Headlines

बिल मंजुरीसाठी कमिशनखोरीचा भंडाफोड:6 टक्क्यांच्या ‘कट’चा खेळ उघड! बदलापूर नगर परिषदेत ACB ची कारवाई

बदलापूरमध्ये नगर परिषदेतील भ्रष्टाचाराचा मोठा प्रकार उघडकीस आल्याने प्रशासनात खळबळ उडाली आहे. कुळगाव-बदलापूर नगर परिषदेतील लेखाधिकारी विकास वैजीनाथ चव्हाण यांच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) गुन्हा दाखल केला आहे. कामाच्या बिलांसाठी आणि सुरक्षा ठेवीच्या रकमेवर 6 टक्के कमिशनची मागणी केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. या कारवाईमुळे स्थानिक प्रशासनात मोठी चर्चा सुरू झाली आहे. या प्रकरणाची…

Read More

अक्कलकोटवरून परतताना भाविकांवर काळाचा घाला:वर्ध्याजवळ कारची उभ्या ट्रकला धडक; दोन महिलांचा मृत्यू, 8 जण गंभीर

पंढरपूर आणि अक्कलकोट येथे देवदर्शन आटोपून अत्यंत आनंदाने नागपूरकडे परतणाऱ्या भाविकांवर काळाने भीषण घाला घातला आहे. तुळजापूर-नागपूर महामार्गावरील सालोड-नागठाणा परिसरातील एका पेट्रोल पंपाजवळ शनिवारी (२३ मे) पहाटेच्या सुमारास झालेल्या कार आणि ट्रकच्या भीषण अपघातात नागपूरच्या दोन महिलांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. तर ६ वर्षांच्या चिमुरड्या पाहुण्यासह एकूण आठ जण गंभीर जखमी झाले आहेत. रात्रभर ड्रायव्हिंग…

Read More

मेळघाटातील 5 विद्यार्थ्यांना विषबाधेचा संशय:खासदार वानखडेंनी घेतली भेट, चौकशीचे निर्देश; प्रकृती स्थिर

अमरावती येथील महर्षी पब्लिक स्कूलमधील पाच विद्यार्थ्यांना अचानक उलट्या, जुलाब आणि चक्कर येण्याची लक्षणे जाणवू लागल्याने त्यांना अमरावती येथील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा झाल्याचा संशय खासदार बळवंत वानखडे यांनी व्यक्त केला आहे. खासदार वानखडे यांनी बुधवारी रुग्णालयात जाऊन संबंधित विद्यार्थ्यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी डॉक्टरांकडून विद्यार्थ्यांच्या प्रकृतीची…

Read More

मुलीला बॅड टच; 35वर्षांच्या शेजाऱ्याला 10 अन् 11वर्षांच्या भावांनी चोपले:छत्रपती संभाजीनगरच्या सिटी चौक पोलिसांत पोक्सोअंतर्गत गुन्हा, मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर

आई कामावर गेल्याची संधी साधून घरात एकट्या असलेल्या 13 वर्षांच्या मुलीला तंबाखू मागण्याच्या बहाण्याने शेजाऱ्यानेच बॅड टच केल्याची घटना समोर आली. मात्र, या प्रसंगात घाबरून न जाता पीडितेच्या 10 आणि 11 वर्षांच्या दोन भावांनी 35 वर्षांच्या आरोपीला चोप दिला आणि घरातून पळवून लावले. सिटी चौक पोलिस स्टेशनच्या हद्दीत हा प्रकार घडला. आरोपी अनिल प्रकाश खंडागळे…

Read More

पडेगावातील निष्काळजी खोदकामाविरोधात गुन्हा दाखल करावा:मनपा गटनेते गणेश लोखंडे यांचे पोलिस आयुक्तांना निवेदन

पडेगाव परिसरात मुंबई-नाशिक महामार्गावरील रस्ता रुंदीकरणाच्या कामात महावितरणमार्फत अंडरग्राऊंड केबल टाकण्यासाठी करण्यात आलेल्या खोदकामात गंभीर निष्काळजीपणा झाला असून संबंधित कंत्राटदार व अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करा अशी मागणी महानगरपालिका शिवसेना – उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे गटनेते गणेश लोखंडे यांनी पोलीस आयुक्तांना निवेदन देऊन केली आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी केबल टाकण्यासाठी मोठ्या प्रमाणात खोदकाम करण्यात आले; मात्र…

