Headlines

हिंगोलीच्या भूमिपुत्राचा देशपातळीवर डंका:पोलिसांसाठी ‘रेड ॲप’ची निर्मितीबेपत्ता व्यक्तींसह कुजलेल्या मृतदेहांचे काही वेळातच तयार होणार छायाचित्र; देशातील पहिलाच एआय आधारित प्रयोग




हिंगोलीचे भुमीपुत्र तथा रत्नागिरीचे पोलिस अधिक्षक नितीन बगाटे यांनी कृत्रीम बुध्दीमत्तेच्या आधारावर तयार केलेल्या ‘रेड ॲप‘ या प्रणालीची राष्ट्रीय पोलिस अकादमीमध्ये प्रधानमंत्री सिल्व्हर कप स्पर्धेसाठी दखल घेण्यात आली आहे. देशातील निवडलेल्या पाच उपक्रमांमध्ये बगाटे याच्या या प्रणालीची निवड झाली आहे. देशातील पोलिसांसाठी हि प्रणाली तपासासाठी सहाय्यभुत ठरणार आहे. हिंगोली जिल्हयातील निशाणा येथील रहिवासी असलेले पोलिस अधिक्षक नितीन बगाटे हे सध्या रत्नागिरी जिल्हा पोलिस दलाचे पोलिस अधिक्षक पदावर कार्यरत आहेत. त्यापुर्वी ते सिंधुदुर्ग येथे अप्पर पोलिस अधिक्षक होते. रत्नागिरी अन सिंधुदुर्ग हा समुद्रकिनाराचा भाग असल्यामुळे समुद्रात अनेक वेळा मृतदेह वाहून येत होते. मात्र बहुतांश मृतदेह प्राण्यांनी खाल्लेले तसेच कुजलेल्या अवस्थेत असल्यामुळे त्यांची ओळख पटविणे शक्य नव्हते. त्यामुळे पोलिसांचा तपास तेथेच थांबत होता. या शिवाय जंगलांमधून किंवा खूना सारख्या घटनांमधून अनोळखी मृतदेह ओळखणे कठीण जाते. या सर्वबाबींचा विचार करून पोलिस अधिक्षक बगाटे यांनी ‘रेड अॅप’ प्रणाली विकसीत केली. यामध्ये कृत्रीम बुध्दीमत्तेचा वापर करून उपलब्ध छायाचित्र किंवा भौतिक माहितीच्या आधारे छायाचित्र तयार केले जाते. त्यामुळे सदर छायाचित्र दाखविल्यानंतर मृतदेहाची ओळख पटविणे सोईचे होऊन तपासाला गती देता येणे शक्य झाले आहे. कुजलेल्या मृतदेहाचे आहे त्या परिस्थितीचे छायाचित्र या प्रणालीमध्ये अपलोड केल्यानंतर आवश्‍यक सूचना देऊन त्याचे चांगलेच छायाचित्र तयार केले जाते. त्यामुळे मृतदेहाची ओळख पटविणे शक्य झाले आहे. या शिवाय बेपत्ता व्यक्तीचेही स्केच यामध्ये तयार करून त्याची माहिती घेणे शक्य झाले आहे. दरम्यान, सोमवारी ता. 24 हैदराबाद येथे राष्ट्रीय पोलिस अकादमीमध्ये आयोजित प्रधानमंत्री सिल्व्हर कप स्पर्धेत या प्रणालीचे पोलिस अधिक्षक बगाटे यांनी सादरीकरण करून पोलिस तपासात त्याची उपयुक्तता पटवून दिली आहे. विशेष म्हणजे या स्पर्धेसाठी देशातील पाचच अधिकाऱ्यांची निवड झाली होती. यामध्ये बगाटे यांच्यासह केरळ मधील एक तर रेल्वे पोलिस दलाच्या अधिकाऱ्यांची निवड झाली होती. हैदराबाद येथे या प्रणालीचे सादरीकरण झाल्यानंतर तेथे उपस्थित प्रधानमंत्री कार्यालयाचे अधिकारी, देशातील पोलिस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी बगाटे यांनी विकसीत केलेली संगणक प्रणाली भारतातील एआय तंत्रज्ञानावर आधारित पोलिसींगचा हा पहिलाच प्रयोग असल्याचे स्पष्ट करून उपस्थितांनी त्यांच्या कार्याचे कौतूक केले.
देशातील पोलिस दलासाठी महत्वाचा प्रणाली : नितीन बगाटे पोलिस अधिक्षक रत्नागिरी रेड ॲप हि प्रणाली देशभरातील पोलिसांसाठी तपासासाठी सहाय्यभुत ठरणारी आहे.यामुळे बेपत्ता व्यक्तींची तसेच कुजलेल्या मृतदेहाची ओळख पटविणे सोईचे असल्याने संपूर्ण देशात या प्रणालीची अंमलबजावणी होईल असा विश्‍वास आहे. महाराष्ट्रात देखील या प्रणालीची गृह विभागाला माहिती देण्यात आली आहे. या प्रणालीचे पेटंटसाठी प्रस्ताव देण्यात आला आहे. या अॅपच्या वैशिष्ट्यामध्ये देव दृष्टी मधून कुजलेल्या मृतदेहाचे चांगले छायाचित्र तयार करता येते. तसेच देव रुपरेखा यामधून एखाद्या संशयीताची भौतिक माहिती दिल्यानंतर त्याचा स्केच तयार करून त्यावरून छायाचित्र तयार करता येते. जीआयएस मॉनिटरींग मधून संशयीतांवर लक्ष ठेवता येते तर बीएनएस ॲनालेसीसमधून गुन्हेगाराची पार्श्वभुमी मिळणे शक्य होते.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *