Headlines

दगडूशेठ गणपतीसाठी मोफत इलेक्ट्रिक वाहन सेवा सुरू:'एका मोबिलिटी'चा पुढाकार, शनिवारवाडा ते मंदिर मार्गासाठी ट्रस्टला दिले वाहन

पुणे येथे श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टला ‘एका मोबिलिटी’ कंपनीकडून एक पर्यावरणपूरक इलेक्ट्रिक वाहन प्रदान करण्यात आले आहे. गणेशभक्तांना शनिवारवाडा ते दगडूशेठ गणपती मंदिर मार्गावर मोफत आणि सुलभ प्रवासाची सुविधा मिळावी, हा यामागील उद्देश आहे. हे इलेक्ट्रिक वाहन ‘एका मोबिलिटी’चे सुधीर मेहता यांच्या कंपनीने ट्रस्टला सुपूर्द केले. ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने, कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी…

Read More

आमदार संजय गायकवाडांवर शाहू महाराज संतापले:आमदारकी रद्द करण्याची मागणी, सरकारला कारवाईचे आवाहन

शिवाजी कोण होता? या पुस्तकाच्या वादातून निर्माण झालेल्या प्रकरणाने आता राजकीय रंग घेतला असून, आमदार संजय गायकवाड यांच्या वक्तव्यावर खासदार शाहू महाराज छत्रपती यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. कोल्हापूरमध्ये माध्यमांशी बोलताना त्यांनी गायकवाड यांच्या वक्तव्याची कडाडून टीका केली आणि अशा प्रकारची भाषा जनतेला मान्य होणार नसल्याचे स्पष्ट केले. शाहू महाराज छत्रपती म्हणाले की, सार्वजनिक…

Read More

हरिवंश राज्यसभेचे नामनिर्देशित खासदार बनले, उपसभापती होऊ शकतात:कार्यकाळ 2032 पर्यंत राहील; नितीश कुमार यांनीही खासदारपदाची शपथ घेतली

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी हरिवंश नारायण सिंह यांना राज्यसभेसाठी नामनिर्देशित केले आहे. माजी CJI रंजन गोगोई यांच्या निवृत्तीनंतर ही जागा रिक्त झाली होती. ही जागा भरण्यासाठी JD(U) च्या हरिवंश यांना राज्यसभेसाठी नामनिर्देशित केले आहे. 69 वर्षीय हरिवंश आता 2032 पर्यंत राज्यसभेत राहतील. राज्यसभेत एकूण 12 सदस्य नामनिर्देशित खासदार असतात, ज्यांची निवड राष्ट्रपतीच करतात. या खासदारांची…

Read More

दस्तनोंदणीस नकार दिल्याने सहदुय्यम निबंधकाला मारहाण:आंबेगाव कार्यालयात घडला प्रकार, वकिलासह तिघांविरुद्ध गुन्हा

आंबेगाव येथील सहदुय्यम निबंधक कार्यालयातील प्रभारी अधिकाऱ्याला मारहाण केल्याप्रकरणी एका वकिलासह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दस्तनोंदणीस नकार दिल्याच्या रागातून हा प्रकार घडल्याचे पोलिसांनी सांगितले. रवींद्र कोळी यांनी या प्रकरणी आंबेगाव पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रवींद्र कोळी हे वरिष्ठ लिपिक असून, गेल्या महिन्याभरापासून ते आंबेगाव येथील सहदुय्यम निबंधक कार्यालयात प्रभारी…

Read More

जुन्या रिक्षांचे होणार इलेक्ट्रिक रिक्षात रुपांतर:सरकार सकारात्मक, चार्जिंग अन् किटसाठी रोज पैसे घेण्याचा पर्याय – मंत्री सरनाईक

पश्चिम आशियातील युद्धजन्य परिस्थितीमुळे निर्माण झालेल्या इंधन टंचाईमुळे रिक्षा चालकांच्या रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झाला आहे. यावर उपाय म्हणून सरकारने जुन्या रिक्षांचे पर्यावरणपूरक इलेक्ट्रिक रिक्षात रुपांतर करण्यावर गांभिर्याने विचार सुरू केला आहे. राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी या अभिनव उपक्रमाची माहिती दिली. मंत्रालयात पेट्रोल, सीएनजीवर चालणाऱ्या जुन्या रिक्षाचे पर्यावरणपूरक इलेक्ट्रिक रिक्षामध्ये रूपांतर करणे आणि ईव्ही…

Read More

विद्यार्थी वाहतूक यंदा सुकर, मागील वर्षीच्या तुलनेत 216 बसेसची वाढ:यंदाच्या वर्षी 1200 स्कूल बस गाड्यांना मिळाला परवाना‎

जिल्ह्यासह तालुक्यातील विद्यार्थी विद्यार्थिनींना वेळेत स्कूलला पोहोचण्यासाठी मागील वर्षी ९८४ स्कूलबस गाड्यांनी परवाना घेतला होता. तर यंदाच्या वर्षी १२०० स्कूल बस गाड्यांनी परवाना घेतला आहे. मागील वर्षाच्या तुलनेत यंदाच्या वर्षी २१६ स्कूल बस संख्येत वाढ झाली आहे. मात्र महाराष्ट्र मोटार कर अधिनियमानुसार खाजगी वाहनाकरिता २५०० रुपये प्रतिआसन प्रतिवर्ष इतका आहे, तर शाळेच्या मालकीची अथवा शाळेने…

Read More

जयपूरमध्ये फटाक्यांच्या कारखान्याला आग, मुलासह 3 ठार:होरपळल्यामुळे रस्त्यावर तडफडत होते लोक; भरवस्तीत सुरू होता कारखाना

जयपूरमधील खोह नागोरियान परिसरात असलेल्या फटाक्यांच्या कारखान्यात मंगळवारी सकाळी 11 वाजता भीषण आग लागली. या आगीत एका मुलासह तीन जणांचा होरपळून मृत्यू झाला, तर 6 मजूर गंभीर जखमी झाले. मृत्यू झालेल्यांमध्ये रहीम, रुबिन (१५) आणि अब्दुल वाहिद यांचा समावेश आहे. भाजल्यामुळे जखमी झालेल्यांत अजीम खान, नासीर खान, समीर खान, बिलाल आणि अशफाक यांचा समावेश आहे….

Read More

विधानपरिषदेसाठी अर्जाचे फक्त दोन दिवस; उद्धव ठाकरेंचा नकार कायम:निवडणुकीत मविआची कोंडी; उमेदवारावर अद्याप एकमत नाही

महाराष्ट्रातील विधानपरिषद निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना महाविकास आघाडीत उमेदवार ठरवण्यावरून मोठा पेच निर्माण झाला आहे. 12 मे रोजी होणाऱ्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम मुदत जवळ आली असून, केवळ दोन दिवस उरले आहेत. अशा परिस्थितीत महाविकास आघाडीचा उमेदवार कोण असेल, याबाबत अजूनही स्पष्टता आलेली नाही. या सगळ्या घडामोडींमध्ये उद्धव ठाकरे यांची भूमिका निर्णायक ठरत आहे….

Read More

8 Hr Toilet Backup for Moon Mission by 2031

न्यूयॉर्क2 तासांपूर्वी कॉपी लिंक नासाच्या 2028 पर्यंत मानवांना पुन्हा चंद्रावर पाठवण्याच्या मोहिमेला धक्का बसू शकतो. अमेरिकन ऑडिट रिपोर्टनुसार, ‘एक्झिओम स्पेस’चे नवीन स्पेस सूट तयार होण्यास 2031 पर्यंत उशीर होऊ शकतो. तथापि, नासाचे प्रशासक जेरड इसाकमन यांनी विश्वास व्यक्त केला आहे की 2028 पर्यंत अंतराळवीर याच सूट्समध्ये चंद्रावर उतरतील. स्पेस सूटची वैशिष्ट्ये जाणून घ्या. – इटलीची…

Read More

Maharashtra Pig Farming Subsidy Up to 75%; CM Fadnavis Govt Decision

राज्यातील पशुपालन व्यवसायाला चालना देण्यासाठी आणि ग्रामीण भागात रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. ‘मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजनेत’ आता वराह पालनाचा . शासनाने जारी केलेल्या निर्णयानुसार, वराह पालनासाठी आता कुक्कुटपालन आणि मेंढी पालनाप्रमाणेच सवलती मिळणार आहेत. सर्वसाधारण प्रवर्गातील लाभार्थ्यांना ५० टक्के, तर अनुसूचित जाती…

Read More