Headlines

विषारी दारू प्रकरणी कारवाईची मागणी:आमदार अंबादास दानवेंचे मुख्यमंत्र्यांना पत्र; ती मानवी हत्याच असल्याचा केला आरोप

हडपसर, फुगेवाडी आणि दापोडी परिसरातील विषारी दारू प्रकरणात मृत्यू झालेल्या नागरिकांना न्याय मिळावा तसेच संबंधित पोलिस आणि राज्य उत्पादन शुल्क विभागातील अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी शिवसेना नेते तथा राज्याचे माजी विधान परिषद विरोधी पक्षनेते, आमदार अंबादास दानवे यांनी राज्याचे मुख्यमंत्री आणि पोलिस महासंचालकांना पत्राद्वारे केली आहे. अवैध दारूविक्रीचे अड्डे वर्षानुवर्षे सुरू असताना…

Read More

राज्यात मान्सूनपूर्व पावसाची दमदार हजेरी:चंद्रपूर, नाशिकसह जळगाव-बीडमध्ये वादळी वाऱ्यासह सरी; उकाड्यापासून नागरिकांना दिलासा

गेल्या अनेक दिवसांपासून प्रखर उष्णता आणि उकाड्याने हैराण झालेल्या महाराष्ट्रातील जनतेला अखेर मान्सूनपूर्व पावसाने मोठा दिलासा दिला आहे. रविवारी सायंकाळी राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये अचानक वातावरणात बदल होऊन वादळी वारा, विजांचा कडकडाट आणि गारांच्या पावसाने हजेरी लावली. चंद्रपूर, नाशिक, जळगाव आणि बीड जिल्ह्यांत झालेल्या या पावसामुळे तापमानात घट होऊन सर्वत्र गारवा निर्माण झाला आहे. गेल्या अडीच…

Read More

156 गावांत जलजीवनची कामे 4 वर्षांपासून अर्धवट‎:योजना मोठी, पण अंमलबजावणी विलंबाने; 3 गावांत काम जागीच‎

गेल्या तीन ते चार वर्षांपासून कन्नड तालुक्यातील जलजीवन मिशनचे काम रखडले आहे. लोकप्रतिनिधी आणि ठेकेदारांच्या दुर्लक्षामुळे पाणीटंचाईने जनता होरपळत आहे. तालुक्यात जलजीवन मिशन योजनेअंतर्गत २१२ गावांपैकी १७६ गावांत पाणीपुरवठ्याची कामे २०२२ मध्ये सुरू करण्यात आली आहेत. कामे सुरू होऊन चार वर्षे उलटून गेली तरी कामे प्रगतिपथावरच आहेत. तीन गावांत तर काहीच काम झालेले नाही. २९…

Read More

संगीत:विनायकच्या सुमधुर गायनाने, पवनच्या ‘ तीन ताल तबला’ वादनाने पंढरपूरकर रसिक तृप्त

अभिजात भारतीय शास्त्रीय संगीताची समृद्ध परंपरा आणि चळवळ टिकवून ठेवण्यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न करणाऱ्या करकंब नादब्रह्म कला फाउंडेशन आणि आरती साऊंड सिस्टीम, मनमाडकर परिवार यांच्या वतीने एका भव्य शास्त्रीय संगीत मैफिलीचे आयोजन करण्यात आले होते. या सुश्राव्य मैफिलीने पंढरपूर आणि परिसरातील कला रसिक श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाली. यावेळी डॉ. अनिल जोशी,…

Read More

नाशिकमध्ये आंतरजातीय विवाहानंतर विवाहितेचा छळ:8 वेळा गर्भपात घडवला, पतीसह सासू-सासऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल

प्रेमविवाह करून सुखी संसाराचे स्वप्न पाहणाऱ्या एका विवाहितेचा जात वेगळी असल्याच्या कारणावरून सासरच्या मंडळींनी अमानुष छळ केल्याची धक्कादायक घटना नाशिकमध्ये उघडकीस आली आहे. तू आमच्या जातीची नाहीस, असे टोमणे मारत विवाहितेची इच्छा नसताना तिचा तब्बल 8 वेळा गर्भपात घडवून आणल्याचा खळबळजनक आरोप करण्यात आला आहे. याप्रकरणी नाशिकच्या म्हसरूळ पोलिस ठाण्यात पतीसह सासू-सासऱ्यांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा…

