Headlines

निकाल लागून 6 महिने उलटले तरी 'नीट-एसएस' कॉउन्सिलिंग रखडलेलीच:एचआरडीएची मेडिकल कॉन्सिलिंग कमिटीकडे पत्राद्वारे मागणी

नीट सुपर स्पेशालिटी (नीट-एसएस) परीक्षेचा निकाल लागून सहा महिन्यांहून अधिक काळ लोटला असला तरी, कॉउन्सिलिंग प्रक्रिया अजूनही रखडलेली आहे. या प्रशासकीय दिरंगाईमुळे देशातील हजारो पात्र डॉक्टरांचे भवितव्य अनिश्चिततेत सापडले आहे. हेल्थकेअर रिफॉर्म्स डॉक्टर्स असोसिएशन (एचआरडीए) ने ही प्रक्रिया तात्काळ पूर्ण करण्याची मागणी केली आहे. या संदर्भात, असोसिएशनने मेडिकल कॉन्सिलिंग कमिटी (एमसीसी) च्या अध्यक्षांना थेट पत्र…

Read More

आई रागावल्याने पाच भावंडे घरातून पळाली:पुणे पोलिसांनी तात्काळ घेतला शोध, मुले पुन्हा पालकांच्या ताब्यात

आई रागावत असल्याने पाच भावंडांनी घरातून पलायन केल्याची धक्कादायक घटना मांजरी भागात घडली. पैसे संपल्यानंतर मुले स्वारगेट बसस्थानकात थांबली होती. त्यानंतर पालकांना याबाबतची माहिती मिळाली. पोलीस आणि पालकांनी मुलांना सुखरूप ताब्यात घेतले. अचानक एकाच घरातील पाच मुले गायब झाल्याने खळबळ उडाली होती. मुले बेपत्ता झाल्यानंतर त्यांच्या आईने मांजरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. पोलिसांनी दिलेल्या…

Read More

NCR च्या चारही राज्यांत एकेक नमो सिटी होणार:दिल्ली – NCR मध्ये लागू निर्बंधांतून मिळेल दिलासा, कक्षेतही होणार नाही बदल

दिल्ली-एनसीआरमध्ये चार ग्रीन फील्ड ब्लू सिटी (नमो सिटी) विकसित केल्या जातील. एनसीआरमध्ये समाविष्ट असलेल्या दिल्ली, हरियाणा, राजस्थान आणि उत्तर प्रदेश या चारही राज्यांमध्ये प्रत्येकी एक नमो सिटी असेल, ज्यांची निवड एका आव्हानाद्वारे केली जाईल. शहरी व्यवहार मंत्रालयाने नमो सिटीच्या विकासासाठी पुढील ५ वर्षांत ५ हजार कोटी रुपये खर्च करण्याची तरतूद केली आहे. एनसीआर नियोजन मंडळाच्या…

Read More

निवडणूक आयुक्तांच्या नियुक्तीवर सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी:2023च्या कायद्याला आव्हान, निवडणूक आयुक्तांच्या निवड समितीमधून CJI ला वगळण्यावर प्रश्नचिन्ह

सर्वोच्च न्यायालय आज त्या कायद्याला आव्हान देणाऱ्या याचिकांवर पुन्हा सुनावणी करेल, ज्या अंतर्गत निवडणूक आयुक्तांची नियुक्ती करणाऱ्या पॅनलमधून भारताचे सरन्यायाधीश (CJI) यांना वगळण्यात आले होते. हे प्रकरण 2023 मध्ये बनवलेल्या त्या कायद्याशी संबंधित आहे, ज्यात निवडणूक आयुक्तांच्या नियुक्ती समितीत CJI यांच्या जागी केंद्रीय कॅबिनेट मंत्र्यांचा समावेश करण्यात आला होता. यापूर्वी निवडणूक आयुक्तांच्या नियुक्तीबाबत सर्वोच्च न्यायालयाने…

Read More

मी दिल्लीला आलो की चर्चा होते एकनाथ शिंदे नाराज झाले:पण मी मजेत असतो, कोणाच्या पोटात दुखतंय ते बघत असतो; उपमुख्यमंत्री काय म्हणाले?

