Headlines

Javli Trader Paytm Loan Scam; Suspect Arrested in Medha



Paytm मशीन तपासणीच्या बहाण्याने व्यापाऱ्याचा विश्वास संपादन करून त्याच्या Paytm खात्यावरून ऑनलाइन कर्ज काढत तब्बल 8 लाख 25 हजार 640 रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी मेढा पोलिसांनी एका संशयितास अटक केली आहे. या प्रकरणामुळे जावली तालुक्यातील व्यापारी व व्

.

याबाबत मेढा पोलिस ठाण्यात गुन्हा क्रमांक 148/2026 अन्वये भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 316(5) व 318(4) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आनंदा नारायण भोसले (वय 50, रा. मेढा, ता. जावली) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. संशयित धनवंत बाळकृष्ण सल्लक (रा. केळघर, ता. जावली) याला पोलिसांनी अटक केली आहे.

फिर्यादीनुसार, 15 मार्च 2026 रोजी संशयित हा मेढा येथील IDBI बँकेसमोरील ‘गणेश स्वामी समर्थ झेरॉक्स सेंटर’ या दुकानात Paytm मशीन तपासणीसाठी आल्याचे सांगून गेला. त्याने विश्वास संपादन करत फिर्यादीच्या Paytm खात्यावरून ऑनलाइन कर्ज काढले. त्यानंतर कर्ज परतफेडीच्या नावाखाली Paytm कंपनीचा असल्याचे सांगितलेल्या 9284197664 या मोबाईल क्रमांकावर रक्कम वळवून एकूण 8,25,640 रुपयांचा अपहार केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक (PSI) शिंगटे करीत आहेत.

पोलिसांचे आवाहन

जावली तालुक्यात Paytm किंवा PhonePe मशीन तपासणी, केवायसी अथवा ऑनलाइन कर्ज परतफेडीच्या बहाण्याने अशाच प्रकारे कोणाची फसवणूक झाली असल्यास संबंधितांनी आवश्यक माहिती व कागदपत्रांसह मेढा पोलिस ठाण्यात तातडीने संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. तसेच अशा प्रकारच्या आर्थिक व्यवहारांबाबत कोणत्याही अनोळखी व्यक्तीवर विश्वास ठेवू नये आणि ओटीपी, पासवर्ड किंवा खात्याशी संबंधित माहिती कोणालाही देऊ नये, असेही पोलिसांनी नागरिकांना सावध केले आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *