उदय सामंतांची मोठी घोषणा:100 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी 18 कोटींचा निधी
पुणे येथे होणाऱ्या 100 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी मराठी भाषा विभागामार्फत 18 कोटी रुपये देण्यात येणार आहेत. मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी ही घोषणा केली. पुण्यातील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात हे संमेलन होणार आहे. सामंत यांनी महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या कार्यालयाला भेट दिल्यानंतर पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. या निधीमध्ये विविध संमेलनांसाठी तरतूद…