जून महिना उलटूनही पावसाचा अजून पत्ता नाही:बळीराजा चिंतेत, ढोरकीन परिसरात धूळपेरण्या वाया जाण्याची भीती
जून महिना संपत आला तरी ढोरकीन आणि परिसरात पावसाचा पत्ता नसल्याने शेतकरी पुरता हवालदिल झाला आहे. जिकडे पहावे तिकडे निरभ्र आकाश, कडक ऊन आणि वेगवान वाऱ्यांमुळे शेतातील ओल नष्ट झाली असून, खरीप हंगाम धोक्यात आला आहे. मागील दोन वर्षांतील अतिवृष्टीचे संकट झेलून सावरलेला शेतकरी आता दुष्काळाच्या छायेत सापडला आहे. यंदा वेळेवर पाऊस होईल या आशेने…