Read More

संबळाच्या ठेक्यात देवी-म्हसोबाची सोंगे काढून आखाडी उत्सवाची सांगता:चांदवडच्या आखाडी उत्सवात घडले लोकसंस्कृतीचे जिवंत दर्शन

येथील गाडगेबाबा चौक (बहादूरपुरा) येथे श्री संत गाडगेबाबा मित्र मंडळाच्या वतीने आयोजित आखाडी (देवी उत्सव) उत्सवात उत्सवाचे प्रमुख आकर्षण असलेली देवीमाता व म्हसोबा महाराज ही मानाची सोंगे काढून शुक्रवारी (दि. ८) पहाटे आखाडी उत्सवाची उत्साहात सांगता झाली . ऐतिहासीक ओळख असलेल्या चांदवड शहराने धार्मिक उत्सवांची परंपरा कायम ठेवत लोकसंस्कृती जोपासली आहे. शहरातील गाडगेबाबा चौक येथे…

Read More

MP-Chhattisgarh Heatwave Alert; Rajasthan Cities Above 40°C

नवी दिल्ली/भोपाळ/जयपूर/लखनऊ8 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक देशाच्या अनेक भागांमध्ये उष्णतेचा प्रभाव कायम आहे. राजस्थान, यूपी, मध्य प्रदेश, बिहार, ओडिशा, तेलंगणा आणि छत्तीसगडमधील अनेक शहरांमध्ये रविवारी तापमान ४२°C च्या वर पोहोचले. महाराष्ट्रातील अकोला आणि वर्ध्यात सर्वाधिक ४५°C तापमान नोंदवले गेले. हे दोन्ही शहर रविवारी देशातील सर्वात उष्ण शहर ठरले. मध्य प्रदेशातील १० जिल्ह्यांमध्ये पारा ४२°C च्या वर…

Read More

नागेश पाटलांनी 'ऑपरेशन टायगर'ची उडवली खिल्ली:'स्लो ऑपरेशन' असे नाव ठेवण्याचा टोला; उद्धव ठाकरेंशी सकारात्मक चर्चा झाल्याचा दावा

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकरण यांनी आज पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची भेट घेतली. त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना सत्ताधारी शिवसेनेच्या ऑपरेशन टायगरची त्यांनी अक्षरशः खिल्ली उडवली. लोकांच्या कामांसाठी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांन भेटावेच लागते. त्यामुळे या भेटीचा दुसरा अर्थ काढण्याची गरज नाही. मी निवडून आल्यानंतर दुसऱ्या महिन्यापासून ऑपरेशन टायगर सुरू आहे. त्यामुळे त्याचे…

Read More

'नीट पेपरफुटीचे आंदोलन म्हणजे निव्वळ नौटंकी!':मोदी-फडणवीसांना 'डॅमेज' करण्याचा विरोधकांचा कट, चंद्रशेखर बावनकुळेंची टीका

राजधानी दिल्लीत सोनम वांगचुक तसेच अभिजीत दिपके यांच्या नेतृत्वात नीट पेपरफुटी प्रकरणी मोठे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला महाराष्ट्रातून देखील विरोधी पक्षांकडून तसेच विविध विद्यार्थी संघटनांकडून पाठिंबा दिला जात आहे. या पार्श्वभूमीवर भाजप नेते व मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया देत ही सगळी नौटंकी असल्याची टीका केली आहे. चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, असे आंदोलन पेटवण्याचे काम…

Read More

नातवाच्या अपघाती मृत्यूची बातमी ऐकताच आजीनेही सोडला प्राण:काही महिन्यांपूर्वी हृदयविकाराच्या झटक्याने मुलाचे निधन

काही महिन्यांपूर्वी मुलाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला होता.हे दुःख ताजे असतानाच नातवाचाही अपघाती मृत्यू झाल्याची बातमी समजताच आजीनेही क्षणात प्राण सोडल्याची हृदयद्रावक घटना घडली. या घटनेने सूर्यवंशी कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. नेमके प्रकरण काय उदगीर शहरातील नळेगाव रोडवरील उड्डाणपुलावर गुरुवारी रात्री दुचाकी कठड्याला धडकून पुलाखाली कोसळल्याने राजू ज्योतीराम सूर्यवंशी (वय २८) याचा जागीच मृत्यू…

Read More