Headlines

साताऱ्यात विद्रोही साहित्य संमेलनाची सांगता:अनेक ठराव मंजूर, पर्यायी सांस्कृतिक राजकारण स्त्रियांच्या खांद्यावरुन येणार – संभाजी भगत

ऐतिहासिक सातारा शहरात क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या १२५ व्या जंयती वर्षानिमित्त आयोजित करण्यात आलेलं १५ वे विद्रोही साहित्य संस्कृती संमेलन यशस्वीपणे पार पडलं. या संमेलनाच्या समरोप सत्रात संमेलनाचे अध्यक्ष लोकशाहीर संभाजी भगत, कॉ. सुबोध मोरे, ॲड. वर्षा देशपांडे, वाहरु सोनवणे, अविनाश कदम आणि कॉ. धनाजी गुरव यांची भाषणे झाली. आपल्याला या संमेलनानंतर काय करायचं आहे…

Read More

ट्रान्सजेंडर कायद्यातील सुधारणेवर SCची केंद्र-राज्यांना नोटीस:'स्व-ओळख' रद्द केल्याचा आरोप, 6 आठवड्यांत उत्तर मागितले

सर्वोच्च न्यायालयाने ट्रांसजेंडर व्यक्ती (अधिकार संरक्षण) सुधारणा अधिनियम, 2026 च्या घटनात्मक वैधतेला आव्हान देणाऱ्या याचिकांवर केंद्र सरकार आणि सर्व राज्ये/केंद्रशासित प्रदेशांना नोटीस बजावली आहे. मुख्य न्यायाधीश सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची यांच्या खंडपीठाने या प्रकरणी सहा आठवड्यांच्या आत उत्तर मागितले आहे. आता या प्रकरणाची सुनावणी तीन न्यायाधीशांचे खंडपीठ करेल. NALSA निकालाच्या विरोधात आहे नवीन सुधारणा:…

Read More

दिव्य मराठी एक्सक्लुझिव्ह‎:नाशिक म्हाडा प्रकरण, अधिकारी तुरुंगात तरी निलंबनास टाळाटाळ; 10 दिवसांपासून काजळे, पाटील गजाआड

म्हाडा फसवणूक प्रकरणी पोलिसांनी भूमी अभिलेख विभागाचे उपअधीक्षक बिपीन काजळे, नगररचना विभागाचे सहायक संचालक कल्पेश पाटील आणि महसूलचे नायब तहसीलदार नितीन पाटील या अधिकाऱ्यांना गजाआड केले आहे. 10 दिवस उलटूनही त्यांचे अद्याप निलंबन न केल्याने प्रशासकीय कार्यप्रणालीवरच प्रश्नचिन्ह निर्माण केले जात आहे. शासकीय नियमांनुसार, कोणताही अधिकारी 48 तासांपेक्षा जास्त काळ कोठडीत राहिल्यास तो निलंबित मानला…

Read More

महिलेची 21 लाखांची फसवणूक:विवाह संकेतस्थळावरील ओळखीने बसला गंडा

पुण्यात विवाहविषयक संकेतस्थळावर झालेल्या ओळखीमुळे एका महिलेची २१ लाख रुपयांची फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. आरोपीने विवाहाचे आमिष दाखवून महिलेकडून पैसे घेतले आणि परत करताना खेळण्यातील बनावट नोटा देऊन पळ काढला. या प्रकरणी सिंहगड रस्ता पोलिसांनी एका व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात एका ३२ वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे. त्यानुसार,…

Read More

अभिनेत्री ट्विशाचा जिथे मृतदेह सापडला, तिथले फोटो आले:मेकअप करतानाचा शेवटचा व्हिडिओही मिळाला, आरोपी पती समर्थची आज भोपाळ न्यायालयात हजेरी

भोपाळमध्ये मृत्यू होण्यापूर्वी अभिनेत्री-मॉडेल ट्विशा शर्माच्या शेवटच्या मेकअपचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. यात ती सासरच्या घराशेजारील एका ब्युटी पार्लरमध्ये तयार होताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये ट्विशा खूपच निवांत दिसत आहे. पोलिसांनी हे फुटेजही जप्त केले आहे. ब्युटी पार्लर ट्विशाच्या सासरच्या घरापासून अवघ्या 100 मीटर अंतरावर आहे. भोपाळमधील कटारा हिल्स येथील ट्विशाच्या घराच्या त्या भागाचे छायाचित्रही…

Read More

मुंबईत 70 नगरसेवकांवर कारवाई होण्याची शक्यता:नवनिर्वाचित नगरसेवकांविरुद्ध याचिका दाखल

मुंबई महानगरपालिकेचे निवडणूक निकाल जाहीर होऊन सभागृहाचे कामकाज सुरू झाले असले, तरी प्रत्यक्ष सत्तेच्या गणितावर आता कायदेशीर संकटाचे सावट निर्माण झाले आहे. विविध राजकीय पक्षांच्या ७० हून अधिक नवनिर्वाचित नगरसेवकांविरुद्ध निवडणूक याचिका दाखल झाल्यामुळे मुंबईच्या सत्तेचे समीकरण कोणत्याही क्षणी बदलू शकते, अशी चिन्हे आहेत. या न्यायालयीन संघर्षामध्ये शिवसेनेच्या (उबाठा) नगरसेवकांविरोधात सर्वाधिक २४ याचिका दाखल आहेत,…

Read More

खुलताबादेतील शेतकऱ्यांचा आता‎चिखलातून जाण्याचा प्रश्न मिटला‎:कसाबखेडा, येसगाव आणि मावसाळ्यात पाणंद रस्त्यांचे आमदार बंब यांच्या हस्ते भूमिपूजन‎

प्रतिनिधी| खुलताबाद ग्रामीण भागातील अर्थव्यवस्थेची नस असलेल्या शेत रस्त्यांचा प्रश्न अनेक दिवसांपासून प्रलंबित होता. मात्र, आता कसाबखेडा, येसगाव आणि मावसाळा येथील पाणंद रस्त्यांचा प्रश्न निकाली निघाला आहे. या रस्त्यांच्या कामाचे भूमिपूजन आमदार प्रशांत बंब यांच्या हस्ते करण्यात आले आहे. यामुळे परिसरातील ग्रामस्थांनी आनंद व्यक्त केला आहे. या कामांमुळे केवळ रस्तेच तयार होणार नाहीत. शेतकऱ्यांच्या पिढ्यानपिढ्या…

Read More

ममता म्हणाल्या – मला थांबवायचे असेल तर मारावे लागेल:गद्दारीलाही एक मर्यादा असते; बंडखोर नेत्यांना आव्हान- हिंमत असेल तर भाजपमध्ये सामील व्हा

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर तृणमूल काँग्रेस (TMC) मध्ये सुरू असलेल्या बंडखोरीदरम्यान ममता बॅनर्जी म्हणाल्या की, पक्षाचे निवडणूक चिन्ह कुठेही जाणार नाही. जर मला थांबवायचे असेल तर मला मारावे लागेल. ममता बॅनर्जींनी बंडखोर नेत्यांना आव्हान देत म्हटले, ‘जर हिंमत असेल तर उघडपणे भाजपमध्ये सामील व्हा. तुम्हाला वाटते का की मी संपले आहे? मी जनतेमध्ये पक्षाचे…

Read More

एस.टी. महामंडळात नोकरभरतीची मोठी संधी!:तब्बल ३३,००० पेक्षा जास्त पदे रिक्त; चालक-वाहकांच्या जागांचाही समावेश

महाराष्ट्र राज्य मार्गदर्शक परिवहन महामंडळात (एस.टी.) ३१ मार्च २०२६ पर्यंतच्या अधिकृत आकडेवारीनुसार वर्ग-१ ते वर्ग-४ प्रवर्गामध्ये एकूण ३३,०५१ पदे रिक्त असल्याचे समोर आले आहे. यामध्ये सर्वाधिक संख्या चालक, वाहक आणि कार्यशाळेतील तांत्रिक कर्मचाऱ्यांची आहे. ईटीआयएम मशीन्स, ओआरएस प्रणाली आणि प्रादेशिक कार्यालये बंद झाल्यामुळे प्रशासकीय स्तरावरील अनेक पदे तात्पुरती गोठवण्यात आली असली, तरी प्रवासी सेवेशी संबंधित…

Read More

उद्धव ठाकरेंच्या रामरक्षा आंदोलनाचे अमरावतीत पडसाद:भाजपने केले सुंदरकांड, नवनीत राणांकडून हनुमान चालीसा पठण

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शनिवारी नागपूर येथे रामरक्षा आंदोलन केले. अयोध्येतील राम मंदिर आणि इतर तीर्थस्थळांवरील कथित भ्रष्टाचार आणि चोरीकडे लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाचे पडसाद अमरावतीतही उमटले, जिथे भाजपने राजकमल चौकात सुंदरकांडचे पठण केले, तर माजी खासदार नवनीत राणा यांनी हनुमानगढी येथे हनुमान चालीसा पठण केले. भाजपने उद्धव ठाकरे यांच्यावर…

Read More