Headlines

अखिलेश यांच्या मुलीवर आक्षेपार्ह पोस्ट केल्याप्रकरणी FIR:कानपूर – प्रतापगडमध्ये 4 लोकांवर गुन्हा, म्हणाले- कुटुंबाची प्रतिमा मलिन झाली

सप अध्यक्ष अखिलेश यादव यांची मोठी मुलगी अदिती यादव (23) हिच्याविषयी सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट केल्याप्रकरणी गुरुवारी कानपूर-प्रतापगडमध्ये एफआयआर दाखल करण्यात आला. कानपूरमध्ये भारत पटेल, नागेश्वर सिंह बघेल आणि विनोद यादव यांच्यावर, तर प्रतापगडमध्ये शीतला सुजान कवी नावाच्या आयडीवर गुन्हा दाखल करण्यात आला. या लोकांवर सोशल मीडियावर अदिती यादव यांच्याविरोधात आक्षेपार्ह पोस्ट केल्याचा आरोप आहे….

Read More

शालार्थ घोटाळा:चव्हाणची ‘माया’ डोळे दिपवणारी, नाशिकचा निलंबित शिक्षण उपसंचालक संभाजीनगरचा रहिवासी

नाशिक विभागात उघडकीस आलेल्या शालार्थ घोटाळ्यातील आरोपी शिक्षण उपसंचालक बी. बी. चव्हाण हा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सुलतानपूर (ता. खुलताबाद) येथील रहिवासी आहे. एका शेतकरी कुटुंबातून आलेल्या चव्हाण याने अल्पावधीतच कोट्यवधी रुपयांची उलाढाल केली. चव्हाण आणि त्याच्या पत्नीने विविध व्यावसायिक फर्म तयार केल्या. यात दोन कंपन्या देखील आहेत. केवळ नोकरी करत असताना मिळालेल्या वेतनाच्या आधारे हे…

Read More

श्रीरामपुरात "नारी शक्ती'चा जागर; विविध क्षेत्रांतील महिलांचा गौरव:जिद्दीने संघर्ष करणाऱ्या महिला नारी शक्ती पुरस्काराने सन्मानित‎

महिला सन्मान होणे काळजी गरज आहे. स्त्री-पुरुष भेदभाव न करता पुरुषांच्या बरोबरीने कार्य करणाऱ्या प्रत्येक महिलेचा सन्मान अपेक्षित असल्याचे मत आमदार हेमंत ओगले यांनी व्यक्त केले. श्रीरामपूर नगरपरिषद आयोजित सन्मान नारी शक्तीचा या कार्यक्रमामध्ये आमदार ओगले बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी नगराध्यक्ष राजश्री ससाणे होत्या तर प्रमुख उपस्थिती सिने अभिनेत्री जान्हवी किल्लेकर यांची होती. नगराध्यक्ष करण…

Read More

सुनेत्रा पवारांचा मोठा निर्णय:राष्ट्रवादीत ‘थ्री लेअर’ सूत्रांची अंमलबजावणी; पार्थ-जय पवारांवर नवी जबाबदारी, नेतृत्वाचे वाटप

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठा संघटनात्मक बदल करण्यात आला असून, पक्षाच्या नेतृत्वाची जबाबदारी आता तीन पातळ्यांवर विभागण्यात आली आहे. अजित पवार यांच्या निधनानंतर पक्षाची सूत्रे स्वतःकडे घेतलेल्या सुनेत्रा पवार यांनी हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. पक्ष अधिक प्रभावीपणे चालवण्यासाठी आणि भविष्यातील राजकीय आव्हानांना सामोरे जाण्यासाठी ही नवी रचना लागू करण्यात आली असल्याचे सांगितले जात आहे. या नव्या…

Read More

राज्यातील तरुण आधीच आपल्यावर प्रचंड नाराज:TET पेपरफुटी प्रकरणावरून सुधीर मुनगंटीवारांचा सरकारला घरचा आहेर

टीईटी पेपरफुटीच्या मुद्द्यावरून शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी विधानसभेत निवेदन दिल्यानंतर, भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांनी आपल्याच सरकारला घरचा अहेर दिला आहे. “राज्यातील तरुण आधीच आपल्यावर प्रचंड नाराज असून, जर पोलिस निरीक्षकाने वेळीच कारवाई करून हा डाव उधळला नसता, तर परीक्षा झाल्यावर राज्यात मोठी बोंबाबोंब झाली असती,” अशी थेट कबुली देत मुनगंटीवार यांनी भर…

