Headlines

हे 'नारी शक्ती' नव्हे तर 'भाजप शक्ती' बिल:महिला आरक्षणाला विरोध नाही, पण मतदारसंघांच्या पुनर्रचनेच्या 'मनमानी'ला विरोध- संजय राऊत

महिला आरक्षणाला विरोधी पक्षांचा विरोध नाही, पण हे बिल पहिलेच मंजूर झाले आहे. महिला आरक्षणाला विरोध नाही, पण मतदारसंघांच्या पुनर्रचनेच्या ‘मनमानी’ला विरोध आहे आणि राहणार, असे उबाठाचे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे. सरकारने विरोधकांशी चर्चा करायला हवी होती, मसुदा समोर आल्यावर काय चर्चा करणार? आठ दिवसांनी जर बिलावर चर्चा झाली तर काय मोठा फरक…

Read More

लग्नाच्या 48 व्या दिवशी डॉक्टरच्या पत्नीची आत्महत्या:आरोप- कोणाशी बोलल्यास पती मारहाण करत असे, घरात सीसीटीव्ही लावले होते; ठाण्यातील घटना

महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यात लग्नाच्या अवघ्या 48 दिवसांनंतर 26 वर्षीय विशाखा तिलकर हिने आत्महत्या केली. विशाखा पुण्याची रहिवासी होती. ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ येथे राहणाऱ्या डॉक्टर नितीन तिलकर यांच्याशी 30 एप्रिल रोजी तिचे ठरवून लग्न झाले होते. नितीन बीएचएमएस डॉक्टर आहे आणि उल्हासनगरमध्ये प्रॅक्टिस करतो. पोलिसांनी नितीन, त्याची आई छाया आणि भावाला अटक केली आहे. तिघांवर हुंड्यासाठी…

Read More

घोषणांचा सुकाळ, कामांचा दुष्काळ:शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवेंचा छत्रपती संभाजीनगर महापालिकेवर घणाघात

शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या कारभारावर टीका केली आहे. महापालिकेच्या 100 दिवसांच्या कामकाजावर बोलताना दानवे यांनी ‘घोषणांचा सुकाळ आणि कामांचा दुष्काळ यापलीकडे शहराच्या पदरात काहीच पडलेले नाही’, अशा शब्दात प्रहार केला आहे. तसेच मनपा गटनेते गणेश लोखंडे यांनीही कामकाजावर ताशेरे ओढले आहेत. सत्ताधाऱ्यांच्या अपयशाची आणि खोटेपणाची ही तिखट उदाहरणे, असे…

Read More

MP Bajrang Sonawane Aggressive on Sons Allegations; Attacks Munde

बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील कदमवाडी येथील ‘गावकरी’ हॉटेलचे मालक विलास घुले यांच्या हत्याप्रकरणी आता राजकारण चांगलेच तापले आहे. या प्रकरणातील मुख्य सूत्रधार शोधण्याची मागणी परळीचे आमदार धनंजय मुंडे यांनी विधानसभेत केल्यानंतर, आणि खासदार बजरंग सोनव . मुलावर आरोप हे जाणीवपूर्वक राजकारण; तपासाला सहकार्य करणार आपल्या मुलावर होत असलेल्या आरोपांबद्दल खासदार बजरंग सोनवणे यांना विचारले असता…

Read More

नवनीत राणा म्हणजे जातीय विष पेरणारी 'विषवल्ली:राणा अन् बोंडे यांच्यावर गुन्हे दाखल करा, महिलांच्या अत्याचारात जात-धर्म येतोच कुठे?- विजय वडेट्टीवार

माजी खासदार नवनीत राणा यांच्यावर दोन समाजात तेढ निर्माण करणारी वक्तव्य केल्या प्रकरणी गुन्हे दाखल झाले पाहिजेत, त्यांच्यासोबतच डॉ.अनिल बोंडे यांच्यावरही गुन्हे दाखल झाले पाहिजे, त्यांनी अमरावती प्रकरणी चुकीची माहिती दिली आहे, असे काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी म्हटले आहे. विजय वडेट्टीवार म्हणाले की, नवनीत राणा ही जातीय विष पेरण्यासाठी पोसलेली एक विषवल्ली आहे, असे…

Read More

संयम ऑलिंपियाडमध्ये हुजुरपागा प्राथमिक विद्यालय अव्वल:२६२ शाळांतील ९ हजार २८० विद्यार्थ्यांनी घेतला सहभाग

