Headlines

जिमपासून योगाकडे:अभिनेत्री योगिता चव्हाणने सांगितला तिच्या फिटनेसचा प्रवास, म्हणाली – नियमित योगामुळे माझा थायरॉईड नियंत्रणात राहण्यास मदत होते

आंतरराष्ट्रीय योग दिन दरवर्षी २१ जून रोजी जगभरात साजरा केला जातो. योगाचे मूळ हजारो वर्षांपूर्वीचे मानले जाते. योगाचा सतत सराव आणि अभ्यास केल्यानंतर शरीर या आसनांसाठी अनुकूल होते. मराठी अभिनेत्रीही आपल्या फिटनेससाठी योगाभ्यास करताना दिसून येतात. सन मराठी वरील ‘तू अनोळखी तरी सोबती’ या मालिकेतील अभिनेत्री योगिता चव्हाणने योगाविषयी तिचं मत शेअर केलं आहे. योगिता…

Read More

निंबोऱ्याच्या विद्यार्थ्यांनी उघडला पुस्तकांचा दवाखाना:जीर्ण पुस्तकांना नवसंजीवनी, विद्यार्थीच करतात दुरुस्त, अनोख्या उपक्रमाची चर्चा‎

आजवर आपण पशुवैद्यकीय दवाखाना, विविध आजारांवर औषधोपचार करणारे दवाखाने बघितले आहेत. मात्र, पुस्तकांचा दवाखाना ही संकल्पना निश्चितच वेगळी आहे. तिवसा तालुक्यातील जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक मराठी शाळा, निबोरा (देलवाडी,) येथे शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी हा अनोखा दवाखाना सुरू केला आहे. जिल्ह्यात तसेच तिवसा तालुक्यात अशा प्रकारचा उपक्रम राबविणारी ही एकमेव शाळा असण्याची शक्यता शाळेकडून वर्तवण्यात आली…

Read More

एक तरुण 2 तास एकाच ठिकाणी झुलत उभा:पुण्यातील नरपतगिरी भागातील रस्त्यावरील घटना; झोंबी ड्रग्ज घेतल्याचा दावा, पाहा VIDEO

विद्येचे माहेरघर असणारे पुणे सध्या लैंगिक शोषणाच्या विविध घटनांनी चर्चेत आले आहे. त्यातच आता या शहराला अमली पदार्थांचा विळखा पडल्याची दाखला देणारी एक घटना समोर आली आहे. शहरातील नरपतगिरी भागात अमली पदार्थांचे सेवन केलेला एक तरुण तब्बल 2 तास एकाच ठिकाणी झुलत उभा होता. या तरुणाने झोंबी ड्रग्ज घेतल्याचा दावा केला जात आहे. या घटनेचा…

Read More

एल निनोमुळे चारा टंचाईची शक्यता, पशुपालकांनी लक्ष द्यावे:पशुधन व दुग्धोत्पादन सुरक्षित ठेवण्यासाठी नियोजन आवश्यक

जागतिक हवामान बदलामुळे निर्माण होणाऱ्या ‘एल निनो’च्या संभाव्य संकटामुळे आगामी काळात चारा टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. या परिस्थितीचा पशुधन व दुग्धोत्पादनावर विपरीत परिणाम होऊ नये, यासाठी राज्यातील सर्व पशुपालकांनी आतापासूनच सतर्क राहून चारा पिकांचे नियोजन करावे, असे आवाहन पशुसंवर्धन आयुक्त डॉ. किरण पाटील यांनी केले आहे. पशुपालकांना या संकटाचा सामना समर्थपणे करता यावा, यासाठी…

Read More

भाजप कार्यकर्त्यांना मिळणार संघटनात्मक ताकद:प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न

छत्रपती संभाजीनगर येथे शनिवारी भारतीय जनता पक्षाच्या मराठवाडा व उत्तर महाराष्ट्र विभागाची जिल्हा प्रशिक्षण वर्ग नियोजन कार्यशाळा पार पडली. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत ही कार्यशाळा संपन्न झाली. यावेळी कार्यकर्त्यांना संघटनात्मक ताकद दिली जाईल आणि पक्षाची बांधणी मजबूत केली जाईल, असे चव्हाण यांनी सांगितले. भाजपच्या विभागीय कार्यालयात झालेल्या या बैठकीला ओबीसी कल्याण मंत्री…