विधान परिषदेच्या जागावाटपावरून महायुतीतील भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठी रस्सीखेच सुरू असून, छत्रपती संभाजीनगर आणि नाशिक या दोन जागांवरून भाजप व शिवसेनेत एकमत होत नसल्याची माहिती स्वतः मुख्यमंत्र्यांनी दिली आहे. या दोनपैकी एक जागा भाजपला मिळावी अशी मागणी होत असतानाच, दुसरीकडे जळगावच्या जागेसाठी शिवसेनेचे स्थानिक आमदार अत्यंत आग्रही असल्याचे समोर आले आहे. त्यानंतर आज…

Read More

शहरामध्ये वादळी पावसाचे थैमान; युद्धपातळीवर मदतकार्यास सुरूवात:आयुक्त वर्षा लड्डा यांनी केली पाहणी; जनजीवन पूर्ववत करण्यासाठी प्रयत्न

शहरात सोमवार, ८ रोजी झालेल्या वादळी पावसामुळे मोठ्या प्रमाणावर पडझड होऊन नुकसान झाले आहे. जोरदार वारे आणि मुसळधार पावसामुळे शहरातील अनेक प्रमुख मार्गांवर मोठमोठी झाडे उन्मळून पडली. अनेक ठिकाणी झाडांच्या फांद्या तुटून रस्त्यावर कोसळल्या. वाहतुकीचा बोजवारा उडाला. काही भागांत वाहनांवर झाडे कोसळली. अनेक ठिकाणी वीजवाहिन्यांवर फांद्या पडल्या. गंभीर धोका निर्माण झाला होता. या आपत्कालीन परिस्थितीची…

Read More

जन्मठेपेची शिक्षा भोगणारा कैदी खुल्या कारागृहातून पसार:भुईंज पोलिस ठाण्यात दाखल खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी होता

येरवडा येथील खुल्या कारागृहातून जन्मठेपेची शिक्षा भोगणारा एक कैदी पसार झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी येरवडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांकडून कैद्याचा शोध सुरू आहे. संतोष लक्ष्मण भिंगारे (रा. पाचवड, ता. वाई, जि. सातारा) असे पसार झालेल्या कैद्याचे नाव आहे. कारागृहातील अधिकारी नागनाथ भानवसे यांनी याबाबत येरवडा पोलिस ठाण्यात फिर्याद…

Read More

शेतकऱ्यांना दिलासा:पैठण तालुक्यात पावसाच्या हजेरीमुळे खरीप पेरणीस वेग‎, तालुक्यात सरासरी 26.9 मि.मी. पाऊस

गेल्या काही दिवसांपासून तीव्र उकाड्याने आणि पावसाच्या दीर्घ प्रतीक्षेने कोरड्या पडलेल्या पैठण तालुक्याला अखेर दोन दिवसांच्या समाधानकारक आणि सर्वदूर झालेल्या भिज पावसाने मोठा दिलासा दिला आहे. या दमदार हजेरीमुळे खरीप पेरण्यांच्या कामांना वेग आला आहे. जून महिन्याचा शेवटचा आठवडा सुरू झाला तरी वरुणराजाने दडी मारल्यामुळे तालुक्यातील शेतकरी वर्ग कमालीचा चिंतेत सापडला होता. दुबार पेरणीचे संकट…

Read More

राऊतांनी पाकिस्तानची चाटुगिरी थांबवावी:अफजल खानाच्या दाढ्या कुरवळणाऱ्यांनी आम्हाला हिंदुत्व शिकवू नये– नवनाथ बन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नेतृत्व काय आहे हे भारतामधील लोकांना माहिती आहे.संजय राऊत तुम्ही पाकिस्तानची चाटुगिरी करू नका, त्यांची प्रवक्तेगिरी करू नका. पाकिस्तानचे उदो उदो करण्याचे काम राऊतांकडून सुरू आहे, असे भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांनी म्हटले आहे. नवनाथ बन म्हणाले की, पाकिस्तानने इराण-अमेरिकेमध्ये दलाली करण्याचे काम केले आहे. हे करण्यापेक्षा तिथल्या समस्याकडे जर त्यांनी…

Read More

ग्रामपंचायत निवडणूक रद्द करा; सरपंच संघाची मागणी:आरक्षण 50 टक्क्यांपेक्षा अधिक झाल्याने कायदेशीर पेच

राज्यातील जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकांमध्ये ५० टक्क्यांहून अधिक आरक्षणामुळे निर्माण झालेला कायदेशीर पेच ताजा असतानाच, आता आगामी ग्रामपंचायत निवडणुकांमध्येही आरक्षणाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर, ‘राष्ट्रीय प्रधान मुखीया सरपंच संघाने’ ग्रामपंचायत निवडणूक प्रक्रिया रद्द करण्याची मागणी केली आहे. संघटनेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष राहुल उके आणि प्रदेशाध्यक्ष प्रमोद सांगोले यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल, मुख्यमंत्री,…

Read More