घाटीत परिचारिकांचा बेमुदत संप सुरू:पहिल्याच दिवशी रुग्णसेवा विस्कळीत, प्रशासनाची धावपळ
छत्रपती संभाजीनगर: शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (घाटी) येथील परिचारिकांनी आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी बेमुदत संप पुकारला आहे. या संपामुळे पहिल्याच दिवशी रुग्णालयातील रुग्णसेवा मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाली. पाचशेहून अधिक परिचारिका या संपात सहभागी झाल्या आहेत. घाटी रुग्णालय हे मराठवाड्यातील सर्वात मोठे रुग्णालय असल्याने येथे दररोज हजारो रुग्ण उपचारासाठी येतात. संपामुळे वॉर्डांमध्ये औषधोपचार देणारे आणि…