Read More

दुष्काळी झळा:जिल्हाधिकारी थेट मंगळवेढा शिवारात, शेतकऱ्यांकडून चारा अनुदानाची मागणी

जिल्ह्यातील दुष्काळाची भीषण तीव्रता आणि टंचाईची पाहणी करण्यासाठी जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांनी शुक्रवारी मंगळवेढा तालुक्यातील शेतांच्या बांधावर थेट भेट दिली. पुढील १० दिवसांच्या आत सर्व पिकांचे पंचनामे पूर्ण करण्याचे नियोजन प्रशासनाने केले असून, नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना पूर्ण न्याय दिला जाईल, असे स्पष्ट निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले. दरम्यान, या पाहणी दौऱ्यात दुष्काळी परिस्थिती पाहता चारा छावण्या…

Read More

उद्धव ठाकरेंना मोठा धक्का बसणार?:खासदार संजय जाधव पक्ष सोडण्याच्या चर्चांना उधाण; 'मातोश्री'वरील बैठकीला अनुपस्थित

राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर येत असून, विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर आणि महाविकास आघाडीच्या दारूण पराभवानंतर शिवसेना ठाकरे गटातील गळतीचे सत्र अद्यापही थांबलेले नाही. निवडणुकीपासून अनेक दिग्गज नेत्यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडलेली असतानाच, आता पक्षाला आणखी एक मोठा धक्का बसण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. शिवसेनेतील एक बडा नेता पक्ष सोडणार असल्याची चर्चा…

Read More

मुंबईत मध्यरात्री भीषण अपघात:मद्यधुंद टँकरचालकाने डिलिव्हरी बॉयला चिरडले; पळणाऱ्या चालकाला नागरिकांनी पकडलं

मुंबईतील जोगेश्वरी भागात मध्यरात्री एका मद्यधुंद टँकरचालकाने दुचाकीस्वार डिलिव्हरी बॉयला चिरडल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या भीषण अपघातात तरुणाचा जागीच मृत्यू झाला. अपघात झाल्यानंतर घटनास्थळावरून पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या या चालकाला स्थानिक नागरिकांनी सिनेस्टाईल पाठलाग करून पकडले आणि पोलिसांच्या स्वाधीन केले. अजित ग्लास गार्डन परिसरात अपघात या अपघातात मृत्यू झालेल्या दुर्दैवी तरुणाचे नाव हर्ष…

Read More

पक्षांतर करणाऱ्या खासदारांविरोधात 'इंडिया' आघाडी निदर्शनं करणार:काँग्रेसचा इशारा; जनतेचा विश्वासघात केल्याचा आरोप

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे ज्येष्ठ प्रवक्ते गोपाळ तिवारी यांनी कडक इशारा दिला आहे की, महाविकास आघाडीच्या जाहीरनाम्यावर आणि मोदी सरकारच्या विरोधात मतदान करून निवडून आलेल्या खासदारांनी भाजप-महायुतीत प्रवेश केल्यास तो जनतेचा विश्वासघात ठरेल. अशा परिस्थितीत, काँग्रेस आणि ‘इंडिया’ आघाडीचे कार्यकर्ते संबंधित खासदारांच्या घरांसमोर तीव्र निदर्शने करतील. तिवारी म्हणाले की, मोदी सरकारच्या असंवैधानिक आणि लोकशाहीविरोधी कृत्यांमुळे देशाची…

Read More

24 ऑगस्टपासून 10वे सिम कार्ड मिळणे बंद:एक्स्ट्रा नंबर 15 दिवसांत बंद होण्याची शक्यता; JK सह ईशान्येतील राज्यांना 6 सिमची मर्यादा

तुमच्या नावावर 9 सिम कार्ड सक्रिय असतील तर तुम्हाला नवीन सिम कार्ड मिळणार नाही. सरकारने गुरुवारी दूरसंचार कंपन्यांना निर्देश दिले आहेत की, ज्या ग्राहकांच्या नावावर आधीच निश्चित मर्यादा म्हणजे 9 मोबाईल कनेक्शन आहेत, त्यांना कोणतेही नवीन सिम कार्ड जारी करू नये. हा नियम याच महिन्याच्या 24 तारखेपासून देशभरात लागू होईल. दूरसंचार विभाग (DoT) नुसार, तुम्ही…

Read More