पुणे शहर आणि परिसरात आयोजित संयम ऑलिंपियाड या स्पर्धेत कात्रज येथील हुजुरपागा प्राथमिक विद्यालयाने अव्वल क्रमांक पटकावला आहे. कृतीयुक्त शिक्षणातून विद्यार्थ्यांमध्ये व्यसनविरोधी जनजागृती करणे हा या स्पर्धेचा मुख्य उद्देश होता. या स्पर्धेत अहिल्यादेवी हायस्कूल फॉर गर्ल्स, शनिवार पेठ, आणि बी.के.कामठे हायस्कूल, येवलेवाडी, यांनी अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांक मिळवला. वॉवेल्स ऑफ द पीपल असोसिएशन, ताराचंद…

Read More

कर्जमाफीचा गाजावाजा, पण 70 टक्के शेतकरी वंचित:रोहित पवारांचा सरकारवर हल्लाबोल, विनाअट सरसकट कर्जमाफीची मागणी

राज्य सरकारच्या कर्जमाफी योजनेवर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी जोरदार टीका केली आहे. सरकार शेतकरी कर्जमाफीबाबत कितीही दावे करत असले तरी प्रत्यक्षात जाचक अटी-शर्तींमुळे मोठ्या प्रमाणात शेतकरी लाभापासून वंचित राहत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. यासंदर्भात त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत सरकारच्या धोरणांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. सोलापूर जिल्हा बँकेचे उदाहरण पुढे…

Read More

वेळकाढू कारभाराविरोधात महावितरण कार्यालयाला घेराव:नागरिकांनी सहभाग घेत प्रशासनाविरोधात व्यक्त केली नाराजी

तिवसा शहर व तालुक्यात वारंवार खंडित होणारा वीजपुरवठा, नागरिकांना येणारी अवाजवी वीजबिले, स्मार्ट मीटरची सक्ती आणि रखडलेल्या लिंक लाईनच्या कामाविरोधात तिवसा तालुका काँग्रेस कमिटी व नगरसेवकांच्या नेतृत्वात बुधवारी १ जुलैला महावितरणच्या उपकार्यकारी अभियंता व शहर अभियंता यांच्या कार्यालयाला घेराव घालत त्यांच्याच दालनात आक्रमक ठिय्या आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात नागरिकांनी हिरीरीने सहभाग घेत महावितरण प्रशासनाविरोधात…

Read More

318 वर्षांच्या परंपरेत प्रथमच!:संत मुक्ताई पालखीचा ऐतिहासिक रिंगण सोहळा प्रथमच जालन्यात; हजारो वारकऱ्यांचा भक्तिभावाने सहभाग

तब्बल 318 वर्षांची अखंड परंपरा लाभलेल्या संत मुक्ताई पालखी सोहळ्यातील ऐतिहासिक रिंगण सोहळा रविवारी प्रथमच जालना शहरात पार पडला. सकाळी साडेसात वाजता सुरू झालेल्या या सोहळ्याला राज्याच्या विविध भागांतून आलेल्या हजारो वारकऱ्यांनी उत्स्फूर्त उपस्थिती लावत भक्तिभावाने सहभाग नोंदविला. हरिनामाच्या गजराने, टाळ-मृदुंगाच्या निनादाने आणि अभंगांच्या सुरांनी संपूर्ण परिसर भक्तिमय झाला होता. संत मुक्ताई पालखीचे जालन्यात शनिवारी…

Read More

टाळमृदंगाच्या गजरात सदगुरु संत वासुदेव महाराज पालखीचे आगमन:वासुदेव नामाच्या गजरात दुमदुमली नगरी; पालखीचे स्वागत, पूजन‎

टाळ-मृदंगाच्या गजरात अकोला येथून सद्गुरू श्री संत वासुदेव महाराज यांच्या पालखी सोहळ्याचे राजेश्वरनगरीत आगमन झाले. आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरकडे निघालेल्या या पालखी सोहळ्याचे भाविकांनी स्वागत केले. दर्शन घेतले. . जठार पेठ परिसरात भक्ती, श्रद्धा आणि आध्यात्मिक वातावरणाचा सुंदर संगम अनुभवायला मिळाला. श्री वासुदेव महाराज पालखीचे जठार पेठ येथे आगमन होताच भक्तांनी उत्साहात स्वागत केले. विधिवत पूजन…

Read More