिका असेल तर शहरातून बेपत्ता झालेल्या मुलींमागे एमआयएमचा हात आहे का? याची चौकशी झाली पाहिजे, असे ते म्हणालेत. त्यांच्या या…

Read More

विनापरवाना शेतमाल खरेदी – विक्री करणाऱ्यांवर होणार कारवाई:फळे, भाजीपाल्यांत भेसळ करणाऱ्यांचीही खैर नाही, मंत्री जयकुमार रावल

राज्यात शेतकऱ्यांच्या व्यापक हिताचे संरक्षण आणि कृषी उत्पन्न बाजार व्यवस्थेतील पारदर्शकता टिकवून ठेवण्यासाठी महाराष्ट्र कृषि उत्पन्न पणन (विकास व विनियमन) अधिनियम १९६३ व नियम १९६७ अंतर्गत राज्यातील शेतमाल खरेदी-विक्री व्यवहाराचे नियमन करण्यात येते. मात्र राज्यातील काही भागांत अनेक व्यापारी, संस्था तसेच काही शेतकरी उत्पादक कंपन्या कोणत्याही परवान्याविना शेतमाल खरेदी-विक्री करत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत….

Read More

20 मे रोजी औषध विक्रेत्यांचा देशव्यापी बंद:ऑनलाईन फार्मसीमुळे 12.50 लाख विक्रेत्यांचे अस्तित्व धोक्यात

देशातील औषध व्यापार क्षेत्रात ‘ऑनलाईन विरुद्ध ऑफलाईन’ असा संघर्ष तीव्र झाला आहे. कॉर्पोरेट कंपन्यांकडून होणारी बेकायदेशीर ऑनलाईन औषध विक्री आणि अनैतिक स्पर्धेविरोधात अखिल भारतीय औषध विक्रेता संघटनेने (AIOCD) 20 मे रोजी देशव्यापी बंदची हाक दिली आहे. या आंदोलनात देशभरातील 12.50 लाख औषध विक्रेते सहभागी होणार आहेत.ऑनलाईन फार्मसीमुळे पारंपरिक औषध विक्रेत्यांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. 20…

Read More