Read More

CBSE 12th Revaluation Fee Cut; Full Refund If Marks Increase

नवी दिल्ली10 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक शिक्षण मंत्रालयाने 12वीच्या विद्यार्थ्यांच्या विरोधामुळे सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन म्हणजेच CBSE च्या पुनर्मूल्यांकन शुल्कात कपात केली आहे. आता स्कॅन केलेल्या प्रतीसाठी 700 ऐवजी 100 रुपयेच द्यावे लागतील. प्रत्येक प्रश्नाची पुन्हा तपासणी करण्यासाठी आता 100 ऐवजी 25 रुपयेच लागतील. शिक्षण सचिव संजय कुमार यांनी रविवारी पत्रकार परिषदेदरम्यान या घोषणा केल्या….

Read More

निदा खानचा पोलिसांना चकवा; धर्मांतर कटाची सूत्रधार फरार:गर्भवती असल्याच्या दाव्याने खळबळ; जामीनावर उद्या सुनावणी

नाशिकमधील गाजत असलेल्या धर्मांतर प्रकरणात मुख्य संशयित आरोपी निदा एजाज खान हिच्याबाबत मोठी घडामोड समोर आली आहे. 21 दिवसांपासून फरार असलेली निदा खान अद्याप पोलिसांच्या हाती लागलेली नाही. या प्रकरणामुळे आधीच राज्यभरात खळबळ उडाली असताना, आता ती गर्भवती असल्याचा दावा समोर आल्याने तपासाला नवे वळण मिळाले आहे. अटकपूर्व जामीन मिळावा यासाठी निदा खानने नाशिकरोड न्यायालयात…

Read More

आजची सरकारी नोकरी:DRDO मध्ये भरतीसाठी अर्ज सुरू; एअरपोर्ट अथॉरिटीमध्ये 220 रिक्त जागा, इंडियन आर्मीमध्ये TGC कोर्स अंतर्गत 30 जागा

आजच्या सरकारी नोकरीत DRDO मध्ये 8 इंटर्न पदांसाठी निघालेल्या भरतीची, एअरफोर्स कॉमन ॲडमिशन टेस्ट 2026 ची अधिसूचना जारी झाल्याची आणि इंडियन आर्मीमध्ये TGC कोर्ससाठी अर्ज सुरू झाल्याची माहिती आहे. या नोकऱ्यांबद्दल संपूर्ण माहितीसह अर्ज करण्याची प्रक्रिया येथे पहा… 1. DRDO मध्ये 8 इंटर्न पदांसाठी भरती निघाली, स्टायपेंड 30 हजार रुपये प्रतिमहिना DRDO च्या डिफेन्स इंजिनिअरिंग…

Read More

गद्दाराच्या छताखाली बैठका कशासाठी?:शरद पवारांना बैठकीसाठी अख्खे विधान भवन काय ओस पडले होते? पवारांच्या बैठकीवरून राऊतांचा टोला

शरद पवार हे देशातील मोठे नेते आहेत, यात शंका नाही. मात्र, ज्यांनी आपले सरकार पाडले, त्या गद्दाराच्या छताखाली जाऊन बैठका घेतल्याने नेत्यांची विश्वासार्हता कमी होते आणि घसरते, अशा शब्दांत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली आहे. तर एकनाथ शिंदेंनी महाराष्ट्राला भ्रष्टाचार आणि गद्दारीची कीड लावली आहे. पवारांना…

Read More

अमरावती जिल्ह्यात पाऊस ८८% वर; ६ तालुक्यांनी ओलांडली सरासरी:चांदूर बाजारमध्ये सर्वाधिक १२०.९%, अचलपुरात ६६.१% पाऊस

अमरावती जिल्ह्यात सध्या पावसाळी वातावरण असले तरी, १४ पैकी केवळ सहा तालुक्यांनीच सरासरी पावसाची नोंद ओलांडली आहे. जिल्ह्याचा एकूण पाऊस गेल्या दहा वर्षांच्या तुलनेत ८८.९ टक्क्यांवर आहे. चांदूर बाजार तालुक्यात सर्वाधिक १२०.९ टक्के पावसाची नोंद झाली असून, अचलपूर तालुक्यात सर्वात कमी ६६.१ टक्के पाऊस झाला आहे. १ जून ते ८ जुलै या कालावधीत जिल्ह्यात एकूण…

Read More