'माझ्या भावाला लवकर न्याय मिळू दे':केतन अग्रवालच्या बहिणीची दगडूशेठ गणपतीसमोर भावनिक प्रार्थना
पुण्यातील बहुचर्चित केतन अग्रवाल हत्या प्रकरणाला आज बरोबर एक महिना पूर्ण झाला आहे. या घटनेनंतर अद्याप कुटुंबाला न्यायाची प्रतीक्षा आहे. याच पार्श्वभूमीवर केतनची बहीण संजना अग्रवाल यांनी पुण्यातील आराध्य दैवत असलेल्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात जाऊन बाप्पाचे दर्शन घेतले. अत्यंत भावुक अवस्थेत त्यांनी गणपती बाप्पाच्या चरणी प्रार्थना करत आपल्या भावाला लवकरात लवकर न्याय मिळावा,…