कॉंग्रेसमध्ये 'प्रदेशाध्यक्ष हटाव'ची मागणी!:हर्षवर्धन सपकाळांच्या विरोधात गट तयार, दिल्ली हायकमांडची घेणार 8 जूनला भेट
महाराष्ट्र काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजी आता विकोपाला गेली असून, हा वाद थेट दिल्ली दरबारी पोहोचण्याची चिन्हे आहेत. विद्यमान प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या कार्यपद्धतीवर तीव्र नाराजी व्यक्त करत पक्षांतर्गत विरोधकांनी आता त्यांच्याविरोधात मोठी आघाडी उघडण्यास सुरुवात केली असल्याची खात्रीलायक माहिती मिळत आहे. या पार्श्वभूमीवर, राज्यातील नाराज नेत्यांचा एक मोठा गट येत्या 8 जून रोजी दिल्लीत जाऊन थेट…