Read More

पायरपाडा ते भिकारसोंडा रस्त्याची चाळण:ग्रामस्थांचा मोर्चाचा इशारा, मुख्य रस्त्यापर्यंत पोहोचवताना ग्रामस्थांची कसरत‎

साल्हेर परिसरातील पायरपाडा ते भिकारसोंडा या ५ किमी रस्त्याची अवस्था पाहिल्यावर ‘विकास’ नेमका कुणाचा झाला, असा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही. अनेक वर्षांपासून रखडलेल्या या कामामुळे आदिवासी बांधवांचे हाल होत असून, आता त्यांच्या संयमाचा बांध सुटला आहे. “निधी येतो, पण मुरतो कुठे?’ असा थेट सवाल करत ग्रामस्थांनी साल्हेर ग्रामपंचायतीवर धडक मोर्चा काढण्याचा पवित्रा घेतला आहे. पायरपाडा…

Read More

दुचाकीवर आलेल्या चोरट्यांनी महिलेचे मंगळसूत्र पळविले:कळमनुरी येथील घटना, पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

कळमनुरी येथील शासकिय विश्रामगृहा समोरील मार्गावर फिरत असलेल्या महिलेच्या गळ्यातील दुचाकीवर आलेल्या चोरट्यांनी मंगळसुत्र पळविल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी कळणनुरी पोलिस ठाण्यात शुक्रवारी ता. २९ रात्री गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणात पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन सीसीटीव्ही फुटेजची तपासणी सुरु केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंगोली येथील तिरुपती नगर भागातील स्नेहा राऊत ह्या अधिक मास…

Read More

MP – झारखंडमध्ये वादळ – विजांमुळे 16 जण ठार:उत्तराखंडमध्ये घर -शाळांत ढिगारा शिरला; UP, राजस्थान, हरियाणात तापमान 42°C+

देशातील 6 राज्ये उत्तराखंड, उत्तर प्रदेश, राजस्थान, पंजाब, हिमाचल प्रदेश आणि हरियाणाच्या अनेक भागांमध्ये मान्सूनपूर्व पाऊस सुरू आहे. मात्र, सहा राज्यांमध्ये तीव्र उष्णताही जाणवत आहे. उत्तर प्रदेश, राजस्थान आणि हरियाणात पारा 42°C पेक्षा जास्त नोंदवला गेला. मध्य प्रदेशातील बालाघाटमध्ये शुक्रवारी वीज कोसळून 4 लोकांचा मृत्यू झाला, तर आठ जण भाजले. देवासमध्ये वादळी वाऱ्यासह पावसामुळे घराच्या…

Read More

विद्युत पुरवठ्याचा बोजवारा; तत्काळ उपाययोजना न केल्यास आंदोलन:मनसेचा महावितरण कंपनीला इशारा; अधीक्षक अभियंत्यांना निवेदन‎

जिल्ह्यात वारंवार विद्युत पुरवठा खंडित होत असून, यावर तातडीने उपाययोजना न केल्यास आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने दिला आहे. याबाबत मनसेने अधीक्षक अभियंत्यांना निवेदन सादर केले. गत तीन वर्षांपासून अकोला, विशेषत: जुने शहरासह अन्य भागांत, ग्रामीण भागातही विजेचा खेळखंडोबा असतो. क्षणाक्षणाला वीजपुरवठा बंद होणे. तासनतास अकोला अंधारात बुडणे. हे आता नेहमीचे झाले…

Read More

पौर्णिमा:नाचनवेल येथे वटवृक्ष‎लावून वटपौर्णिमा साजरी‎, वडाची पाच झाडे लावून त्यांचे संगोपन करण्याची शपथ‎

घाटनांद्र्यासह परिसरात वटपौर्णिमेचा सण सोमवारी ( २९ जून) पारंपरिक पद्धतीने मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला. या वेळी येथील हनुमान मंदिर परिसरातील वटवृक्षाजवळ ग्रामगुरुजी संजय शास्त्री यांच्या मंत्रोच्चारात सामूहिक पूजन करण्यात आले. सुवासिनींनी वटवृक्षाला सुताचा पवित्र धागा गुंडाळत सात प्रदक्षिणा घातल्या. पतीला आरोग्यसंपन्न, दीर्घायुष्य लाभावे तसेच जन्मोजन्मी हाच पती मिळावा, अशी भावपूर्ण प्रार्थना…

Read More