Headlines

15 बँकांना सोने-चांदीच्या आयातीचा नवीन परवाना मिळाला:SBI, PNB आणि HDFC यादीत समाविष्ट, देशात पुरवठ्याची कमतरता भासणार नाही

केंद्र सरकारने देशातील 15 प्रमुख बँकांना 31 मार्च 2029 पर्यंत सोने आणि चांदीची आयात करण्याची परवानगी दिली आहे. या यादीत स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI), पंजाब नॅशनल बँक (PNB) आणि HDFC बँक यांसारख्या मोठ्या नावांचा समावेश आहे. ही मंजुरी 1 एप्रिल 2026 पासून लागू झाली आहे. वाणिज्य मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या परराष्ट्र व्यापार महासंचालनालयाने (DGFT) अधिसूचना…

Read More

पार्वतीनगर 'डक फूट बेन्ड' दुरुस्ती अंतिम टप्प्यात:आज सकाळी चाचणी, उद्यापासून पाणीपुरवठा पूर्ववत

अमरावती येथील पार्वतीनगर परिसरातील नागरिकांना लवकरच पाणीपुरवठा पूर्ववत होणार आहे. जलकुंभाच्या ‘डक फूट बेन्ड’ दुरुस्तीचे काम अंतिम टप्प्यात असून, आज (गुरुवारी) काही प्रमाणात तर उद्या (शुक्रवारी) पूर्ण क्षमतेने पाणीपुरवठा केला जाईल, अशी माहिती महाराष्ट्र जीवन प्राधिकरण (मजीप्रा) अधिकाऱ्यांनी दिली. गेल्या दोन दिवसांपासून ‘डक फूट बेन्ड’ला गळती लागल्यामुळे या भागातील पाणीपुरवठा खंडित झाला होता. दुरुस्तीचे काम…

Read More

NEET Paper Leak | Maharashtra, Rajasthan CBI Lists Parents

जयपूर/मुंबई/बंगळूरु/पाटणा28 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक सीबीआय चौकशीत उघड झाले आहे की, नीटचा पेपर ५ राज्यांमध्ये विकला गेला होता. सर्वाधिक विक्री महाराष्ट्रात झाली आणि दुसऱ्या क्रमांकावर राजस्थान आहे. एजन्सीच्या अधिकाऱ्याने सांगितले की, आतापर्यंत अटक केलेल्या आरोपींच्या चौकशीतून आणि डिजिटल गॅजेट्स तपासल्यानंतर ही माहिती समोर आली आहे. सीबीआयचे म्हणणे आहे की, पुढील आरोपींच्या अटकेनंतर पेपरफुटीचे प्रकरण आणखी मोठे…

Read More

NEET UG री-एग्झामसाठी NTA कडून नवी गाईडलाईन्स जारी:आता 3 तास 15 मिनिटांचा पेपर अन् रफ वर्कसाठी मिळणार 4 शीट्स

नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) ने NEET UG री-एक्झाममध्ये काही बदल केले आहेत. नवीन सूचनेनुसार, परीक्षेचा कालावधी आता 180 मिनिटांवरून 195 मिनिटांपर्यंत वाढवण्यात आला आहे. याव्यतिरिक्त, उत्तरपत्रिकेत रफ वर्कसाठीही जागा वाढवण्यात आली आहे. NEET UG 2026 या वर्षी पेपरफुटीमुळे रद्द करण्यात आली होती. री-एक्झाम आता 21 जून रोजी आयोजित केली जाणार आहे, ज्यासाठी नवीन बदल करण्यात…

Read More

विधान परिषदेच्या 17 जागांचा बिगुल:ठाणे ते नागपूरपर्यंत रंगणार मोठा राजकीय रणसंग्राम; निवडणुकीत कोणाची बाजी?

महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठी हालचाल सुरू झाली असून, विधान परिषदेच्या 17 जागांसाठी निवडणुकीचा मार्ग मोकळा होत असल्याची माहिती समोर आली आहे. गेल्या अडीच वर्षांपासून रिक्त असलेल्या या जागा भरण्यासाठी प्रक्रिया गतीमान झाली आहे. यासोबतच, विधान परिषदेतील 9 सदस्यांचा कार्यकाळ 13 मे रोजी संपणार असल्याने त्या जागांसाठीही पुढील आठवड्यात निवडणूक जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जात…

Read More

HRS Aluglaze Secures ₹26.94 Cr Orders, Stock Surges 175%

3 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक ॲल्युमिनियम उत्पादनांचे डिझाइन आणि निर्मिती करणाऱ्या क्षेत्रातील दिग्गज कंपनी ‘एचआरएस अलुग्लेज लिमिटेड’ने (HRS Aluglaze Ltd) मोठी झेप घेतली आहे. कंपनीने गुंतवणूकदारांना मालामाल करणारी कामगिरी केली आहे. कंपनीला विविध नामांकित कॉर्पोरेट कंपन्यांकडून तब्बल 26.94 कोटी रुपयांच्या नवीन ऑर्डर्स मिळाल्या आहेत. यामुळे कंपनीच्या भविष्यातील वाढीला मोठी गती मिळणार आहे. एचआरएस अलुग्लेज लिमिटेडला मिळालेल्या…

Read More

सामाजिक संस्थांना शासनात प्रतिनिधित्व देण्याची मागणी:संस्थापक रवींद्र बोडखे यांचे मंत्री सावे यांना निवेदन‎

सामाजिक संस्थांना शासन स्तरावर योग्य प्रतिनिधित्व मिळावे. त्यांच्यासाठी जागा राखीव ठेवावी. हा विषय राज्य शासनापर्यंत प्रभावीपणे पोहोचवावा. यासाठी छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी कॅबिनेट मंत्री अतुल सावे यांची भेट घेतली. निवेदन सादर केले. छावा संघटनेचे संस्थापक रवींद्र बोडखे यांनी मंत्री सावे यांच्याशी सविस्तर चर्चा केली. सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांच्या विविध समस्यांवर राज्यपाल, सांस्कृतिक मंत्री, मुख्यमंत्री…

Read More

पुणे विभागात कृषी विभागाची मोठी कारवाई:खत काळाबाजार प्रकरणी 113 परवाने निलंबित/रद्द, 7 विक्रेत्यांवर गुन्हे दाखल

पुणे विभागात खतांचा काळाबाजार, साठेबाजी आणि चढ्या दराने विक्रीला आळा घालण्यासाठी कृषी विभागाने विशेष तपासणी मोहीम राबवली आहे. या मोहिमेअंतर्गत नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ११३ खत विक्री परवान्यांवर कारवाई करण्यात आली असून, सात विक्रेत्यांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यामध्ये १०७ परवाने निलंबित तर ६ परवाने रद्द करण्यात आले आहेत. शेतकऱ्यांना दर्जेदार खते रास्त दरात उपलब्ध…

Read More

साकीनाका मॅनहोल दुर्घटना:अमित साटम यांच्या हसण्यावरून राज ठाकरेंचे फडणवीसांना खरमरीत पत्र, तर राऊतांचा 'मौत के सौदागर' म्हणत घणाघात

साकीनाका येथे उघड्या मॅनहोलमध्ये पडून एका व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याच्या घटनेवरून राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या गंभीर घटनेवर भाजपचे मुंबईतील आमदार अमित साटम हे हसल्याचा प्रकार समोर आल्यानंतर सर्वच स्तरांतून संताप व्यक्त केला जात आहे. मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना खरमरीत पत्र लिहून भाजपच्या असंवेदनशीलतेवर बोट ठेवले आहे,…

Read More

अल्पवयीन मुलींच्या गैरवर्तनाप्रकरणी आरोपीवर तात्काळ कारवाईची मागणी:शिवसेना माजी जिल्हाप्रमुख गोपाल अरबट यांनी पोलिस अधीक्षकांना दिले निवेदन

परतवाडा येथील अल्पवयीन मुलींशी गैरवर्तन करून त्यांचे व्हिडीओ आणि फोटो व्हायरल करणाऱ्या आरोपीवर तात्काळ कारवाई करून त्याला फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी शिंदे शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख गोपाल अरबट यांनी केली आहे. सेनेच्या एका प्रतिनिधीमंडळाने अमरावती येथे जिल्हा पोलिस अधीक्षक यांची भेट घेऊन हे निवेदन दिले. शिवसेनेच्या मते, ही घटना अत्यंत धक्कादायक, गंभीर आणि निंदनीय आहे….

Read More