कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे होताहेत हाल:दरवाढीसाठी शासनाने हस्तक्षेप करण्याची शेतकऱ्यांची मागणी
तिवसा तालुक्यातील कुऱ्हा परिसर हा कांदा उत्पादनाचे आगर म्हणून ओळखला जातो. या भागातील मारडा आणि इतर गावांतील कांदा सर्वदूर ख्यात असून तो सर्वत्र विकला जातो. परंतू यावर्षी कांद्याला हवा तसा दर मिळत नसल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे प्रचंड हाल होत आहेत. परिणामी शेतकरी हवालदिल झालेले बघायला मिळत आहेत. शासनाने यामध्ये हस्तक्षेप करावा, अशी मागणी पुढे आली…