Headlines

संभाजीनगरात बनावट यूपीआय ॲप वापरून व्यापाऱ्यांना गंडवण्याचा फंडा:3 व्यापाऱ्यांकडून लाखोंची खरेदी, चौथ्या वेळी अडकले; तिघे अटकेत




डिजिटल व्यवहारांचे प्रमाण वाढत असताना आता त्यातही फसवणुकीचा नवा फंडा चोरट्यांनी शोधला आहे. बनावट यूपीआय ॲपच्या माध्यमातून व्यापाऱ्यांना गंडा घालणाऱ्या टोळीचा गुन्हे शाखा व सायबर पोलिसांच्या पथकाने पर्दाफाश केला आहे. यात योगेश विनायक गव्हाणे (35, रा. कमळापूर, वाळूज), नितीन अनिल मुसमाडे (33, रा. कमळापूर) व रवी सुभाष राठोड (34, रा. बजाजनगर) अशी आरोपींची नावे असल्याची माहिती गुन्हे शाखेचे निरीक्षक गजानन कल्याणकर यांनी दिली. आरोपी गव्हाणे हा वाळूजमध्ये वेल्डिंगचे दुकान चालवतो. त्या ठिकाणी त्याला ‘सीओ-टू’ची गरज भासते. त्यावर महिन्याकाठी 50 हजारांच्या वरती खर्च करावा लागतो. हा खर्च टाळण्यासाठी त्याने त्याच्याकडे काम करणाऱ्या 2 कामगारांच्या मदतीने बनावट यूपीआय ॲपच्या माध्यमातून व्यापाऱ्यांना गंडा घालण्याचा डाव रचला. त्यातूनच त्यांनी 37 हजारांचे सीओ-टू मशीन खरेदी केले. त्यांनी 2 ठिकाणी हे मशीन यशस्वीरीत्या खरेदी केले. एका ठिकाणी पेमेंट रखडल्याने व्यापाऱ्याने, ‘दुपारी माल पाठवतो,’ असे सांगितले. त्यामुळे यांचा डाव फसला. याबाबत माहिती मिळताच सहायक निरीक्षक कदीर देशमुख, उपनिरीक्षक अर्जुन कदम यांच्या पथकाने सापळा रचून त्यांना ताब्यात घेतले. व्हीपीएनच्या माध्यमातून घेतले बनावट ॲप बनावट यूपीआय ॲप सध्या तरुण मंडळीत प्रचंड चर्चेत आहे. 2020 मध्ये हे ॲप तयार झाले आहे. त्यावर काही वर्षांपूर्वीच बंदी आली आहे. मात्र, ते अजूनही इंटरनेटवर उपलब्ध आहे. ‘व्हीपीएन’च्या (व्हर्च्युअल प्रायव्हेट नेटवर्क) माध्यमातून ॲप डाऊनलोड करता येते. या मंडळींनी सोपा उपाय स्वीकारून त्याची खरेदी करून हा डाव रचला. मात्र, चौथ्या व्यापऱ्याने मालाची डिलिव्हरी उशिरा देतो म्हटल्याने त्यांचा डाव फसला आणि ते जाळ्यात अडकले. कसे ओळखाल बनावट ॲप



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *