घरातील टीव्ही ठरला यमदूत!:डोक्यावर कोसळताच 13 वर्षीय मुलीचा दुर्दैवी मृत्यू; जळगावातील हादरवणारी घटना
घरात खेळत असताना अचानक घडलेल्या एका दुर्घटनेत 13 वर्षीय मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना जळगाव जिल्ह्यातील आमोदा गावात घडली आहे. घरातील कपाटावर ठेवलेला अवजड टीव्ही अचानक खाली कोसळून मुलीच्या डोक्यावर पडल्याने ही दुर्घटना घडली. नाझमीन मोहम्मद इसहाक पिंजारी असे मृत मुलीचे नाव असून या घटनेने संपूर्ण गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. रविवारी सकाळच्या सुमारास…