Headlines

Drug-Free State Target 2029 & Kukadi Project


मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी (1 सप्टेंबर) झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत चार महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. राज्यातून अंमली पदार्थांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी 2029 पर्यंतची उद्दिष्टपूर्ती निश्चित करण्यात आली असून,

.

2029 पर्यंत महाराष्ट्र नशामुक्त करण्याचे लक्ष्य

अंमली पदार्थांच्या वाढत्या समस्येला आळा घालण्यासाठी राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. सन 2029 पर्यंत महाराष्ट्रातून अंमली पदार्थांचे समूळ उच्चाटन करण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. त्यासाठी ‘नशामुक्त भारत अभियान’च्या माध्यमातून राज्यात सर्वसमावेशक शासकीय दृष्टिकोन अर्थात ‘व्होल ऑफ गव्हर्नमेंट अप्रोच’ धोरण राबविण्यास मंत्रिमंडळाने मान्यता दिली.

या धोरणानुसार अंमली पदार्थांविरोधातील लढा केवळ पोलिस किंवा गृह विभागापुरता मर्यादित राहणार नाही. शासनाच्या विविध विभागांमध्ये समन्वय साधून अंमली पदार्थांची निर्मिती, तस्करी, वितरण आणि सेवन यावर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. यामध्ये प्रतिबंधात्मक उपाययोजना, अंमली पदार्थांविरोधातील कारवाई आणि जनजागृतीला महत्त्व दिले जाण्याची शक्यता आहे. राज्यातील तरुणांमध्ये अंमली पदार्थांच्या वाढत्या वापराला आळा घालण्याच्या दृष्टीने हा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे.

सरकारी बैठका आणि कार्यक्रमांमध्ये आरोग्यदायी मेन्यू बंधनकारक

मंत्रिमंडळाने सार्वजनिक आरोग्याशी संबंधित आणखी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. शासकीय आणि निमशासकीय कार्यालयांमध्ये होणाऱ्या बैठका, कार्यक्रम तसेच उपहारगृहांमध्ये आरोग्यदायी आणि संतुलित अन्नपदार्थ उपलब्ध करून देण्याच्या धोरणाला मंजुरी देण्यात आली आहे. यानुसार अशा ठिकाणी केवळ चहा, बिस्किटे किंवा अतितेलकट आणि अतिगोड पदार्थांऐवजी पौष्टिक आणि संतुलित आहाराचा समावेश असलेला मेन्यू ठेवणे बंधनकारक केले जाणार आहे. सरकारी कार्यक्रम आणि बैठकींच्या माध्यमातूनही आरोग्यदायी आहाराची सवय वाढवण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाच्या माध्यमातून हे धोरण राबवले जाणार आहे.

सोलापूरमधील उन्नत मार्गाला ‘निकडीचा सार्वजनिक प्रकल्प’ दर्जा

सोलापूर शहरातील जुना पुणे नाका ते बोरामणी नाका या दरम्यान प्रस्तावित उन्नत मार्ग प्रकल्पाला मंत्रिमंडळाने ‘निकडीचा सार्वजनिक प्रकल्प’ म्हणून घोषित केले आहे. हा मार्ग राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६५ वर येतो. प्रकल्पासाठी आवश्यक असलेली सरकारी जमीन भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे (एनएचएआय) हस्तांतरित करण्यासाठी या निर्णयामुळे मार्ग मोकळा झाला आहे. सोलापूर शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्याच्या दृष्टीने हा उन्नत मार्ग महत्त्वाचा ठरणार आहे. प्रकल्पासाठी आवश्यक जमीन उपलब्ध झाल्यानंतर त्याच्या अंमलबजावणीला गती मिळण्याची अपेक्षा आहे.

कुकडी पाटबंधारे प्रकल्पाच्या खर्चात मोठी वाढ; १.४४ लाख हेक्टर सिंचन क्षमता

पुणे जिल्ह्यातील कुकडी पाटबंधारे प्रकल्पासाठी ५,७०४.५० कोटी रुपयांच्या सुधारित खर्चाला राज्य मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. या प्रकल्पातून तब्बल १ लाख ४४ हजार ९१२ हेक्टर सिंचन क्षमता निर्माण होणार आहे. शेतीसाठी पाण्याची उपलब्धता वाढवण्याच्या दृष्टीने हा निर्णय महत्त्वाचा आहे. प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर मोठ्या क्षेत्राला सिंचनाचा लाभ मिळण्याची अपेक्षा असून, त्याचा फायदा शेतकऱ्यांना होणार आहे. जलसंपदा विभागाच्या या निर्णयामुळे प्रकल्पाच्या पुढील कामांना आवश्यक प्रशासकीय आणि आर्थिक पाठबळ मिळणार आहे.

मंत्रिमंडळ बैठकीनंतर विखे पाटील अंतरवालीकडे रवाना

दरम्यान, मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे अंतरवाली सराटीकडे रवाना झाले आहेत. मराठा आरक्षणासह विविध मागण्यांसाठी मनोज जरांगे पाटील उपोषणाला बसले आहेत. त्यांची भेट घेण्यासाठी विखे पाटील अंतरवालीकडे जात असल्याची माहिती आहे. त्यामुळे मंत्रिमंडळाच्या बैठकीतील निर्णयांबरोबरच मराठा आरक्षणाच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर विखे पाटील यांची जरांगे पाटील यांच्यासोबतची भेटही महत्त्वाची ठरणार आहे.

एकनाथ शिंदेंच्या गैरहजेरीने राजकीय चर्चांना उधाण

दरम्यान, आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रत्यक्ष उपस्थित नसल्याने राजकीय चर्चांनाही उधाण आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली दुपारी 12 वाजता बैठक सुरू झाली; मात्र शिंदे बैठकीला उपस्थित राहिले नाहीत. एकनाथ शिंदे काल भीमाशंकर दौऱ्यावर होते. त्यामुळे दौऱ्यानंतर मुंबईत परतण्यास उशीर झाल्याने ते बैठकीला उपस्थित राहू शकले नाहीत, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र, महायुतीतील सध्याचे राजकीय वातावरण पाहता त्यांच्या गैरहजेरीला नाराजीची किनार असल्याच्या चर्चाही सुरू झाल्या आहेत. विशेष म्हणजे, शिंदे आज संध्याकाळी दिल्लीला रवाना होण्याची शक्यता असल्याची चर्चा आहे. त्यामुळे त्यांच्या मंत्रिमंडळ बैठकीतील अनुपस्थिती आणि संभाव्य दिल्ली दौरा यांची सांगड राजकीय वर्तुळात घातली जात आहे.

हेही वाचा…

एकनाथ शिंदे मंत्रिमंडळ बैठकीपासून दूर:नाराजीच्या चर्चांना उधाण, दिल्ली दौऱ्यामुळे राजकीय हालचालींना वेग

महाराष्ट्राच्या सत्ताकारणात पुन्हा एकदा हालचालींना वेग आला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळ बैठकीतील गैरहजेरीने महायुतीच्या राजकारणात चर्चांना उधाण आले आहे. मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली दुपारी 12 वाजता मंत्रिमंडळाची बैठक सुरू झाली; मात्र शिंदे प्रत्यक्ष बैठकीला उपस्थित राहिले नाहीत. त्यामुळे त्यांच्या अनुपस्थितीमागे नेमकं कारण काय, हा प्रश्न राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरला आहे. येथे वाचा संपूर्ण बातमी



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Newsmatic - News WordPress Theme 2026. Powered By BlazeThemes.