Headlines

सामदा शाळेत अज्ञातांनी घाण फेकली, वर्ग पटांगणात भरले:दुर्गंधीमुळे वर्गखोल्या बंद, विद्यार्थ्यांचे शिक्षण पटांगणात सुरू

दर्यापूर तालुक्यातील सामदा येथील जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक मराठी शाळेत अज्ञात समाजकंटकांनी घृणास्पद कृत्य केले आहे. शाळेच्या वर्गखोल्या तसेच मुख्य दरवाजाच्या कुलपाला घाण चिकटवण्यात आली होती. ही बाब सोमवारी सकाळी शाळा उघडताना निदर्शनास आली, त्यामुळे वर्गखोल्या न उघडता विद्यार्थ्यांना शाळेच्या पटांगणात बसवून वर्ग भरवण्यात आले. सामदा येथील या शाळेत पहिली ते सातवीपर्यंतचे १२२ विद्यार्थी शिक्षण…

Read More

अडीच लाखांची लाच घेताना उत्पादन शुल्क निरीक्षक जाळ्यात:रेस्टॉरंट अँड बारच्या एफएल-3 परवान्यासाठी केली होती मागणी

अमरावती जिल्ह्यातील अचलपूर येथे महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या दुय्यम निरीक्षकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) अडीच लाख रुपयांची लाच घेताना रंगेहात अटक केली आहे. आकाश दत्ता जाधव (वय ३६) असे अटक केलेल्या अधिकाऱ्याचे नाव असून, त्याने रेस्टॉरंट अँड बारसाठी आवश्यक असलेल्या ‘एफएल-३’ परवान्यासाठी ही लाच मागितली होती. तक्रारदाराने आपल्या रेस्टॉरंट अँड बारच्या ‘एफएल-३’ परवान्यासाठी ऑनलाईन…

Read More

पुणे येथे पॉलिसीच्या नावाखाली 40 लाखांची फसवणूक:सायबर चोरट्याविरुद्ध पोलिसांकडून गुन्हा दाखल

पुणे शहरात सायबर चोरट्यांनी विमा पाॅलिसीच्या नावाखाली नागरिकांना लाखो रुपयांचा गंडा घातल्याचे दोन प्रकार उघडकीस आले आहेत. यात एका प्रकरणात ४० लाख रुपयांची, तर दुसऱ्या प्रकरणात ११ लाख रुपयांची फसवणूक झाली आहे. दोन्ही घटनांमध्ये सायबर चोरट्यांविरुद्ध संबंधित पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पहिल्या घटनेत, वाघोली येथे राहणाऱ्या एका ४५ वर्षीय व्यक्तीची ४० लाख…

Read More

वैजापूरमधील परसोड्यात एकादशीला भक्तीचा महासागर:संत बहिणाबाई महाराज अखंड हरिनाम सप्ताहात 30 हजार भाविकांची उपस्थिती

वैजापूर तालुक्यातील परसोडा येथे सुरू असलेल्या ४७व्या संत बहिणाबाई महाराज अखंड हरिनाम सप्ताहाला एकादशीच्या दिवशी भक्तीमय वातावरणात मोठी गर्दी झाली. नवव्या दिवशीच्या कीर्तन सेवेला सुमारे ३० हजार भाविकांनी उपस्थिती लावली. रामायणाचार्य ह.भ.प. रामराव महाराज ढोक यांच्या कीर्तनाने परिसर दुमदुमून गेला. ह.भ.प. रामराव महाराज ढोक यांनी संत नामदेव महाराजांच्या ‘सर्वाभूती पाहे एक वासुदेव, अंतरीचा भाव जाणे…

Read More

उंच इमारतींच्या सुरक्षिततेसाठी नवीन तंत्रज्ञानाला पेटंट:जमिनीचा दाब नियंत्रित करणाऱ्या 'उंच संरक्षक भिंती'च्या पद्धतीला मंजुरी

उंच इमारतींच्या बांधकामात जमिनीचा दाब नियंत्रित करून बांधकामाची सुरक्षितता वाढविण्यासाठी विकसित करण्यात आलेल्या ‘उंच संरक्षक भिंत आणि तिच्या बांधकामाची पद्धत’ या अभिनव संकल्पनेला भारत सरकारच्या पेटंट कार्यालयाकडून पेटंट मंजूर झाले आहे. या संशोधनाचे पेटंटधारक म्हणून मल्हार विकास पाटील आणि वैशाली विकास पाटील यांची नोंद करण्यात आली आहे. भारत सरकारच्या पेटंट कार्यालयाने जारी केलेल्या प्रमाणपत्रानुसार या…

Read More

नागपूरचा 'जेन झी' संवाद राहुल गांधींच्या कार्यक्रमाची कॉपी:रोहित पवारांनी महायुती सरकारवर साधला निशाणा

नागपुरात झालेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ‘जेन झी’ संवाद कार्यक्रमावरून राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी या कार्यक्रमावरून महायुती सरकारवर आणि विशेषतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर तीव्र शब्दांत टीका केली आहे. नागपुरात प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी या कार्यक्रमाच्या आयोजनावर आणि हेतूवर गंभीर प्रश्न उपस्थित केले. रोहित पवार…

Read More

संजय नहार यांचा एकसष्टी अभीष्टचिंतन सोहळा गुरुवारी:गौरव ग्रंथ प्रकाशन, सरहदच्या त्रिदशकपूर्तीचाही सोहळा

पुणे येथे सरहद संस्थेचे संस्थापक संजय नहार यांचा एकसष्टी अभीष्टचिंतन सोहळा आयोजित करण्यात आला आहे. गुरुवारी, २७ ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी ४ वाजता गणेश कला क्रीडा मंच येथे हा कार्यक्रम होणार आहे. या सोहळ्यात नहार यांच्यावरील गौरव ग्रंथाचे प्रकाशन आणि सरहदच्या त्रिदशकपूर्तीचाही उत्सव साजरा केला जाईल. संजय नहार गौरव समितीने या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे….

Read More

शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी:कर्जमाफीचा दुसरा हप्ता जारी; 6 लाख 36 हजार शेतकऱ्यांच्या खात्यात 5086 कोटी जमा

राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा देणारी मोठी बातमी समोर आली आहे. महायुती सरकारच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत कर्जमाफीचा दुसरा हप्ता वितरित करण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत दुसऱ्या टप्प्यातील निधी वितरणाला मंजुरी देण्यात आली. या टप्प्यात 6 लाख 36 हजार शेतकऱ्यांना तब्बल 5 हजार 86 कोटी रुपयांचा कर्जमाफीचा लाभ…

Read More

मराठी न येणाऱ्या रिक्षाचालकांचा परवाना रद्द करू नका:शिवसेना नेते संजय निरुपम यांची परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांकडे मागणी

राज्यात ऑटोरिक्षाचालकांसाठी मराठी भाषेची सक्ती करताना प्रशासनाने मानवी आणि सामाजिक दृष्टीकोन ठेवावा, अशी आग्रही मागणी माजी खासदार संजय निरुपम यांनी केली आहे. ज्या अमराठी रिक्षाचालकांना अद्याप मराठी भाषा शिकता आलेली नाही, त्यांचे परवाने रद्द न करता त्यांना आणखी मुदतवाढ देण्यात यावी, असे निवेदन त्यांनी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांना पाठवले आहे. निवेदनात संजय निरुपम यांनी…

Read More

देशात 20,000 कोटींचा साखर घोटाळा!:48 लाख टन साखर गेली कुठे?; राजू शेट्टींचे पंतप्रधान मोदींना पत्र, सर्व गोदामांची तातडीने तपासणी करण्याची मागणी

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनी केंद्र सरकारवर तब्बल 20,000 कोटी रुपयांच्या साखर घोटाळ्याचा गंभीर आरोप केला आहे. देशात साखरेचा कोणताही तुटवडा नसताना केवळ सणासुदीच्या काळात कृत्रिम टंचाई निर्माण करून साखरेचे दर वाढवण्यात आले आहेत, असा दावा करत शेट्टी यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले आहे. तसेच, देशातील 48…

Read More