भरधाव क्रुझरची दुचाकीस धडक; एकजण जागीच ठार:पैठणच्या इसारवाडी परिसरात घडला अपघात
छत्रपती संभाजीनगर-पैठण महामार्गावरील ईसारवाडी शिवारातील एचपी पेट्रोलपंपासमोर भरधाव वेगाने येणाऱ्या क्रुझर वाहनाने दुचाकीस जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी (१२ मे) सकाळी ८.१५ वाजण्याच्या सुमारास घडली. विष्णू अण्णा बोबडे (६२, रा. वाहेगाव ता. पैठण) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. एमआयडीसी पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, विष्णू बोबडे हे त्यांच्या दुचाकी (एमएच २० २४२) वरून…