महिला आरक्षण विधेयकाला विरोध करणाऱ्यांची जनता 'वाट' लावेल:काँग्रेसचे धोरण महिलाविरोधी, अमरावती अत्याचार प्रकरणाचा सखोल तपास होणार- चंद्रशेखर बावनकुळे
ज्या खासदारांनी काल महिला आरक्षण विधेयकाच्या विरोधात मतदान केले त्या खासदारांना कधीच निवडणूक जिंकता येणार नाही, त्यांनी महिलांचा अपमान केला आहे. बहिणींना प्रतिनिधित्व मिळू नये म्हणून हा विरोध करण्यात आला, काँग्रेसने कधीही महिलांना सन्मान दिला नाही, असे भाजपचे नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले आहे. तर महिलांच्या विरोधात भूमिका घेणाऱ्या सर्वांना महाराष्ट्रातील आणि देशाची जनता उद्ध्वस्…